ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय २
कर्मकायदा - अवतार कायदा
मी स्वतः विश्व म्हणून विस्तार पावते, वसंतमयम् होते. यावेळेस मी अखिल विश्वास दिव्यत्वाकडे नेऊ शकते. मी सर्वांना जीवन मुक्त अवस्थेकडे नेते; हे मी साध्य केले आहे. ७३ वर्षे मी केलेल्या भगवंतावरील एकाग्र चिंतनामधून मी सर्व झाले; वसंतमयम् झाले. माझ्या गुण वैशिष्ट्यांद्वारे मी सर्वांचे गहिरे ठसे ( संस्कार )नाहीसे करते व त्या ठिकाणी माझे भाव ठसविते. मी उपनिषदे व वेदांच्या पलीकडे सत्य माझ्या लिखाणातून उघड करते. आज पर्यंत या जगात उघडणं झालेली सत्ये! हे ज्ञान जगाला दाखविलं गेलं नव्हतं! याप्रमाणे पुढील अवताराच्या जीवनावर मी पाच खंड लिहिले आहेत. पूर्वी कोणीही भविष्यातील अवतारा विषयी असे लिहिले नाही. स्वामींनी मला ' मी विना मी ' असे आणले व तेच मला लिहिण्यास उद्युक्त करतात.
संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा