शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंचा जन्मदिन संदेश

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
 
 
सत्य हाच भगवंत. सत्य म्हणजेच सत्. भगवंतांव्यतिरिक्त जे काही आहे, ते असत् म्हणजेच असत्य आहे. 
 
झोपेत एखाद्याला आपण राजा झालो आहोत, असे स्वप्न पडू शकते. परंतु जाग आल्यावर ना ते राज्य असते, ना तो राजवैभवाचा थाटमाट! मग आपल्या त्या राजेशाही जीवनाचे काय झाले? ते केवळ आपण स्वप्नावस्थेत असतानाच अस्तित्वात होते. त्याचप्रमाणे, जागृत अवस्थेत आपल्याला येणारे सर्व अनुभव हे एक स्वप्नच आहे. जेव्हा आपण आध्यात्मिकदृष्ट्या जागृत होतो, तेव्हा हे सर्व असत्य, आभास आणि माया आहे याची जाणीव होते. संसारातील आपले सर्व अनुभव, कुटुंब, मुले, सुख-दुःख, कीर्ती-अपकीर्ती हे सर्व अज्ञानरूपी निद्रेत पडलेली स्वप्ने आहेत. ज्ञानाचा उदय झाल्यावरच या निद्रेतून आपली मुक्तता होते!
 
विवेकबुद्धीचा उपयोग करून आपण सत् आणि मिथ्या यांचे स्पष्टपणे विश्लेषण करून त्यांचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. दृढ निश्चय आणि विवेक यांच्या साहाय्याने आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे. जेव्हा आपल्याला सत् (सत्य) समजते, तेव्हा त्याचे स्वरूप चित् (शुद्ध चैतन्य) आहे आणि चित् हेच आनंदस्वरूप आहे, याची अनुभूती येते. यालाच सत्-चित्-आनंद असे म्हणतात. मायेच्या आवरणामुळे मिथ्या हे सत्याला झाकून टाकते आणि त्यामुळे आपल्याला सत्याचे स्वरूप जाणता येत नाही.
 
 
 
जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा