ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "
६
अमृतकलश फोडला
ही मोहिनी आकाशात उडते आणि सर्वत्र अमृताचा वर्षाव करते. कसा काय ? स्तूपाद्वारे ! माझे अमृतमयी भाव स्तूपाद्वारे संपूर्ण अवकाश व्यापून ढगात शिरतील आणि अमृतवर्षाव होईल. अमृतमयी हवा आल्हादक शांती देते. वाऱ्याच्या झुळुकीने अग्नी उद्दीपीत होतो. अमृतमय ज्योतीचा अग्नी बनून पावित्र्य विस्तार पावते. या अमृतविश्वात शारीरिक, मानसिक आणि आत्मिक व्याधी राहतीलच कशा ? वृद्धत्वच नाही तर मृत्यु कसा ? कुठे मन ? कुठे माया ? हे एक आनंददायी वैश्विक नृत्य आहे. हे मोहिनीचं आनंदी विश्वनृत्य, अमृतनृत्य आहे.
या मोहिनीला तिच्या नृत्याच्या आवेगात कलश फोडून इकडेतिकडे धावत अमृत शिंपडताना मी पाहिले. तिची इच्छा तृप्त होत नाही. तिने मातीचा कण न कण अमृताने ओथंबून टाकला. सगळीकडे अमृताचा शिडकाव केला. काहीही किंवा कुठलीही जागा बाकी राहू नये याची ती कटाक्षाने काळजी घेत होती.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा