ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य काही नाही."
१०
ऋण
तपस
तप हे शरीरासाठी असते. या देहामुळे आपले अनेक फायदे झाले आहेत. रोजीच्या आपल्या असंख्य हालचालींचा परिणाम म्हणून आपले शरीर जर्जर होत जाते. ही जर्जर होण्याची क्रिया तपश्चर्याने समतोल राखायला हवी. तपश्चर्या म्हणजे काय नामस्मरण, जप, पूजा, सत्संग, पोथीवाचन, उपवास हे सर्व तप आहे.
आपण जसे वृद्ध होत जातो, तसे आपले सांधे झिजतात, हाडे ठिसूळ होतात, दृष्टी अधू होते, ऐकू कमी येतो, दात पडतात आणि केसही पांढरे होतात. या सगळ्या गोष्टींवरून आपण जन्मभर किती काम केलं, किती प्रमाणात देह झिजला हे स्पष्ट होतं. आता आपण त्याचं संतुलन राखायला हवे. याला म्हणतात तप.
म्हातारपणी शरीराला शक्ती मिळवण्यासाठी आपण औषध घेणे योग्य नाही. त्यापेक्षा तपश्चर्येने ते सशक्त, उत्साह पूर्ण बनवावे. औषधे, गोळ्यांनी तुम्ही शरीराचे ऋण संतुलित करू शकत नाही! ते तपश्चर्याने करायला हवे.
यज्ञ म्हणजे निर्मितीचे ऋण संतुलन करणे.
दान म्हणजे समाजाचे आपले देणे फेडणे.
तप म्हणजे देहाच्या ऋणांची परतफेड करणे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा