ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "
७
कर्माचा हिशोब मिटला
कसे ते पाहू या. माझ्या प्रेमानी मी जगाची कर्म समतोल करते. ' बियॉंड द उपनिषद ' या पुस्तकात मी ' संस्कार ऑपेरेशन ' नावाचे प्रकरण लिहिले. अनेक जन्मांचे संस्कार, गहिरे ठसे हेच कर्मांचे ऋण आहे. याच ऋणांमुळे सर्वजण जन्म घेतात. जर आपले ऋण नसतील, तर आपण पुन्हा जन्म घेणार नाही. प्रत्येक कृतीचे होणारे परिणाम आपल्याला अनुभवावे लागतातच. आपल्या दुःखांचं हेच कारण आहे. पूर्वजन्मांमध्ये केलेल्या कर्मांचे आपल्याला परिमार्जन करायला हवे. राग, द्वेष, ईर्ष्या अशा सर्व दुर्गुणांचे मनात गहिरे संस्कार बनतात. ही ऋणं नाहीशी करण्यासाठी मी माझ्या खात्याचा वापर करते. मी माझ्या खात्यातले माझे प्रेम, विनम्रता, परमेश्वराचा ध्यास आणि राधाच्या १९ दैवी गुणांचे फायदे लोकांच्या खात्यात घालते. ते ऋणमुक्त होतात आणि मुक्ती मिळवतात.
माझ्या खात्यात काय आहे? माझ्या तपश्चर्येची शक्ती; माझा परमेश्वरासाठी असलेला तीव्र ध्यास, माझं प्रेम आहे. जसजसे मी साधनेचे फळ नाकारत गेले, तसतशी माझी तपश्चर्येची शक्ती वृद्धिंगत झाली. हीच शक्ती विश्वमुक्ती मिळवू शकते. ती प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब चुकता- करते. तपश्चर्येच्या बचत खात्यामधून कर्माची कर्ज चुकती होतात.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा