मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सूचना

सप्रेम साईराम,
           नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण श्री वसंतसाई ह्यांच्या ' इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३  ' ह्या पुस्तकातील लेखनाची मालिका सुरु करीत आहोत. दर महिन्याच्या ९ व २३ तारखेला  ' इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३ ' पुस्तक  क्रमशः टाकण्यात येईल.

*     *     *

 

इथेच याक्षणी मुक्ती- भाग
 

प्रस्तावना


        'इथेच याक्षणी मुक्ती'  ह्या पुस्तकाचा हा तिसरा भाग आहे. ह्याचे दोन भाग अगोदर प्रकाशित झाले आहेत.  पहिल्या भागामध्ये मुक्तिच्या सालोक्य,सामीप्य आणि सारुप्य  तीन अवस्थांवर  विवरण केले आहे. चौथ्या आणि अखेरच्या अवस्थेस सायुज्य मुक्ती म्हणतात. ही जीवन मुक्त अवस्था आहे म्हणजे जिवंतपणी देहामध्ये असतानाच मुक्ती ही अवस्था म्हणजे परमेश्वराशी योग.

         या पुस्तकात सायुज्य मुक्तीविषयी विवरण केले आहे. या पुस्तकांमध्ये या अवस्थेतील एका जीवात्म्याची अभिव्यक्ती व दिव्य अनुभव कथन केले आहेत. परमेश्वराशी योग झालेला जीवनमुक्त लेखन कसे करू शकतो? वाचन करता करता तुमच्या लक्षात येईल की हे अत्यंत अवघड कार्य आहे. जीवनातील प्रत्येक क्षण मी गीतेतील तत्त्वांचे आचरण करत जगले. माझ्या जीवनात मी पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत गीतेतील प्रत्येक अध्यायामधील शिकवण मी आचरणात आणली. अखेरीस मी सर्व धर्मांचा त्याग करून परमेश्वर चरणी शरणागत झाले.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहंत्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||


सर्वधर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून
तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांमधून सोडवीन. तू शोक करू नकोस.

             मी स्त्रीधर्म आणि माझ्या कर्तव्यांचा त्याग केला. केवळ परमेश्वराकरीता जगण्यासाठी ठरवून मी संन्यास घेतला आणि सर्वसंग परित्याग करत त्याग आणि प्रेम माझे जीवन बनले. 60 वर्षांच्या अखंड तपानंतर भगवान बाबांनी 27 मे 2001 रोजी माझा  अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. माझी दीर्घ आणि कठोर तपश्चर्या फलली आणि मी त्यांची झाले. जरी मी अशा अवस्थेत असले, तरी त्यांचे आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे. माझ्या पुस्तकांवर त्यांनी केलेली स्वाक्षरी, विभूती, कुंकू ,हळद ह्या सृजनीकरणातून मिळालेले त्यांचे आशीर्वाद  व त्यांचे हातरुमाल, केवळ हाच माझा अनमोल ठेवा आहे.  मला नावलौकिक पैसा धन व मलमत्ता इ. कोणत्याही गोष्टींमध्ये स्वारस्य नाही. मी अनुभवत असलेल्या दिव्य आनंदाचा तुम्हीसुद्धा अनुभव घ्यावा असे मला मनापासून वाटते. ह्या प्रत्येकाला मुक्ती प्राप्त होवो व ती मिळेपर्यंत माझे अश्रू वा माझा लढा थांबणार नाही. आपल्या ह्या करुणामयी परमेश्वराकडून मी सर्वांसाठी मुक्ती प्राप्त करून घेईन. हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.


उर्वरित प्रस्तावना पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा