गुरुवार, ६ जून, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

          " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप. या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते."


१०
ऋण


            स्वामी आणि मी, शिव-शक्ती म्हणून त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांच्या भावनांना रूप देतो. अशाप्रकारे वैश्विक कृतज्ञतेचे भाव मानवतेला मदत करण्यासाठी कार्यरत होतात.
            यामिनीने विचारले,'कृतज्ञतेचे भाव प्रेमाच्या पलीकडे असतात का?'
             सर्वांवर प्रेम करणे हा माझा स्वभाव आहे. प्रेम आणि करुणा हाच माझा स्वभाव आहे. आपल्याला कोणाकडून काही मदत मिळाली तर आपण त्यासाठी कृतज्ञ राहतो. कोणी आपल्याला मदत केली तर आपल्याला किती आनंद होतो! लगेच आपल्या मनात विचार येतो,' आपण त्याची परतफेड कशी बरं करू शकू? हे आहेत कृतज्ञतेचे भाव.
             ही कृतज्ञता कधी जागृत होते? जेव्हा एखाद्याकडून आपल्याला सांत्वनेची दोन शब्द, वस्तू अथवा प्रत्यक्ष मदत मिळते, तेव्हा आपल्याला त्याची परतफेड कराविशी वाटते. यालाच म्हणतात कृतज्ञता. मदत मिळाली की आपण प्रेमाचा अनुभव घेतो. त्यावेळी कृतज्ञतेद्वारे प्रेम व्यक्त करून आपण परतफेड करतो. हेच एकमेकांवरील प्रेम आहे. प्रेम मदत आणि कृतज्ञता हे अविभाज्य आहेत. जिथे यातील एक आहे, तिथे इतर दोन्ही असलेच पाहिजेत.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा