ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याचे भाव पूर्णपणे परमेश्वरावर केंद्रित असायला हवेत ."
'thought for the day' श्री वसंता साईच्या या पुस्तकातून.
पुष्प पाचवे पुढे सुरु
प्रभू म्हणतात , ' बोला माझ्या द्वारे ' जेव्हा परमेश्वर आपल्या मध्ये भरून राहतो तेव्हा तो आपल्या द्वारे बोलतो . हे कसे घडते ? जेव्हा आपण आपली इन्द्रिये , मन , बुद्धी , जाणीव आणि अहंकार या पासून रिक्त होतो तेव्हा परमेश्वर आपल्या मध्ये भरून राहतो. आपण भोक्ता अवस्थेत आल्यानंतर परमेश्वर आपल्या द्वारे बोलतो . अनेक महान संतांनी हे सिद्ध केले आहे . परमेश्वराच्या गाढ चिंतनात मग्न असतांना त्यांना परमेश्वराचा आवाज ऐकू येतो . त्यांचीच वेद आणि उपनिषदे म्हणून नोंद केली गेली आहे .
आजकाल सर्वजण सहजपणे सांगतात " स्वामी माझ्या द्वारे बोलतात ". यासाठी प्राचीन ऋषी मुनीनप्रमाणे सर्वसंग परित्याग करायला हवा . जो स्वतःच संपूर्ण रिक्त करत स्वतःला शून्यवत मानतो केवळ तोच परमेश्वराचा आवाज ऐकू शकतो .आणि त्याच्याशी बोलू शकतो . जेव्हा आपण अष्टाहंकारांचा त्याग करून स्वतःला रिक्त केले तरच परमेश्वर कृष्णाच्या मुरलीसारखी आपल्यामधून मंजुळ मधुर धुन वाजू शकेल . परमेश्वर केवळ पोकळ आणि रिक्त मुरलीमधूनच मंजुळ स्वर वाजवू शकतो. मी पूर्वीच यावर एक गीत लिहिले आहे .
नऊ द्वारे असती या देहास
चुकता एक ठोका
रूपांतर होई देहाचे कलेवरात
अष्टदश द्वारे हृदयास
अगणित विचार निर्मिती अन ये जा .... विचारांची
चौखूर उधळीत पंचअश्व ओढिती
देहरुपी रथ हा पंचशत दिशांना
देहाला नऊ द्वारे आहेत. यापैकी कोणत्याही द्वारामधून प्राणशक्ती देहाला सोडून जाऊ शकते . त्यानंतर देहाचे कलेवरात रुपांतर होते . योग्याची प्राणशक्ती या नऊ द्वारांपैकी कोणत्याही द्वारांमधून बाहेर न पडता मस्तकातून बाहेर पडते . हृदयामध्ये ८० द्वारे असतात . जेथे निरंतर अगणित विचारांची निर्मिती आणि ( विचारांची ) ये जा चालू असते . देह एक रथ आहे पंचेंद्रियरुपी अश्व हा रथ ओढतात . ही पंचेंद्रिये आपल्याला ५०० वेगवेगळ्या दिशांना ओढत असतात. मी तरुण असतांनाच हे गीत लिहिले . आपण देहाद्वारे ( पंचेन्द्रीयांवर ) नियंत्रण ठेवायला हवे अन्यथा आपले संपूर्ण जीवन व्यर्थ जाईल असे मी लिहिले आहे .
सर्वांवर नियंत्रण ठेऊन स्वतःला रिक्त केल्या नंतर , परमेश्वर स्वतः येईल आणि आपला सारथी होईल . देह मुरलीसमान आहे. जर आपण स्वतःला रिक्त केले तर परमेश्वर स्वतः आपल्यामधून मधुर मंजुळ धुन वाजवतो .
स्वमींनी सूचित केलेला पुढील मुद्दा ' कर्म करा माझ्या द्वारे '. ही भर्ता अवस्था आहे . जीवात्मा म्हणतो " मी केवळ एक साधन आहे . तू माझ्या कर्मांचा कर्ता आहेस ". या अवस्थेत जी काही कर्म केली जातात ती परमेश्वरच करतो . कर्मांचा कर्ता करविता तोच असतो .
एक उदाहरण देतो संत सखूला इतर भक्तां समवेत पंढरपूरला जायचे आहे . तथापि तिचे पती आणि सासू तिला जाण्याची अनूमती देत नाहीत .एवढेच नाही तर ते तिला खांबाला बांधून ठेवतात . सखूबाई परमेश्वराची प्रार्थना करते . पांडुरंग स्त्री रुपात येऊन तिला सांगतो , " तू मला या खांबाला बांधून ठेव आणि तू इतर भक्तां बरोबर पंढरपूरला जा ". सखूबाई पंढरपूरला गेली . महिनाभर पांडुरंगाने सखूबाईच्या रुपात तिच्या घरातील सर्व कामे केली आणि तिच्या पतीची आणि तिच्या सासूची सेवा केली . तिच्या उत्कट भक्तीकडे पाहून परमेश्वर स्वतः तिच्या रुपात आला व तिची सर्व कामे केली . ही सच्ची भक्ती आहे . जिथे अशी भक्ती असेल तेथेच परमेश्वर त्यांच्या द्वारे सर्व कर्म करतो .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ....
टीप :- रविवार दि. १०/११/ २०१३ रोजी तांत्रिक अडचणीमुळे आम्ही लेख पोस्ट करू शकलो नाही . त्याबद्दल दिलगीर आहोत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा