रविवार, १४ जानेवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " जसे भाव तसे जीवन. "


कर्माचा हिशोब मिटला  

            फक्त आपल्या प्रेमाने आणि भक्तीनेच त्याची तुलना होऊ शकते. रुक्मिणीने ठेवलेलं तुळशीपत्र भक्तीने परिपूर्ण होतं, तिचं विशुद्ध प्रेम हे दर्शवते. परमेश्वराचे वजन कोणीही करू शकत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कर्मांची मोजदाद करता येणार नाही. तर मग ५८० कोटी जीवांच्या कर्मांची बेरीज कशी बरं करणार ? ५८० कोटी जीवांच्या कर्माची बेरीज किती बरे असेल ? ही सर्व कर्म तराजूच्या एका पारड्यात ठेवली आणि मी माझी भक्ती, प्रेम आणि ध्यास हे रुख्मिणीने वाहिलेल्या तुळशीपत्राप्रमाणे दुसऱ्या पारड्यात ठेवले.  त्यामुळेच जगाची कर्म समतोल होत आहेत. तराजूच्या काटा समतोल झाला आहे. कर्माचा हिशोब समतोल केला आहे. स्वामींनी कर्माचे हिशोब फेकून दिले आहेत. मी माझ्या पारड्यातून सर्वांना सामान हिश्यात अमृत वाटते आहे.
           परमेश्वराच्या हातात कर्माचा तराजू असतो. तो त्याच्या स्वतःच्या कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही. मी न्यायाचा तराजू माझ्या हातात धरते. सर्वांना सामान न्याय मिळतो.

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा