ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
१६ फेब्रुवारी २००९ ध्यान.
वसंता- मी त्यांना ५० पुस्तकं पाठवायला सांगितली आहेत. त्यासोबत आम्ही त्यासंबंधी पत्रही ठेवले आहे.
स्वामी- तू त्यांना पुस्तके पाठवायला सांगितलंस नं, बाकी सर्व काही मी करीन.
वसंता- आश्रमातील लोक जेव्हा हे पुस्तक वाचतील, तेव्हा त्यांची मनं उद्विग्र होतील.
स्वामी- त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. तू कशाला चिंता करतेस? या पुस्तकांद्वारे मी तुला बोलवीन. मी त्यांना हे पुस्तक पुस्तकालयात ठेवायला सांगेन.
वसंता- खरंच स्वामी?
स्वामी- खरंच. मी त्यांच्यामार्फत तुला बोलवीन. हे पुस्तक सर्वांना शॉक देण्याच्या उपचारासारखेच असेल.
वसंता- स्वामी, तुम्ही जे सांगता ते मी पत्रात लिहिन आणि तुम्हाला पाठवीन.
स्वामी- तू लिही. मला पाठव. मी ते घेईन.
ध्यानाची समाप्ती.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा