ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
१०
ऋण
आपल्या आचार, विचार, उच्चारांमध्ये सुसूत्रता आणून आपण आपले शरीर शुद्ध करू शकतो. या तिन्हींचे ऋण फेडण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. तुम्ही हे ऋण फेडले नाहीत तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे 'ऋण- प्रेम- सहाय्य- कृतज्ञता' यांचा सांधा ही सतत चालू राहणारी साखळी आहे. जर त्यात संतुलन राखले तर जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येईल.
जन्मापासून आजपर्यंत मी हे कृतज्ञतेचे भाव अनुभवते आहे. म्हणूनच स्वामी म्हणाले,' तुझं जीवन यज्ञ आहे, तुझे भाव समिधा आहेत.' मी जे जे पाहिले, त्या प्रत्येक गोष्टीपासून आणि प्रत्येकापासून शिकत आले. मी कुक्कट विद्या, घड्याळ विद्या, वृक्ष विद्या इ. अनेक विद्या लिहिल्या. या सर्वांनी मला शिकवले अशा प्रकारच्या कथा मी लिहिल्या. या सर्वांना मी गुरु मानते कारण त्यांच्यापासून मी शिकले. त्यांचे ऋण फेडण्यासाठीच मी वैश्विक मुक्ती मागितली आहे. माझे कृतज्ञतेचे भाव संपूर्ण अवकाशात भरले आहेत. ही कृतज्ञता काही तांत्रिक किंवा भावहीन नाही. मी अगदी प्रेमाने उत्कृष्ट होऊन कृतज्ञतेच्या भावांनी बरसात करीत आहे. या शरीराला यातना देत मी किती तपश्चर्या केली आहे! माझं जीवन एक यज्ञच आहे. माझ्या तपश्चर्येच्या संपूर्ण शक्तीसाठी, माझी कृतज्ञता म्हणून मी विश्वमुक्ती देत आहे. हे एक कृतज्ञतेचे अवकाशात फिरत आहेत. म्हणूनच ज्याला मदतीची गरज आहे त्यांच्याकडे ते जातील.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा