ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"एखादी व्यक्ति चांगली अथवा वाईट असू शकते परंतु सर्वांच्या अंतरंगी तो एकच परमात्मा वास करतो ".
श्री वसंता साई
पुष्प पाचवे पुढे सुरु
व्यक्तित्व ,देह आणि मन यांच्या द्वारे अहंकार कार्यरत असतो . अहंकार म्हणजे ' मी ' लहान ' मी ' . स्वामी म्हणतात , " चित्त शुद्धी द्वारे मिळवलेली शांती म्हणजे मोक्ष होय . पहाणे , ऐकणे , वाचणे, शिकवणे , करणे किंवा करून घेणे या सर्वांद्वारे मनामध्ये उमटणारे ठसे नाकारणे म्हणजेच चित्तशुद्धी होय ".
' शून्यवत होणे ' हा ध्येयाप्रत जाण्याचा एकमेव मार्ग आहे . आणि तरीही तुम्ही मागे धावता आणि त्यानुसार स्वतःला बनवता . उदा. अहंकारी मानसिकता .
मन आणि बुद्धीची रचना , व्यक्तिमत्वातील अनुवंशिक वा संपादीत केलेले विशिष्ट गुण , व्यक्तिमत्वाचे विविध पैलू म्हणजेच अहंकाराचे प्रतिनिधी , हे तोफेला क्रियाशिल करणारे तोफ गोळे आहेत . जर हे तोफ गोळे तोफेमध्ये घातलेच नाहीत तर तोफ क्रियाशिल होणार नाही आणि फल स्वरूप अहंकार व मन यांचा कायमचा नाश होईल .
आता आपण या विषयी पाहू या .देह , मन आणि व्यक्तिमत्व याद्वारे अहंकाराचे कार्य चालते . स्वामी म्हणतात की चित्तशुद्धी केल्याने शांतीप्राप्त होते . ही शांती म्हणजेच मुक्ती होय . शांती कशी प्राप्त होते ? मनामध्ये ठसे उमटले नसतील तर शांती प्राप्त होते . पंचेंद्रियांद्वारे जे काही पाहिले , ऐकले वा अनुभवले याचा आपल्यावर किंचितही परिणाम झाला नाही तर ठसे उमटणार नाहीत . पंचेंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या इच्छांमधून मनावर ठसे उमटतात .
जेव्हा इच्छांचा क्षय होतो . तेव्हा मन आणि इंद्रिये रिक्त होतात . अशा अवस्थेत जगात करण्यासारखे काहीही उरत नाही . मनामध्ये ठसे नसतील तर मनुष्याला कामच राहत नाही . त्याला करण्यासारखे काहीही नसते . तो केवळ परमेश्वराच्या चिंतनात असतो . जर त्याला काम नसेल तर त्याला इच्छाशक्तीचीही गरज नसते . नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या एखाद्या ओंडक्यासारखी त्याची अवस्था असते . जेथे नदीचा प्रवाह वाहतो तेथे तो जातो , जे घडत आहे ते सर्व परमेश्वरी इच्छेने घडत आहे असा तो विचार करतो . त्यामुळे त्याला इच्छा नसतात . कोणाविषयी द्वेष नसतो , जीवनातील कोणतीही द्वंद्व नसतात. तो जसे आहे तसे जीवन स्वीकारतो . त्याचे कोणतेही वेगळे विचार वा भाव नसतात. यालाच स्वामी शून्यवत अवस्था म्हणतात. परमेश्वर प्राप्तीचा हा एकमेव मार्ग आहे .
स्वामी आता अहंकार आणि मन यांच्या गुंतागुंतीविषयी सांगतात. मनुष्य स्वतः विषयी , तो कोण आहे असा विचार करतो आणि म्हणतो , " मी राम आहे. मी या ठिकाणचा राहणारा आहे. मी या हुदयावर आहे ". अशा त-हेने जगाला परिचय देतांना मनुष्याचा अहंकार सर्वत्र दौडत असतो. मनुष्य म्हणतो , " मी आज हे करेन , मी उदया ते करेन ". मन या मागे धावत असते. हीच मन आणि यांची गुंतागुंत .
मी + मन = मनुष्य
मनुष्य - ' मी ' = आत्मा
जर मनुष्यामधून ' मी ' वजा केला तर त्याला तो आत्मा असल्याचे ज्ञान होईल किंवा तो आत्मा असल्याचे जाणवू लागेल . केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी आपण जन्म घेतला आहे. आपला आपल्या देहाशी काहीही संबंध नाही. आपण केवळ आत्म्याशी संबंधित आहोत . केवळ मन आणि बुद्धीद्वारे आपण अनेक आकार आणि रचनांची निर्मिती करतो. हे सर्व आपल्या व्यक्तित्वाचे गुण आहेत. व्यक्ति आपल्या व्यक्तिमत्वाद्वारे स्वतःची ओळख करून देतो. प्रयेक जन्मात येणाऱ्या अनुवंशिक आणि संपादित गुणांपासून व्यक्तिमत्व बनते. मनुष्याचे कुटुंब असते त्यात त्याचा मुलगा असतो , नातू असतो. अशा त-हेने तो वंश निर्माण करतो. तथापि हे अज्ञान आहे. मनुष्य प्रत्येक जन्मात वारशानुसार आपले व्यक्तिमत्व घेऊन येतो. मन आणि बुद्धी यामध्ये गुणांची निर्मिती करतात. मानव त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू म्हणजेच त्याच्या अहंकाराचे प्रतिनिधी निर्माण करतो.
वर निर्देशित केलेले सर्व तोफ गोळे तोफे मध्ये न घालण्याचा अटोकाट प्रयत्न केल्यास मन व अहंकार यांचा समूळ नाश होईल . जर तोफेमध्ये गोळे टाकले तरच तोफ कार्यरत होते . त्याच्या अहंकाराचा प्रत्येक पैलू त्याचा प्रतिनिधी बनून तोफ गोळ्यांसारखे कार्य करतो . आणि सरतेशेवटी त्याच्या विनाशाचे कारण बनतो . अशा त-हेने स्वामी अहंकाराची तुलना तोफगोळ्यांशी करून आपल्याला सावधानतेचा इशारा देतात . सर्वांनी हे जाणून घेऊन व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पडणाऱ्या ' मी , माझे आणि अहंकार ' यांचा त्याग करायला हवा .जो जाणीवपूर्वक साधना करतो तोच ' मी ' चा त्याग करू शकतो . जो स्वतःला रिक्त करतो तोच हिरो बनतो . सर्व कौटुंबिक बाबीही सत्य नसतात . केवळ परमेश्वर सत्य आहे , हे जाणल्या नंतर मनुष्याची जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होते .
काल संध्याकाळी फ्रेडनी स्वामींना पिवळ्या रंगाचे जास्वंदीचे फुल वाहिले . रात्री ८ वा. सत्संग झाल्यानंतर आरतीच्या आधी मी सर्वांना ते फुल दाखवले . त्याच्या पाकळ्या आपोआप पूर्णपणे मिटल्या होत्या . त्याची एक एक पाकळी मिटून त्या फुललेल्या फुलाचे पुन्हा कळीत रुपांतर झाले . जर एखाद्याने अशा त-हेने फुललेले फुल मिटवायचा प्रयत्न केला असता तर ते शक्य झाले नसते . मी सर्वांना ते फुल दाखवून सांगितले की, या फुलाप्रमाणे सर्वांनी ते जेथून आले तेथे परतायला हवे . कळीचे फुल बनले आणि नंतर पुन्हा कळी बनण्यासाठी मिटले . अशा तऱ्हेने प्रत्येकाने ते जेथून आले तेथे जायला हवे . तो पर्यंत हे जन्म मृत्युचे चक्र थांबणार नाही .
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा