ओम श्री साई राम
पुष्प चौथे पुढे सुरु
पुष्प चौथे पुढे सुरु
६ ) विद्वत्ता - याचा अर्थ वेद आणि धर्मग्रंथ पंडीत. तथापि तुम्ही एक विद्वान पंडीत आहात असा अहंकार बाळगत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे . एकदा जनक राजाच्या दरबारात अनेक विद्वान पंडीत विवाद करण्यासाठी जमले होते . त्या विवादामध्ये जो पराजित होईल त्यास शिक्षा करण्यात येईल असा या विवादासाठी नियम होता . अष्टवक्राने दरबारात प्रवेश केला . त्याचे शरीर आठ ठिकाणी वाकडे झाले होते . त्याला पाहताच सर्व पंडीत हासून म्हणू लागले , " आपल्या सारख्या विद्वानांसमोर ह्या मुलाचे काय काम ? " अष्टवक्र उत्तरला ," मी तुमच्या बरोबर विवाद करण्यासाठी येथे आलो आहे . माझ्या बाह्य रुपाकडे पाहून माझ्या विषयी मत बनवू नका . " त्या नंतर त्याला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्याची त्याने अचूक उत्तरे दिली . त्याने सर्व विद्वान पंडीताचा अहंकार मोडून काढला. म्हणून विद्वत्तेच्या अहंकाराचे उच्चाटन केले पाहिजे .
प्रत्येकात दैवत्व वास करते . ते कसे आणि कोणामधून प्रकट होईल हे आपण सांगू शकत नाही . स्वामींनी एकदा मन्सूर नावाच्या मुलाची एक गोष्ट सांगितली . तो एक लहान मुलगा होता त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले होते . त्याने घराचा त्याग केला आणि ' मी परमेश्वर आहे , मी परमेश्वर आहे ' असे तो सतत म्हणत होता. रस्त्यावरून चालतांना तो जाहीर पणे म्हणत होता , ' मी परमेश्वर आहे , मी परमेश्वर आहे ' . अनेक पंडीतांच्या हे कानावर आले. त्यांनी त्याला कडक शब्दात असे म्हणू नये म्हणून सांगितले . ते म्हणाले , " असे म्हणू नकोस . तू परमेश्वर कसा बनशील ? " तरीही त्याने आपले म्हणणे चालूच ठेवले . अखेर त्यास राजाकडे नेण्यात आले . राजा म्हणाला , " हे बालका , तू तर खूप लहान आहेस तू असे म्हणू नयेस . " तो उत्तरला , " मी परमेश्वर आहे . " राजा क्रोधीत झाला व त्याने त्याचे डोळे फोडण्याचे फर्मान सोडले .तो मुलगा अंध झाला तथापि त्याने त्याचे 'मी परमेश्वर आहे ,मी परमेश्वर आहे ' . हे म्हणणे चालूच ठेवले .त्यानंतर त्याचे हात पाय तोडण्यात आले . त्याच्या देहावरून रक्ताचे पाट वाहू लागले. तरी त्याच्या देहातून त्याचे बोल ऐकू येत होते . त्यानंतर त्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि त्याच्या देहाला अग्नी देण्यात आला . त्याच्या चितेतील राखेमधुनही 'मी परमेश्वर आहे ' हे बोल ऐकू येत होते .यावरून दिसून येते की त्याला परमेश्वराचा बोध झाला होता . त्याच्या देहातील प्रत्येक अणुरेणु मधून ' मी परमेश्वर आहे ' हा ध्वनी निनादत होता . म्हणून विद्वत्तेचा काय उपयोग ? त्या पंडितांनी त्यांच्या विद्वत्तेच्या अहंकारापायी एका खऱ्या संताला जीवे मारले . स्वामी , तुम्ही आम्हाला किती त-हेने उपदेश आणि बोध करता ! किती उदाहरणे देता . हे मानवी मन जागृत होईल का ? विद्वत्तेच्या अहंकारामुळे एका संताच्या हत्येचे पाप त्यांच्या माथी आले . म्हणून आपल्या मानवी बुद्धीने आपण सत्याची पारख करू शकत नाही .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा