गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "


अमृतकलश फोडला 

 

            मोहिनी नृत्याच्या सौंदर्याची भुरळ पडून असुरांना अमृताचा विसर पडला. ह्या वसंतमोहिनीच्या नृत्याने संपूर्ण जग भारावून जाईल, परंतु ती अमरत्वाच्या अमृतात सर्वांना समान भागिदार करून घेईल. ह्या विष्णूमोहिनीने हातात न्यायाचा- तराजू घेतला आहे. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सर्वांना ती सारखेच अमृत देईल. तिचे नृत्य असुरांना भुलवण्यासाठी नाही तर साईविष्णुंना प्रसन्न करून त्यांच्या हातात असलेले कर्माचे हिशोब नाहीसे करण्यासाठी आहे. हे नृत्य मायावी नाही. हे सर्वांनी अज्ञानातून बाहेर येऊन जागृत होण्यासाठी केलेलं प्रेमनृत्य आहे. ती स्वतःच्या डोक्यावरचा अमृतकलश फोडून पृथ्वी, आकाश, पाणी, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांमध्ये अमृत शिंपडते आहे. ती सर्वत्र अमृताचा वर्षाव करीत आहे. धरती अमृताने चिंब भिजत आहे. यापुढे बियाणे अमृतमयी मातीत रुजतील. या बियाणांपासून अमृतमय रोपे उगवतील. या रोपांपासून मिळणारे धान्य, फळे ही अमृतमयी असतील. जे ही फळे खातील त्यांना अमरत्व प्राप्त होईल. इथे दानवी धन्य उगवणारच नाही. बियाणे, मुले, रोपे, झाडे, फळे सर्व काही अमृतमयी असतील.     
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा