ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो स्वार्थ आणि अपेक्षा यापासून मुक्त आहे, त्याला कर्माचे परिणाम बाधत नाहीत. "
७
कर्माचा हिशोब मिटला
परमेश्वराचा कायदा तो स्वतःसुद्धा मोडू शकत नाही. त्यामुळे कर्माच्या हिशोबाच्याबाबतीत तो काहीही करू शकत नाही. कर्मांचे हिशोब समतोल व्हायला हवे. लहानपणापासून माझी भक्ती आणि परमेश्वरावरील माझं नितांत प्रेम सर्वांची कर्म समतोल करीत आहेत. मी सर्वांची कर्म अंगावर घेते आणि त्यामुळे माझ्या शरीराला यातना होत आहेत.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही बँकेतून मोठी रक्कम कर्जाऊ घेता, परंतु तुम्ही ती फेडू शकत नाही. बँक तुमचे कर्ज माफ करेल का ? तुमच्या भावाला तुमची परिस्थिती कळली आणि त्याने त्याच्या खात्यातून तुमच्या खात्यात पैसे घातले. आता तुम्ही स्वतंत्र झालात. तुमचे कर्ज फिटले.
त्याचप्रमाणे, माझ्या प्रेमाद्वारे मी सर्वांचा कर्मांचा हिशोब- पूर्ण करते; कर्माचे खाते बंद करते.
२३ जुलै २००७ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी मी असं लिहिलं की माझ्या तपश्चर्येच्या शक्तीनी मी जगाची कर्म समतोल करते. हे बरोबर आहे का ?
स्वामी - हो लिही. तुझ्या तीव्र प्रार्थना, सर्वांना तुझ्यासारखे बनवायचे ही तुझी इच्छा यांनीच मुक्ती स्तूपाचे रूप घेतले. ही तपशक्ती नवीन निर्मिती देते. ती जुनी कर्म जाळून टाकते. सर्वांची नावे, रूपे तीच राहतील. प्रत्येकाच्या कर्माची खाती बंद झाल्यामुळे तुझे भाव त्यांच्यात प्रवेश करतील आणि सर्वांना भारून टाकतील.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा