ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरुपौर्णिमेचा संदेश
ॐ श्री साई राम
भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र दिवस आहे.
आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरूंच्या प्रती पूर्ण श्रद्धेने कृतज्ञता समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे.
जसा पौर्णिमेचा चंद्रमा आकाशातील अंध:काराला दूर करतो तसेच गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंध:काराला दूर करतो.
तो कोणता अंधकार आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या बंधनात टाकतो?
अविद्या, अज्ञान, भ्रम, अहंकार देहाभिमान यामुळे आपण नित्य आणि अनित्य यामधील भेद ओळखू शकत नाही.काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे तसेच परमेश्वराला कशी भक्ती आणि कसा भक्त प्रिय आहे हेच आपल्याला समजत नाही.
हे खरे अज्ञान आहे. गुरूंचा अनुग्रह झाला की आपल्या जीवनातील हे अज्ञान दूर होते.
स्वामींनी मानवतेला सर्वप्रथम कोणता संदेश दिला होता?
" मानस भज रे गुरु चरणम
दुस्तर भवसागर तरणम "
अर्थात
मनाला गुरूंच्या चरणावर स्थिर करा
जेव्हा आपले मन गुरूंच्या चरणांवर स्थिर होते आणि हेच आपल्याला भवसागरातून तरुन नेते म्हणून जीवन मार्गावर वाटचाल करताना त्यांच्या आज्ञेचे पालन करा. त्यांची शिकवण आचरणात आणा.
आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये गुरूंचा महिमा जाणून घेण्याचाही दिवस आहे.
स्वामींनी म्हटले आहे सत्य बोला धर्माचे(सदाचरण)पालन करा. मातापित्यांचा सन्मान करा.सेवा करा. हीच माझी गुरुदक्षिणा आहे.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा