गुरुवार, १३ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
 

        " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते. "


१०
ऋण


           उदा. माझे वडील बागेतील तुळशीच्या आणि चमेलीच्या झाडांना पाणी घालण्यासाठी रोज सकाळ, संध्याकाळ दोन बादल्या पाणी उचलून आणत. ते जरी आजारी असले किंवा त्यांना ताप असला तरी सुद्धा झाडांना पाणी घालत. अरविंदन् आणि  मणिवन्नन् या माझ्या दोन मुलांनी ते काम करण्याची तयारी दर्शविली. पण ते म्हणाले,' पूजेसाठी तुळस आणि चमेली मी वापरतो, त्यामुळे झाडांना मीच पाणी घालून ऋणांची परतफेड करणार.' त्यांच्या अखेरचा श्वासापर्यंत त्यांनी यात खंड पडू दिला नाही.
            अशाप्रकारे आपण सृष्टीच्या ऋणांची परतफेड करतो. हा सुद्धा एक यज्ञच आहे. माझे वडील रोज न चुकता चरख्यावर सूत कातायचे. ते म्हणाले,' आपण रोज कपडे घालतो. म्हणूनच मी रोज सूट करणार.' याला ते ' कातण्याचा यज्ञ' म्हणत.
             सृष्टीकडून आपल्याला जे मिळतं, त्याचे आपण ऋण फेडायला हवे. शारीरिक प्रयत्नांनी हा यज्ञ केला पाहिजे. "मी पैसे देऊन कपडे विकत घेतो," असं बोलू नये. किंबहुना असा विचारही करू नये. आपण जे करतो ते एक यज्ञ म्हणून करावे. हा एक मानसिक दृष्टिकोन आहे. आपला वार्षिक दृष्टिकोन आणि आपल्या भावना यामुळे तो यज्ञ होतो. एक व्यक्ती बागेला पाणी घालते; हे त्याचे कर्म, कृती झाली. माझे वडील तुळशीच्या रोपांना कृतज्ञता व्यक्त करीत पाणी घालायचे. हा यज्ञ झाला.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा