ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव निर्माण होतात, त्यांनतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ? "
७
कर्माचा हिशोब मिटला
मुक्ती स्तूपाच्या अग्रभागी दगडाची कोरलेली चांदणी आहे. त्या चांदणीला सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरू झाले. मी ते काम पाहत होते. प्रथम चांदणीच्या आकाराचा तांब्याचा साचा बनवला गेला. मग या साच्याला सोन्याचे वेष्टण दिले गेले. लहान लहान सोन्याचे तुकडे, सतत घाव घालून त्यांचा पातळ पत्रा बनवला गेला. तांब्याच्या साच्याला पारा लावला गेला आणि त्यावर सोन्याचा पत्रा बसवला. तो पाऱ्याला चिकटून राहिला आणि क्रमपरत्वे तांब्यालासुद्धा. त्यानंतर हा साचा गरम केला गेला. पाऱ्याची वाफ झाली आणि सोन्याचे तांब्याच्या साच्याला वेष्टण झाले. परिसाने जसे मूळ धातूचे सोन्यात रूपांतर होत, त्याचप्रमाणे तांब्याची चांदणी सोन्याची झाली.
ह्या कलीच्या ताम्रयुगाला माझ्या भावरुपी सुवर्णाचं वेष्टण आहे. सत्ययुग हे कलियुगावर अध्यारोपण केले आहे. तांब्यावर पारा ओतून नंतर त्यावर सोन्याचा पत्रा बसवला. स्वामी आणि मी 'आमच्या प्रेमाचा पारा' कलियुगावर ओतून वरती सुवर्णयोग चिकटवत आहोत.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा