ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. "
७
कर्माचा हिशोब मिटला
एक उदाहरण पाहू या. द्वापारयुगात नारदमुनी आणि सत्यभामा यांचा कृष्ण कोणाचा आहे, यावरून विवाद झाला. जो कोणी कृष्णाची संपत्तीने तुला करू शकेल, तो कृष्णाचा हक्क दाखवेल. मोठा तराजू आणला गेला आणि कृष्ण त्यात एका बाजूला बसले. सत्यभामाने तिचे सर्व अलंकार, मौल्यवान रत्ने, आभूषणे, सोन्याचा लड्या इ. दुसऱ्या पारड्यात ठेवले. परंतु काटा तसुभरही हलला नाही. सत्यभामाजवळ आता काहीच शिल्लक राहिले नाही. काय करावे तिला सुचेना. ती हरली तर नारद कृष्णाला घेऊन जातील. सत्यभामा खूप घाबरली. हे ऐकल्यावर रुख्मिणी एक लहानसं तुळशीपत्र घेऊन तिथे आली. तिने तराजूच्या तीन वेळा प्रदक्षिणा घातली आणि कृष्णाची प्रार्थना करून ते पान दुसऱ्या पारड्यात टाकले आणि काय आश्चर्य ! तराजू समतोल झाला. सच्चा भक्तीने ठेवलेल्या तुळशीपत्राने कृष्णाच्या वजनाचा काटा समतोल केला. या प्रसंगातून जगाला हेच दाखवले गेले की अलंकार, सोने हे सर्व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी उपयोगी पडत नाही. परमेश्वराचे वजन काय ? ते कोण मोजू शकेल ? अगदी संपूर्ण विश्व एका बाजूला ठेवले तरीसुद्धा ते समतोल होऊ शकेल का ?
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा