ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रस्तावना
या पुस्तकामध्ये अनेक विलक्षण अनुभव, थक्क करणाऱ्या घटना व अद्भुत प्रसंग आहेत. म्हणून त्याविषयी लिहिताना मला खूप काळजी वाटत होती. तथापि स्वामींनी मला प्रोत्साहीत केले आणि शिवाय माझ्या पत्रावर," लिही घाबरू नकोस राधा" असे लिहिले व 'बाबा' असे लिहून स्वाक्षरी केली. त्यावेळी मी फक्त 50 पाने लिहिली होती. ह्या प्रसंगानंतर जेव्हा जेव्हा आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी पुस्तक विकत घेऊन गेलो,त्यांनी प्रत्येक अध्याय विभूती, हळद आणि अक्षतांनी आशीर्वादित केले. त्यांनी अनेक चमत्कारांद्वारे या पुस्तकाला त्याची मान्यता असल्याचे दर्शविले. त्या चमत्कारांचे फोटोही काढलेले आहेत. इतर कोणत्याही पुस्तकाला ह्या पुस्तका इतके आशीर्वाद लाभलेले नाहीत.
जेव्हा मी इथेच, याक्षणी, मुक्ती पुस्तकाच्या पहिल्या भागाचे लिखाण करत होते तेव्हा स्वामींनी मी राधा असल्याचे सांगितले. ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात त्यांनी मी त्यांची शक्ती आणि प्रकृती असल्याचे सांगितले. ह्या पुस्तकामध्ये भगवानांनी त्यांच्या अवताराची अनेक विस्मयकारक रहस्य उघड केली आहेत. पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतर स्वामींनी मला त्याचे तीन भाग करून त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद अशी नांवे देण्यास सांगितले. ऋग्वेदाची सुरुवात ' अग्निमिले ' नी होते. या पुस्तकातील पहिल्या ऋग्वेदाच्या भागात प्रेमाच्या अग्निची तीव्रता वर्णन केलीय. ह्यामध्ये मी माझे अनुभव आणि अग्निपरीक्षेविषयी लिहिलेय आहे. स्वामींनी या भागाचे सार आहे "असतो मा सद्गमय" असे सांगितले. यजुर्वेद ह्या दुसऱ्या भागाचे सार आहे. स्वामी म्हणाले की प्रेम साई अवताराच्या वेळी सत्ययुग वा सुवर्णयुगाचा उदय होईल व ते समस्त विश्वाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल.
सामवेद तिसऱ्या भागात परमेश्वराचा महिमा, स्तुतीगान केले आहे. ह्यामध्ये पद्यरचनेतील श्लोक आहेत. तसेच राधेच्या संस्कारांचे मधुर संगीतात वर्णन केले आहे.
तमिळ संत म्हणतात, एखाद्या दिवशी मी वेदपुष्पांनी परमेश्वराचे स्तुतीगाण केले नाही त्या दिवशी मला उपवास ठेवल्यासारखे वाटते. मी सुद्धा ऋग्वेद, यजुर्वेद, आणि सामवेदाने माझ्या प्रभूंची भक्ती करून ते त्यांच्या दिव्य चरणी समर्पित करते.
हे पुस्तक पूर्ण करण्यापूर्वी मी ईशावास्य उपनिषद उघडले. त्यातील अग्नीला केलेल्या प्रार्थनेचा शेवटचा श्लोक मी वाचला.
" अग्ने नय सुपथा राये ......... "
हे अग्नीदेवा, आमची कर्मफले आनंदाने अनुभवण्यासाठी आम्हाला धर्म मार्गावर घेऊन चल. तू आमचे सर्व विचार आणि कर्म जाणतोस.
मृत्यूनंतर अग्निदेव आपल्याला मार्ग दर्शवतो. तो जीवाला ब्रह्म लोकात घेऊन जातो. ब्रह्मलोकात पोहोचल्याला पुन्हा जन्म नाही. तो मुक्त होतो.
जीवन मुक्ती म्हणजे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाचा/प्रवृत्तीचा साक्षात्कार. मनुष्य देहामध्ये असतानाच ह्याची प्राप्ती होते.ह्या पुस्तकांमध्ये जीवाची जीवनमुक्त अवस्था कशी प्राप्त केली त्या वैयक्तिक अनुभवांचे कथन केले आहे. प्रत्येक जण ही अवस्था प्राप्त करू शकतो आणि आपण ती प्राप्त केलीच पाहिजे! ह्याच कारणासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
ह्या पुस्तकातील तीन भागांना वेदांची नावे देताना मला अत्यंत भीती वाटत होती. मी कोदाईंना म्हणाले की स्वामींनी मला काही पुरावे दिले तरच मी वेदांची नांवे देईन. एक दिवस मी कोदाईंच्या घरी ध्यान करत असताना नारंगी रंगाच्या एका ताटलीवर स्वामींचे चरण पाहिले. ध्यानानंतर कोदाईने मला पादुका सहस्त्रम नावाचे पुस्तक दिले. पुस्तकाच्या मागील कव्हरवर स्वामींचे दिव्य चरण होते. त्या योगायोगाने मी चकित झाले. संदेश वाचण्यासाठी कोदाईंना मी पुस्तक उघडण्यास सांगितले. त्यांनी डोळे बंद करून प्रार्थना केली व एक पान उघडले त्या पानावर पुढील पद्य रचना होती.
"हे पादुकांनो,
तुम्ही श्री रंगनाथाचे चरण सुशोभित करता
म्हणून समस्त जगतामध्ये तुमची पूजन केले जाते.
परमेश्वराच्या पदरवाने
तुमचे अष्टदिशांवर प्रभुत्व आहे का?
वा /का तिन्ही वेदांचे मूर्तिमंत स्वरूप असणाऱ्या.
परमेश्वराच्या तिन्ही देव्यांशी तुम्ही संभाषण करता ?
वा/का तुम्ही असे म्हणता " परमेश्वर येथे असताना भीती कशाची घाबरू नका.( भीती बाळगू नका)".
परमेश्वर आपले आश्रयस्थान आहे आणि निर्भयतेने त्याचा महिमा गा असे शेवटच्या ओळीमध्ये सांगितले आहे. हा संदेश समजून मी माझ्या भीती कडे दुर्लक्ष करून/ बाजूला सारून पुस्तकातील तीन विभागांना वेदांची नावे दिली. मला अनेक आगळेवेगळे विलक्षण अनुभव,भाव लिहायचे असल्यामुळे मी नेहमी अत्यंत सावधतेने लिहीत असते. ह्या संदेशामुळे मला आनंद झाला मी स्वामींच्या सूचनांचे पालन करून त्यांचे सत्याचे बोल ह्या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. या वाचा मनन करा ग्रहण करा व लाभान्वित व्हा.
जय साईराम
श्री वसंतसाई
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम