ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
वसंता - स्वामी, मला माझ्यासाठी काहीही नको. समस्त विश्वास परमानंदाची अनुभूती मिळायला हवी. तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. स्वामी, स्वामी कृपा करा, दया करा.
स्वामी - रडू नकोस, शांत हो. तुला काहीतरी विचारायचे होते ना, विचार.
मला मदुराईहून आलेल्या फोनची आठवण झाली.
वसंता - स्वामी ! ते भक्त येथे माझ्यासाठी एक मांगल्य घेऊन येतो म्हणाले. आपण कोणाच्या विवाहासाठी ते मांगल्य देणार आहोत, सांगा ना स्वामी.
स्वामी - ते तुझ्यासाठी आहे. ध्यान सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी तू ते तुझ्या गळ्यात घाल. ते तुझे आहे. त्यानंतर जगाशी तुझे कोणतेही नाते राहणार नाही.
वसंता - स्वामी ! काय सांगताय, माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीय. असं घडू शकत, हे मला स्वप्नातही वाटल नव्हत. परमेश्वरा, असं घडू शकत ? माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.
स्वामी - हो हे घडणार आहे. तुझे जुने मंगळसूत्र दुर्गेच्या गळ्यात घाल. सर्व भौतिक बंधातून तू मुक्त होशील. तू फक्त माझी आहेस हे त्यादिवशी मी जगाला दाखवून देईन. सर्व संतमहात्मे, देवदेवता ह्या शुभघडीची प्रतिक्षा करत आहेत. तो अत्यंत मंगल दिन असेल; जगासाठी उज्ज्वल प्रकाशाचा दिवस असेल. हे मांगल्य आपल्या मधील नाते घोषित करेल. हे घडलेच पाहिजे. त्यानंतरच अवताराचे कार्य पूर्णत्वास जाईल. जगातील लोकं ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा