ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "
६
अमृतकलश फोडला
मोहिनीचे नृत्य
क्षीरसागर मंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर धन्वंतरी अमृतकलश प्रकट झाले. देव आणि असूर दोघांनीही अमरत्व हवे असल्याने क्षीरसागरमंथन केले. जेव्हा धन्वंतरी हातात अमृतकलश घेऊन प्रकट झाले, तेव्हा असुरांनी तो हिसकावून घेतला आणि पळून गेले. त्यावेळी महाविष्णूंनी मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप घेतले. सर्वजण तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. तिने स्वतःच्या हातानी सर्वांना अमृत वाटण्याची व्यक्त केली आणि सर्वांना ओळीत बसण्यास सांगितले. देव आणि दानव दोन वेगवेगळ्या रांगांमध्ये बसले. मोहिनीने दानवांना फसवून फक्त देवांनाच अमृत दिले.
धन्वंतरी हा विष्णूचा अंश आहे. तो देवांचा डॉक्टर आहे. महालक्ष्मी ही क्षीरसागरातून प्रकट झाली आहे. महालक्ष्मी, धन्वंतरी आणि अमृतकलश एकाचवेळी जन्माला आले आहेत. महाविष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि असुरांना फसवून फक्त देवांनाच अमृत दिले. मी सर्वांची जननी म्हणून आले आहे. वडील कदाचित मुलांमध्ये चांगला, वाईट असा भेदभाव करू शकतील परंतु मातेच्या नजरेत सर्व सामान असतात. मी धन्वंतरी होईन आणि सर्वांना अमृत देईन. कोणामध्येही असुरी वृत्ती राहू नये. मी प्रत्येकाला अमृतमय आणि शाश्वत करिन. मी सर्वांचे देवांमध्ये परिवर्तन करीन.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा