रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

"अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा."

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

           मंथरा परमेश्वराच्या विरुद्ध कशी वागली हे आपण पाहिले. तीच मंथरा पुढील युगात कुब्जा म्हणून जन्माला आली. ती जरी कंसाची दासी होती तरीसुद्धा तिने श्रीकृष्णाला चंदन दिले. एका क्षणात, कृष्णाने कुब्जेचं पोक दूर केले आणि ती एक सुंदर स्त्री झाली.
            त्याचप्रमाणे आता सात लोक मला विरोध करीत आहेत. स्वामी म्हणाले की ते मला ७ फेब्रुवारी २००८ ला बोलवतील. त्यावेळी मी 'दिर्घायु होवोत ' ची अनेक काव्य रचली होती. आता स्वामींनी मला ती सर्व यज्ञात आहुती देण्यास सांगितली, कारण ती काव्य कर्मकायद्याच्या कार्यात अडथळा होत आहेत. मी याबद्दल 'सत्ययुग आणि कर्मकायदा' पुस्तकात लिहिले आहे. मी त्या लोकांची नव्हे, तर त्यांच्या दुर्गुणांची यज्ञात आहुती दिली आहे. मला जगातील वाईट भावना नष्ट करायच्या आहेत. यज्ञात सर्व आहुती देण्याची क्रिया म्हणजेच लोकांना नष्ट करणे नव्हे तर वाईट भावना नष्ट करणे होय.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

        " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

            त्रेतायुगात, मंथरा दासीनी कैकयीचं मन कलुषित केले. तिनी दशरथाकडे तिचे दोन वर मागण्यासाठी कैकयीचं मन वळवले. एक वर असा की भरताला राज्याभिषेक आणि दुसरा वर म्हणजे श्रीरामाला वनवास.
           हे सर्व असे झाले.
           दशरथाचा मृत्यु झाल्यावर भरत अयोध्येस परतला आणि कैकयीलाही पश्चात्ताप झाला. तिनेसुद्धा अरण्यात जाऊन रामाला अयोध्येस परत बोलावले. तरीसुद्धा राम आणि सीता यांचे अरण्यात जाणे हेच नियतीला मान्य होते. कारण त्यामुळे अवतारकार्य सुरु होऊन राक्षस मारले गेले. मंथरा आणि कैकयी ह्या रामाला वनवासात पाठवण्यासाठी फक्त एक साधन होत्या. जर हे झाले नसते तर रामायण घडलेच नसते. त्या दोघी महान अवतरकार्याच्या साधन आहेत! इतकंच. आता सर्व जग त्यांना दोष देतं, परंतु त्या फक्त परमेश्वराच्या हातातील बुद्धीबळाच्या सोंगट्याच होत्या. त्यांना त्यांची चूक लगेचच कळली. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
 स्वामी - बघ, तू राधा नाहीस का ? हे तुझे घरं नाही का ? अर्धा तास सारं विसर आणि आनंद घे.
वसंता - स्वामी, मला माझ्यासाठी काहीही नको. समस्त विश्वास परमानंदाची अनुभूती मिळायला हवी. तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. स्वामी, स्वामी कृपा करा, दया करा.
स्वामी - रडू नकोस, शांत हो. तुला काहीतरी विचारायचे होते ना, विचार.
मला मदुराईहून आलेल्या फोनची आठवण झाली.
वसंता - स्वामी ! ते भक्त येथे माझ्यासाठी एक मांगल्य घेऊन येतो म्हणाले. आपण कोणाच्या विवाहासाठी ते मांगल्य देणार आहोत, सांगा ना स्वामी.
स्वामी - ते तुझ्यासाठी आहे. ध्यान सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी तू ते तुझ्या गळ्यात घाल. ते तुझे आहे. त्यानंतर जगाशी तुझे कोणतेही नाते राहणार नाही.
वसंता - स्वामी ! काय सांगताय, माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीय. असं घडू शकत, हे मला स्वप्नातही वाटल नव्हत. परमेश्वरा, असं घडू शकत ? माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.
स्वामी - हो हे घडणार आहे. तुझे जुने मंगळसूत्र दुर्गेच्या गळ्यात घाल. सर्व भौतिक बंधातून तू मुक्त होशील. तू फक्त माझी आहेस हे त्यादिवशी मी जगाला दाखवून देईन. सर्व संतमहात्मे, देवदेवता ह्या शुभघडीची प्रतिक्षा करत आहेत. तो अत्यंत मंगल दिन असेल; जगासाठी उज्ज्वल प्रकाशाचा दिवस असेल. हे मांगल्य आपल्या मधील नाते घोषित करेल. हे घडलेच पाहिजे. त्यानंतरच अवताराचे कार्य पूर्णत्वास जाईल. जगातील लोकं ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

        " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

           स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व केले.
१७ फेब्रुवारी २००९
वसंता- तुम्ही ही पुस्तकं पुस्तकांच्या दुकानात ठेवाल का?
स्वामी- नक्की! आपण कोण आहोत हे जगाला दाखविण्याची वेळ आता आली आहे.
वसंता- स्वामी, आता मला ना भय ना चिंता. मी मुक्त आहे. कोणी पुस्तक वाचून त्याला त्याची चूक उमगली, तर प्लीज त्याला क्षमा करा. मी आत (आश्रमात) येईन तेव्हा मी सर्वांना 'दीर्घायु होवोत' असे सांगायला हवे.
स्वामी- ज्यांनी पापं केली आहेत त्यांच्यासाठी हे कसं  शक्य आहे ? त्यांना शिक्षा व्हायला नको का.
वसंता- स्वामी, कैकयी आणि मंथरानीसुद्धा पाप केलं, पण त्या दैवी नाट्याची साधनं होत्या. त्या बुद्धीबळाच्या सोंगट्यांप्रमाणे होत्या.  त्या जर तशा नसत्या वागल्या तर रामायण कसं घडलं असतं? बिचारे!
स्वामी- या जगात तुझ्यासारखे कोण बरे असेल? तू अशी कशी बरं आहेस? तू जगन्माता आहेस हेच यावरून दिसून येते.
वसंता- स्वामी, मंथरा हीच द्वापारयुगातील कुब्जा होती नं!
स्वामी- मंथरांनी कैकयीचे हृदय आणि मन कलुषित केले. कैकयीला तिची चूक कळल्यावर ती बदलली. त्यानंतर मंथरानी  काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. द्वापारयुगात, तिनी कृष्णाला चंदन दिल्यावर, कृष्णानी कुब्जेला सुंदर स्त्री बनवले. तिनी परमेश्वराला मदत केली म्हणून त्यांनी तिला क्षमा केली.... पण तुला आता सर्वांनाच माफ करायचे आहे. हा एक परमेश्वरी गुण आहे.
ध्यानाची समाप्ती.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम