रविवार, १ सप्टेंबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

            कसं बरं द्यावं? मी एडींशी बोलले. स्वामींपर्यंत कसं पाठवता येईल. याविषयी आम्ही दोघांनी चर्चा केली. मी स्वामींना पत्र लिहिले. कोणाबरोबर पाठवावे? आम्ही पाच सहा दूतांच्या नावांचा विचार केला; शेवटी एक दूत निवडला. मी एडींना पत्र दिले आणि त्यांनी ते दूताला पोस्ट केले. यामिनी आश्रमात आल्या तेव्हा मी त्यांना सर्वकाही सविस्तर सांगितले.
संध्याकाळचे ध्यान
वसंता- स्वामी,मी तुम्हाला पत्र पाठवले आहे प्लीज घ्या.
स्वामी- रडू नकोस तू पुस्तक पाठव बरं!
वसंता- जर कोणी हे बघितलं तर ते काहीतरी करतील मला ते सहन होणार नाही.
स्वामी- तू अशी रडतेस कशाला? काही होणार नाही. तू पुस्तकं पाठव. मी त्यांना बुकस्टॉल मध्ये ठेवायला सांगीन.
वसंता- नाही, नाही स्वामी..... ते मला काहीतरी करतील. ते मला नको आहे.
स्वामी- तू सकारात्मक विचार कर, काही होणार नाही. मी वचन देतो.
वसंता- जर काही झालं तर मी तुमच्या शिवाय जगूच शकणार नाही.
स्वामी- आपल्याला कोणीही अलग करू शकत नाही. सगळं काही ठीक होईल. जेव्हा आपण प्रत्यक्षपणे एकमेकांना भेटू तेव्हा सर्व ठीक होईल. आता आपली एकत्र येण्याची वेळ येत आहे.
वसंता- तुम्ही पत्र घेतले तरंच मी पुस्तकं पाठवीन.
ध्यानाची समाप्ती.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा