ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
रत्न - ११
विराट पुरुष
परमेश्वराने निर्मितीचा संकल्प केला आणि त्या संकल्पानंतर तात्काळ ओम हा ध्वनी उत्पन्न झाला आणि त्यानंतर विराट पुरुषाचे आगमन झाले.
विराट पुरुष म्हणजे काय?
विराट पुरुष म्हणजे आलिंगन अवस्थेतील नर आणि नारी ही परमेश्वराची दोन अंग होय. त्या विराटपुरुषाने स्वतःला पुरुष आणि स्त्री असे दोघात विभागले आणि निर्मितीचा जन्म झाला.
बृहदारण्यक उपनिषदामध्ये विराट पुरुषाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी शेंगदाण्याचा प्रतीक म्हणून वापर केला आहे. दाण्याचे दोन भाग विराट पुरुषाचे प्रतीक आहे.
मी अगोदर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की जरी स्वामींचे आणि माझे रूप वेगवेगळे असले तरी आमचे भाव एकच आहेत. श्रीकृष्ण, सत्यसाई आणि प्रेमसाई यांचे भाव आणि राधा, वसंता आणि प्रेमा यांचे भाव एकच आहेत. माझ्या बाबतीत, केवळ भावच एक आहेत असे नाही.
स्वामी आणि मी विराट पुरुषाचे स्वरूप आहोत. निर्मितीसाठी आम्ही विराट पुरुषाचे भाव विभागतो. राधा आणि प्रेमा यांच्यामध्ये हे भाव नाहीत. म्हणून मी त्यांच्याहून वेगळी आहे.
९ मे २००८ सकाळचे ध्यान
वसंता : स्वामी, प्लीज मला विराट पुरुषाविषयी काहीतरी सांगा.
स्वामी : विराट पुरुष दाण्याच्या दोन भागांप्रमाणे आहे. डाळ, वनस्पती आणि वृक्षांची बीजे यांना दोन भाग असतात. जर ते बीज दोन भागात विलग झाले तर त्याला अंकुर फुटत नाही. जेथे दोन भाग
संयुक्त होतात तेथे प्राणशक्ती असते. बिजाला अंकुर फुटण्यास ही शक्ती कारणीभूत होते. त्याचप्रमाणे विराट पुरुषालाही स्त्री आणि पुरुष अशी दोन अंग, दोन भाग असतात. त्यांच्यातून निर्मिती उत्पन्न होते.
स्त्री आणि पुरुष यांच्यापासून सर्व निर्मितीस सुरुवात होते. मी नेहमी म्हणते 'मला स्वामी हवेत, मी तुमच्यावर प्रेम करते,' हे बीज आहे. माझे पावित्र्य ही त्या बीजाची साल आहे. ह्या बीजामधून प्रेमाची
प्राणशक्ती अंकुरित होते. 'ओम श्री साई वसंत साईसाय नमः' या मंत्रातून वृक्षाचे खोड, फांद्या आणि पाने साकार होतात. याचा अर्थ ओम श्री साई वसंत साई नमः हा वृक्ष आहे, ओम श्री साई वसंत साई नमः ही फांदी आहे, ओम श्री साई वसंत साई नमः पान आहे. स्वामींचे आणि माझे भाव ही प्राणशक्ती आहे जी वृक्ष फांद्या आणि पानांची निर्मिती करते.
हा मंत्र विराट पुरुष मंत्र आहे म्हणून म्हणून सर्वत्र सत्यसाई आणि वसंताचा जन्म होतो.
श्री वसंतसाई अम्मा
संदर्भ - श्री वसंत साई अम्मांनी लिहिलेल्या शिवसूत्र या पुस्तकातील १७ व्या प्रकरणांमधून हा उतारा घेतला आहे.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा