रविवार, ३० जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."


१०
ऋण

             स्वामी म्हणाले," व्यष्टी,समष्टी,सृष्टी,परमेष्टी .... "

व्यष्टी-----  मानवी देह----- तपश्चर्य
समष्टी----- समाज -----दान
सृष्टी----- निर्मिती----- यज्ञ

             जेव्हा आपण ही तीन ऋण फेडतो, तेव्हा आपणास परमेष्टी- परमेश्वर प्राप्ती होईल.
             जन्मापासून मी जे तप केले ते व्यष्टी - त्यासाठी होते मी जे काही समाजासाठी करते ते समष्टी - दान आहे. हे मी अनेक शक्ती जशा प्रेमशक्ती, दुर्गाशक्ती, हयग्रीव शक्ती, धन्वंतरी शक्ती इ. च्या द्वारे केलेले दान होय.
            नवनिर्मिती, सृष्टी, यज्ञ; मी विश्वमुक्ती मागते आहे.  हे तिन्ही संपल्यावर मी परमीष्टी परमेश्वरात विलीन होईल.

*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २७ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

       " तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."


१०
ऋण

             आपल्या आचार, विचार, उच्चारांमध्ये सुसूत्रता आणून आपण आपले शरीर शुद्ध करू शकतो. या तिन्हींचे ऋण फेडण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. तुम्ही हे ऋण फेडले नाहीत तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे 'ऋण- प्रेम- सहाय्य- कृतज्ञता' यांचा सांधा ही सतत चालू राहणारी साखळी आहे. जर त्यात संतुलन राखले तर जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येईल.
              जन्मापासून आजपर्यंत मी हे कृतज्ञतेचे भाव अनुभवते आहे. म्हणूनच स्वामी म्हणाले,' तुझं जीवन यज्ञ आहे, तुझे भाव समिधा आहेत.' मी जे जे पाहिले, त्या प्रत्येक गोष्टीपासून आणि प्रत्येकापासून शिकत आले. मी कुक्कट विद्या, घड्याळ  विद्या, वृक्ष विद्या इ. अनेक विद्या लिहिल्या. या सर्वांनी मला शिकवले अशा प्रकारच्या कथा मी लिहिल्या. या सर्वांना मी गुरु मानते कारण त्यांच्यापासून मी शिकले. त्यांचे ऋण फेडण्यासाठीच मी वैश्विक मुक्ती मागितली आहे. माझे कृतज्ञतेचे भाव संपूर्ण अवकाशात भरले आहेत. ही  कृतज्ञता काही तांत्रिक किंवा भावहीन नाही. मी अगदी प्रेमाने उत्कृष्ट होऊन कृतज्ञतेच्या भावांनी बरसात करीत आहे. या शरीराला यातना देत मी किती तपश्चर्या केली आहे! माझं जीवन एक यज्ञच आहे. माझ्या तपश्चर्येच्या संपूर्ण शक्तीसाठी, माझी कृतज्ञता म्हणून मी विश्वमुक्ती देत आहे. हे  एक कृतज्ञतेचे अवकाशात फिरत आहेत. म्हणूनच ज्याला मदतीची गरज आहे त्यांच्याकडे ते जातील.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





रविवार, २३ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             २ जानेवारी २००१ सकाळचे ध्यान
वसंता: स्वामी! स्वामी! जगातल्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे. एकही व्यक्ती त्याला अपवाद नसावी. हे प्रिय प्रभु, कृपा प्रदान करा.
स्वामी: हो त्यांना खात्रीपूर्वक मोक्ष प्राप्ती होईल. तूच ते कार्य करणार आहेस तू दुर्गा आहेस.
वसंता: मी दुर्गा आहे मला सर्वांच्या समस्यांचे व कर्मांचे निराकरण केले पाहिजे व सर्वांना मुक्ती प्रदान केली पाहिजे.
             स्वामी: रडू नकोस. तुझ्याकडे सर्व शक्ती आहेत.
स्वामींनी मंगळसूत्र आशीर्वादित करून दिले तरच लग्न करायचे असा ईरोडच्या एका तरुणीने निश्चय केला होता. त्यानंतर मुलाखतीमध्ये स्वामींनी तिला मंगळसूत्र देण्याचे कबूल केले. वराची पसंती झाल्यावर स्वामींनी तिच्यासाठी मंगळसूत्र साक्षात केले व साडीही दिली. लग्न तिरुपती येथे पार पडले त्यांना आता एक कन्यारत्न आहे. दहा दिवसांपूर्वी मला तिचा फोन आला होता. तिच्या पतीस दुर्धर आजार झाल्याचे सांगितले. त्यासाठी तिने मला प्रार्थना करण्याची विनंती केली. मलाही खूप दुःख झाले. तिच्या पतीला जीवनदान मिळावे यासाठी मी स्वामींकडे आर्जवे केली.
             त्यांना सावित्री शक्ती द्यावी असे स्वामींनी मला ध्यानात सांगितले तसे मी तिला सांगितल्यानंतर ती दोन तारखेला सकाळी मला वडकमपट्टीत भेटायला आली. त्या दिवशी मी दुर्गेला अभिषेक केला होता. सावित्री शक्ती देण्यासाठी वापरलेले थोडेसे गंगाजल मी ठेवले होते त्यानंतर स्वामींनी दुर्गेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून तिला देण्यास सांगितले. स्वामी म्हणाले," तू तिला कर्मातून मुक्त केलेस तू केवळ तिलाच मदत केली नाहीस तर जगातील प्रत्येकाची तू दुःखांमधून सुटका करशील. तू गोकुळची राणी बनण्याऐवजी स्वतः दुःख सोसून लोकांची दुःख आणि कर्म सुसह्य करण्यासाठी येथे आली आहेस."
            दुपारी भक्त जमले व त्यांनी भजनी गायली. भजनी खूप सुंदर झाली! जेव्हा ईरोडच्या भक्ताने गायलेल्या एका हृदयस्पर्शी दुर्गेच्या भजनाने माझे स्वतःचे दुर्गे मध्ये रूपांतर झाल्याचे मी पाहिले. मी हातातील त्रिशूल आणि तिच्याभोवती एक वर्तुळ काढले आणि  ध्यानात गेले. स्वामींनी मला सावित्री शक्ती देण्यास सांगून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यास सांगितले. तसेच तिच्या कपाळावर विभूती लावून तिचा तिसरा नेत्र दाबण्यास सांगितले. त्यामुळे तिचे आज्ञाचक्र उघडण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
             मी स्वामींच्या सूचनांचे पालन केले तिने घरी जाऊन मंगळसूत्र घालावे असे मी सांगितले, परंतु मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे असा तिने आग्रह धरला. मी मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधले व म्हणाले," स्वामींनी मला हेच सांगितले होते मी त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी झाला." त्यानंतर तिने मला स्वामींनी दिलेले मंगळसूत्र दाखवले. त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार मंगळसूत्रास नाम चिन्ह असते त्याऐवजी याला बिंदी चिन्ह असल्याचे तिने सांगितले. स्वामींना याविषयी विचारले असता ते म्हणाले," मला माहित आहे..... केवळ हेच असायला हवे." ते पाहून मी स्वामींकडे मंगळसूत्राची मागणी केल्याची आठवण मला झाली मी अनेकदा मंगळसूत्रासाठी त्यांच्याकडे विलाप केला परंतु नेहमी ते माझे सांत्वन करून विषय बदलतात.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

       " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य काही नाही."


१०
ऋण

              तपस
              तप हे शरीरासाठी असते. या देहामुळे आपले अनेक फायदे झाले आहेत. रोजीच्या आपल्या असंख्य हालचालींचा परिणाम म्हणून आपले शरीर जर्जर होत जाते. ही जर्जर होण्याची क्रिया तपश्चर्याने समतोल राखायला हवी. तपश्चर्या म्हणजे काय नामस्मरण, जप, पूजा, सत्संग, पोथीवाचन, उपवास हे सर्व तप आहे.
             आपण जसे वृद्ध होत जातो, तसे आपले सांधे झिजतात, हाडे ठिसूळ होतात, दृष्टी अधू होते, ऐकू कमी येतो, दात पडतात आणि केसही पांढरे होतात. या सगळ्या गोष्टींवरून आपण जन्मभर किती काम केलं, किती प्रमाणात देह झिजला हे स्पष्ट होतं. आता आपण त्याचं संतुलन राखायला हवे. याला म्हणतात तप.
             म्हातारपणी शरीराला शक्ती मिळवण्यासाठी आपण औषध घेणे योग्य नाही. त्यापेक्षा तपश्चर्येने ते सशक्त, उत्साह पूर्ण बनवावे. औषधे, गोळ्यांनी तुम्ही शरीराचे ऋण संतुलित करू शकत नाही! ते तपश्चर्याने करायला हवे.


यज्ञ म्हणजे निर्मितीचे ऋण संतुलन करणे.
दान म्हणजे समाजाचे आपले देणे फेडणे.
तप म्हणजे देहाच्या ऋणांची परतफेड करणे.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, २० जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

   " तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही."


१०
ऋण

             आता आपण पाहूया की समाजाचे ऋण कसे फेडावे. आपला जन्म होतो तेव्हा आपण स्वतःचे स्वतः काहीही करू शकत नाही. सगळ्या गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. पालक मुलाला जेवू घालतात, कपडे घालतात. त्याचे लालनपालन करतात. पालक आणि शिक्षक मुलांना अनेक गोष्टींचे शिक्षण देतात. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्य, शेजारी तसेच मित्र मुलांच्या सर्वांगीण विकासात हातभार लावता. हे ऋण कसे फेडायचे? गीतेत सांगितले आहे की दानाने हे ऋण फेडता येते. दुसऱ्याच केलेली मदत म्हणजेच दान. उदा. अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान. तरीही आपण असे समजू नये,' मी दान करीत आहे.!' दान हे फक्त आपण दुसऱ्यास परत करावयाचे ऋण आहे. असा विचार नाही केलात तर अहंकार वाढेल. आपण बदल्यात कशाची तरी अपेक्षा करू आणि कर्मांच ऋण मागे राहील. त्याऐवजी आपण असा विचार करावा की, प्रत्येक दान म्हणजे तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याची मिळालेली संधीच होय.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १६ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
 

        " परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे. "


१०
ऋण


          आपल्याला पंचमहाभूतांचे खूप उपयोग आहेत. आपण श्वासावाटे प्राणवायू घेतो आणि उच्छवासावाटे  कर्बवायू बाहेर सोडतो. तुम्ही तुमच्या पैशांनी प्राणवायू विकत घेतला असे म्हणू शकता का? क्षणाक्षणाला आपण निसर्गावर अवलंबून आहोत, प्रत्येक श्वासाला प्राणवायू घेतो. हवेचे ऋण आपण कसे फेडणार आहोत? फक्त चांगले विचार करण्यानी ह्या ऋणांची परतफेड होईल. असे केले तर अवकाशाचे ऋण फिटेल. त्याचप्रमाणे, सर्व पंचमहाभुतांचे आपण ऋणी आहोत. सर्वजण पाण्याचा वापर करतात, मग आपण तराजू समतोल कस राखणार? जर आपण प्रत्येक कर्म यज्ञ म्हणून केले, तर पाऊस वेळच्यावेळी आणि योग्य प्रमाणात पडेल आणि आपले ऋण समतोल राहील. यज्ञ केले की पाऊस पडतो. त्यामुळे आपल्या पाण्याच्या वापराचे प्रमाण समतोल राहते. अशाप्रकारे आपण निर्मितीचे ऋण फेडतो.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १३ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
 

        " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते. "


१०
ऋण


           उदा. माझे वडील बागेतील तुळशीच्या आणि चमेलीच्या झाडांना पाणी घालण्यासाठी रोज सकाळ, संध्याकाळ दोन बादल्या पाणी उचलून आणत. ते जरी आजारी असले किंवा त्यांना ताप असला तरी सुद्धा झाडांना पाणी घालत. अरविंदन् आणि  मणिवन्नन् या माझ्या दोन मुलांनी ते काम करण्याची तयारी दर्शविली. पण ते म्हणाले,' पूजेसाठी तुळस आणि चमेली मी वापरतो, त्यामुळे झाडांना मीच पाणी घालून ऋणांची परतफेड करणार.' त्यांच्या अखेरचा श्वासापर्यंत त्यांनी यात खंड पडू दिला नाही.
            अशाप्रकारे आपण सृष्टीच्या ऋणांची परतफेड करतो. हा सुद्धा एक यज्ञच आहे. माझे वडील रोज न चुकता चरख्यावर सूत कातायचे. ते म्हणाले,' आपण रोज कपडे घालतो. म्हणूनच मी रोज सूट करणार.' याला ते ' कातण्याचा यज्ञ' म्हणत.
             सृष्टीकडून आपल्याला जे मिळतं, त्याचे आपण ऋण फेडायला हवे. शारीरिक प्रयत्नांनी हा यज्ञ केला पाहिजे. "मी पैसे देऊन कपडे विकत घेतो," असं बोलू नये. किंबहुना असा विचारही करू नये. आपण जे करतो ते एक यज्ञ म्हणून करावे. हा एक मानसिक दृष्टिकोन आहे. आपला वार्षिक दृष्टिकोन आणि आपल्या भावना यामुळे तो यज्ञ होतो. एक व्यक्ती बागेला पाणी घालते; हे त्याचे कर्म, कृती झाली. माझे वडील तुळशीच्या रोपांना कृतज्ञता व्यक्त करीत पाणी घालायचे. हा यज्ञ झाला.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, १० जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
 

        " परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सान्निध्य."


१०
ऋण


            गीतेचा १७ व्या अध्यायात यज्ञ, धन आणि तपाविषयी सांगितले आहे. आपण ऋणमुक्त होण्यासाठी जन्मास आलो आहोत. मुलांचे पालकांप्रती आणि पालकांचे मुलांप्रती ऋण आहे. नवरा बायकोचे एकमेकांना देणे आहे. जन्म घेऊन कुटुंबाच्या अनेक सदस्यांमध्ये राहून हे ऋण फेडले जाते. या ऋणानुरूप कर्म कायदा कार्य करतो. कर्मानुसार ऋणं असतात. आपण पूर्णपणे ऋणमुक्त होईपर्यंत या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही.

ऋण-प्रेम-मदत-कृतज्ञता

            उदा. ऋणांमुळे माणसामध्ये त्याच्या पत्नी, मुले वगैरेंवरील प्रेम उत्पन्न होते. या ऋणांमुळे प्रेम उत्पन्न होते आणि परिणामतः बांधिलकी निर्माण होते. या बंधनांमुळे कुटुंबात सर्वजण एकदुसऱ्यास मदत करतात. पालक मुलांना मदत करतात, मुले पालकांना. या मदतीतून कृतज्ञता उत्पन्न होते.
            आता आपण यज्ञा विषयी पाहूया. यज्ञ हे सुद्धा एक ऋणच आहे. कसे ? हे आपण निर्मितीला देणे असलेले ऋण आहे. जे काही कर्म होईल ते एक ऋण म्हणून करणे यालाच यज्ञ म्हणता येईल.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ६ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

          " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते."


१०
ऋण


            स्वामी आणि मी, शिव-शक्ती म्हणून त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांच्या भावनांना रूप देतो. अशाप्रकारे वैश्विक कृतज्ञतेचे भाव मानवतेला मदत करण्यासाठी कार्यरत होतात.
            यामिनीने विचारले,'कृतज्ञतेचे भाव प्रेमाच्या पलीकडे असतात का?'
             सर्वांवर प्रेम करणे हा माझा स्वभाव आहे. प्रेम आणि करुणा हाच माझा स्वभाव आहे. आपल्याला कोणाकडून काही मदत मिळाली तर आपण त्यासाठी कृतज्ञ राहतो. कोणी आपल्याला मदत केली तर आपल्याला किती आनंद होतो! लगेच आपल्या मनात विचार येतो,' आपण त्याची परतफेड कशी बरं करू शकू? हे आहेत कृतज्ञतेचे भाव.
             ही कृतज्ञता कधी जागृत होते? जेव्हा एखाद्याकडून आपल्याला सांत्वनेची दोन शब्द, वस्तू अथवा प्रत्यक्ष मदत मिळते, तेव्हा आपल्याला त्याची परतफेड कराविशी वाटते. यालाच म्हणतात कृतज्ञता. मदत मिळाली की आपण प्रेमाचा अनुभव घेतो. त्यावेळी कृतज्ञतेद्वारे प्रेम व्यक्त करून आपण परतफेड करतो. हेच एकमेकांवरील प्रेम आहे. प्रेम मदत आणि कृतज्ञता हे अविभाज्य आहेत. जिथे यातील एक आहे, तिथे इतर दोन्ही असलेच पाहिजेत.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, २ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

          " माया सत्यावर आवरण घालते. एकोहम् बहुस्यामी (एकातून अनेकत्व) हे सत्य जाणून घ्या. "


    
   वैश्विक कृतज्ञता
          


           एसव्हींना पित्ताशयातील खड्याचा त्रास होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ते इथे आले आणि मी त्यांच्या पोटावर विभूती लावली आणि प्रार्थना केली. जेव्हा ते स्कॅनिंगसाठी पुन्हा डॉक्टर कडे गेले तेव्हा खडे नाहीसे झालेले आढळले.
          माझे वैश्विक कृतज्ञतेचे भाव कसे कार्यरत होतात हेच या सर्व घटनांवरून स्पष्ट होते.

*     *     *


१०
ऋण


             त्रेता युगात राम सीतेचे मन धर्मापासून यत्किंचितही ढळले नाही. हे कसं शक्य झालं याची सर्वांना आश्चर्य वाटले. या प्रश्नाचे वैश्विक देवी भावनांकडून उत्तर आले, 'नक्कीच शक्य आहे.' हे उत्तर अवकाशात भ्रमण करीत होते आणि द्वापारयुगात प्रभू शंकर आणि माता पार्वतींनी या भावनांना रूप दिले. हे रूप म्हणजेच राधा. स्वामींनी हे सत्य मला सांगितले आणि मी याबद्दल मागेच लिहिले आहे. धोतरावर 'शिव दत्त' म्हणजे शिवाचं दत्तक मूल असे लिहून त्यांनी त्याचा पुरावाही दिला आहे.
             आता सुद्धा 'सत्ययुग आणि कर्मकायदा' हे पुस्तक वाचून काही जणांना नवल वाटले की, 'आता फक्त २८ वर्षे उरली आहेत! आपण कर्म कायद्यातून कसे सुटू शकतो?' जो कोणी तळमळीने प्रार्थना करेल, त्याला हे वैश्विक देवी भाव मदत करतील, त्यामुळे त्यांची कर्म कमी होतील.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम