ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील. "
७
कर्माचा हिशोब मिटला
क्षीरसागराप्रमाणे मी माझं हृदय घुसळून काढलं. जसजशी मी घुसळत राहिले, तसतशा अनेक गोष्टी प्रकट झाल्या. राधा, दुर्गा, महालक्ष्मी, रुक्मिणी, सीता आणि सत्यभामा सगळ्या आल्या. अंतर्यामी तांदळाच्या अग्राच्या आकाराचा असलेला लहानसा निळा प्रकाश मोठा होत गेला. आज्ञाचक्राशी राधाकृष्णाचे, शिवशक्तीचे मिलन झाले. तरीसुद्धा मी घुसळतच राहिले. सहस्रदलाच्या कमळातून अमृतकलश प्रकट झाला. आता त्या इवल्याशा निळ्या प्रकाशाला कोटी सूर्यांचे तेज आले व तो अमृतकलशाला जाऊन भिडला. त्याचा स्पर्श झाल्याबरोबर अमृतकलश फुटला आणि सहस्रारातून अमृत भरभरून वाहू लागले. त्याचा आवेग दुथडी भरून वाहणाऱ्या एखाद्या नदीप्रमाणे होता. हे अमृतमयी भाव स्तूप शोषून घेतो आणि त्याचा जगभर फैलाव करतो.
स्वामी म्हणाले ' माझ्या हृदयाचे घुसळणे ', ' अमृतकलश फुटणे ' ते हेच होय. या अमृतकलशाच्या ओथंबून वाहण्याने कलियुगाच्या मातीचे परिवर्तन होईल, त्यामुळे त्याचे अमृतयुग येईल. मातीचं सुवर्ण होईल. माझे स्वामी! माझे प्राण ! माझे लाडके प्रभू संपूर्ण जग एका छत्राखाली आणतील. सर्वत्र फक्त प्रेमाचंच राज्य असेल.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा