ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना, साधना, साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
कर्मकायदा पुस्तकात, स्वामींनी माझ्याविरुद्ध असलेल्या सात जणांची नावे सांगितली. त्यांची फक्त कृतीच माझ्याविरुद्ध नाही तर, मी मागत असलेल्या सत्ययुगाचा उदय होण्यासाठी ते विलंब करीत आहेत. स्वामींनी मला त्यांची नशीबं कर्मकायद्याच्या हाती सोपवून देण्यास सांगितले. पूर्वी मी स्वामींकडे वर मागितला होता की जो कोणी माझ्याविरुद्ध वागेल किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्याला कर्मकायदा लागू होऊ नये. स्वामी म्हणाले की या वरामुळे कर्मकायदा कार्यरत न होता बांधला गेला आणि सत्ययुगाचा उदय लांबणीवर पडला. ते पुढे म्हणाले," तुझ्या दीर्घायु होवो च्या काव्यांनी पण त्यांना संरक्षण दिलेस. अशा रितीने तू त्यांना दुहेरी संरक्षण देत आहेस. कर्मकायदा त्यांच्यावर कार्यरत होऊ शकत नाही. वैकुंठ एकादशीला ही काव्ये यज्ञात टाक आणि तू त्यांचा भावसंहार कर."
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा