ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे. "
१०
ऋण
आपल्याला पंचमहाभूतांचे खूप उपयोग आहेत. आपण श्वासावाटे प्राणवायू घेतो आणि उच्छवासावाटे कर्बवायू बाहेर सोडतो. तुम्ही तुमच्या पैशांनी प्राणवायू विकत घेतला असे म्हणू शकता का? क्षणाक्षणाला आपण निसर्गावर अवलंबून आहोत, प्रत्येक श्वासाला प्राणवायू घेतो. हवेचे ऋण आपण कसे फेडणार आहोत? फक्त चांगले विचार करण्यानी ह्या ऋणांची परतफेड होईल. असे केले तर अवकाशाचे ऋण फिटेल. त्याचप्रमाणे, सर्व पंचमहाभुतांचे आपण ऋणी आहोत. सर्वजण पाण्याचा वापर करतात, मग आपण तराजू समतोल कस राखणार? जर आपण प्रत्येक कर्म यज्ञ म्हणून केले, तर पाऊस वेळच्यावेळी आणि योग्य प्रमाणात पडेल आणि आपले ऋण समतोल राहील. यज्ञ केले की पाऊस पडतो. त्यामुळे आपल्या पाण्याच्या वापराचे प्रमाण समतोल राहते. अशाप्रकारे आपण निर्मितीचे ऋण फेडतो.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा