ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
वसंता: स्वामी! स्वामी! जगातल्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे. एकही व्यक्ती त्याला अपवाद नसावी. हे प्रिय प्रभु, कृपा प्रदान करा.
स्वामी: हो त्यांना खात्रीपूर्वक मोक्ष प्राप्ती होईल. तूच ते कार्य करणार आहेस तू दुर्गा आहेस.
वसंता: मी दुर्गा आहे मला सर्वांच्या समस्यांचे व कर्मांचे निराकरण केले पाहिजे व सर्वांना मुक्ती प्रदान केली पाहिजे.
स्वामी: रडू नकोस. तुझ्याकडे सर्व शक्ती आहेत.
स्वामींनी मंगळसूत्र आशीर्वादित करून दिले तरच लग्न करायचे असा ईरोडच्या एका तरुणीने निश्चय केला होता. त्यानंतर मुलाखतीमध्ये स्वामींनी तिला मंगळसूत्र देण्याचे कबूल केले. वराची पसंती झाल्यावर स्वामींनी तिच्यासाठी मंगळसूत्र साक्षात केले व साडीही दिली. लग्न तिरुपती येथे पार पडले त्यांना आता एक कन्यारत्न आहे. दहा दिवसांपूर्वी मला तिचा फोन आला होता. तिच्या पतीस दुर्धर आजार झाल्याचे सांगितले. त्यासाठी तिने मला प्रार्थना करण्याची विनंती केली. मलाही खूप दुःख झाले. तिच्या पतीला जीवनदान मिळावे यासाठी मी स्वामींकडे आर्जवे केली.
त्यांना सावित्री शक्ती द्यावी असे स्वामींनी मला ध्यानात सांगितले तसे मी तिला सांगितल्यानंतर ती दोन तारखेला सकाळी मला वडकमपट्टीत भेटायला आली. त्या दिवशी मी दुर्गेला अभिषेक केला होता. सावित्री शक्ती देण्यासाठी वापरलेले थोडेसे गंगाजल मी ठेवले होते त्यानंतर स्वामींनी दुर्गेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून तिला देण्यास सांगितले. स्वामी म्हणाले," तू तिला कर्मातून मुक्त केलेस तू केवळ तिलाच मदत केली नाहीस तर जगातील प्रत्येकाची तू दुःखांमधून सुटका करशील. तू गोकुळची राणी बनण्याऐवजी स्वतः दुःख सोसून लोकांची दुःख आणि कर्म सुसह्य करण्यासाठी येथे आली आहेस."
दुपारी भक्त जमले व त्यांनी भजनी गायली. भजनी खूप सुंदर झाली! जेव्हा ईरोडच्या भक्ताने गायलेल्या एका हृदयस्पर्शी दुर्गेच्या भजनाने माझे स्वतःचे दुर्गे मध्ये रूपांतर झाल्याचे मी पाहिले. मी हातातील त्रिशूल आणि तिच्याभोवती एक वर्तुळ काढले आणि ध्यानात गेले. स्वामींनी मला सावित्री शक्ती देण्यास सांगून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यास सांगितले. तसेच तिच्या कपाळावर विभूती लावून तिचा तिसरा नेत्र दाबण्यास सांगितले. त्यामुळे तिचे आज्ञाचक्र उघडण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
मी स्वामींच्या सूचनांचे पालन केले तिने घरी जाऊन मंगळसूत्र घालावे असे मी सांगितले, परंतु मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे असा तिने आग्रह धरला. मी मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधले व म्हणाले," स्वामींनी मला हेच सांगितले होते मी त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी झाला." त्यानंतर तिने मला स्वामींनी दिलेले मंगळसूत्र दाखवले. त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार मंगळसूत्रास नाम चिन्ह असते त्याऐवजी याला बिंदी चिन्ह असल्याचे तिने सांगितले. स्वामींना याविषयी विचारले असता ते म्हणाले," मला माहित आहे..... केवळ हेच असायला हवे." ते पाहून मी स्वामींकडे मंगळसूत्राची मागणी केल्याची आठवण मला झाली मी अनेकदा मंगळसूत्रासाठी त्यांच्याकडे विलाप केला परंतु नेहमी ते माझे सांत्वन करून विषय बदलतात.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा