गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३








ओम श्री साई वसंत साई साय नमः
सुविचार 
" जर एखादी व्यक्ति तुम्हाला त्रास देत असेल तर , त्या व्यक्तीचा क्रोध , परमेश्वराचा क्रोध समजून त्याचा आनंद घ्या " .


वसंतामृतमाला
तुम्ही श्वान बनू इच्छिता ?
 ( पुष्प सहावे )


           
               स्वामींनी सत्य साई स्पीकस भाग - २ मधील त्यांच्या १९ मे १९६२ रोजी दिलेल्या प्रवचनातील एका पानावर खुणा केल्या .त्या पानावरील मजकूर खाली देत आहे. ती एक गोष्ट आहे . 


            ती एका कुत्र्याची गोष्ट आहे . माराहाणीने रक्त  बंबाळ झालेला एक कुत्रा रामाकडे येतो . त्याला केलेल्या माराहाणीची चौकशी करण्यास राम लक्ष्मणास
पाठवतात .एका ब्राम्हणाने  त्याला काठीने मारहाण केली असल्याचे लक्ष्मणास समजते . त्या ब्राम्हणाला या संबंधात विचारले असता तो फक्त एवढेच कारण सांगू शकतो की तो कुत्रा त्याच्या मार्गामध्ये आला . 
            राम त्या कुत्र्याला विचारतात , " मी या ब्राम्हणाला काय शिक्षा द्यावी अशी तुझी इच्छा आहे ?" तो कुत्रा तत्परतेने उत्तर देतो ," त्याला त्या देवळाचा प्रबंधक बनवा ". " ' काय ' ?  ते  तर त्याच्यासाठी इनाम होईल , शिक्षा नव्हे ".  राम म्हणतात  . त्यावर तो कुत्रा म्हणतो ," नाही मी स्वतः प्रबंधक होतो आणि मला परमेश्वराच्या पैशाचा गैरवापर न करणे अशक्य झाले जर तो प्रबंधक झाला तर त्याला ही असा कुत्र्याचा जन्म मिळेल आणि कदाचित मारही खावा लागेल ." 
          लक्षात घ्या , ना  केवळ तो कुत्रा किंवा तो ब्राम्हण
परंतु तुमच्या पैकी प्रत्येकजण परमेश्वराच्या संपत्तीवर जगत आहे .सर्व काही त्याच्याच मालकीचे नाही का ? आणि त्याच्या या संपत्तीच्या लाभाच्या बदल्यात तुम्ही त्याला काय देता ? तुम्ही ते खाऊन शांत बसू शकत नाही . तुम्ही किमान त्या बदल्यात थोडे शारीरिक श्रम दिले पाहिजे . जे काम न करता नुसते खातात ते खरोखरच लबाड असतात . परमेश्वराला तुमच्या कडून काही हवे असते असे नाही परंतु त्यामुळे तुम्हाला आत्म सम्मान प्राप्त होतो आणि त्याने तुमची चित्तशुद्धी होते .
 ...
           आता आपण या विषयी पाहू या . तो रक्त बंबाळ कुत्रा रामाकडे कसा आला ते स्वामी सांगतात .राम विचारतात , " लक्ष्मणा , या कुत्र्याला कोणी मारले ? " एका ब्राम्हणाने त्याला मारल्याचे लक्ष्मण सांगतो . ब्राम्हणास  काय शिक्षा करावी असे रामाने कुत्र्यास विचारले . त्यावर कुत्र्याने सांगितले की त्याला पुढील जन्म देवळातील विश्वस्थाचा देण्यात यावा . तो देवळातील संपत्तीची देखभाल करेल. या पदावर काम करणाऱ्यांना धर्म करता म्हणजेच धर्माचे रक्षण करणारे असे म्हटले जाते . त्यांनी देवळाच्या संपत्तीतील एकही पैसा त्यांच्या व्यक्तिगत बाबींसाठी खर्च केला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे . कुत्र्याने सावधानतेचा इशारा दिला की जर तुम्ही तसे केले नाहीत तर तुम्हाला कुत्र्याचा जन्म घेऊन मारहाण सोसावी लागेल . 
            जे मंदिराच्या संपत्तीची देखभाल करतात त्यांना धर्मरक्षक म्हणतात . त्यांना सदैव सावधान राहायला हवे . आश्रमात राहणाऱ्यांसाठीही हाच नियम लागू आहे . आश्रम सामुदायिक निधींवर चालतो . म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी . इथे राहणाऱ्यांना त्यांच्या गरजेपेक्षा अधिक काही घेण्याचा अधिकार नाही . कोणत्याही गोष्टीचा अपव्यय वा गैरवापर होणार नाही हे पाहिले पाहिजे . तशी काळजी न  घेणे अत्यंत चुकीचे आहे . याबाबत स्वामी येथे इशारा देत आहेत तसे न  केल्यास तुम्हाला कुत्र्याचा जन्म घ्यावा लागेल . एका कुत्र्याचे जीवन तुमच्या प्रतिक्षेत आहे . 
            जगातील सर्वजण परमेश्वराच्या संपत्तीवर जगत आहेत . तुमची संपत्ती कोणती  आणि परमेश्वराची संपत्ती कोणती ? जगातील ९९ टक्के  लोकांना हीच एक गोष्ट समजत नाही . या जगात येतांना आपण आपल्या बरोबर काय घेऊन येतो ? तीच केवळ आपली संपत्ती आहे . तुम्ही असे म्हणाल की तुम्ही रिक्त हस्ताने जन्माला आलात परंतु तुमच्या हृदयात उमटलेल्या खोलवर ठशांचे काय ? ती तुमची खरी संपत्ती आहे . जेव्हा तुमचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही हे खोलवर ठसे तुमच्या बरोबर तुमच्या पुढील जन्मासाठी घेऊन जाता .
          तुम्ही कदाचित अंस म्हणाल , " गाडी , बंगला , बँक बॅलन्स , पद हे सर्व मी कमवले आहे ". तथापि हे सर्व परमेश्वराच्या मालकीचे आहे . हे तुम्ही तुमच्या मनावर पक्के ठसवा . जरी पंचतत्वे परमेश्वराच्या मालकीची असली तरी  आपण आपल्या जीवनासाठी त्याचा वापर करतो . सत्कर्म अर्पण करून आपण त्याच्या ऋणांची  परतफेड केली पाहिजे . हवा ही तुमची संपत्ती आहे का ? तुम्ही ती कमावली आहे का ? तरीही तुम्ही तिचा वापर करता.  पाणी तुमची संपत्ती आहे का ? परमेश्वरी कृपेने पाऊस पडतो. परंतु तुम्ही जराही विचार न करता पाणी वापरता.  सूर्य तुमची किंवा तुमच्या वंशाची संपत्ती आहे का ? सूर्यप्रकाशामुळे तुम्ही जीवन जगू शकता . ह्या  सर्वांची परतफेड करण्यासाठी तुम्ही काय केलेत ? ही पृथ्वी कोणाच्या मालकीची आहे ? तथापि तुम्ही जमीन घेऊन त्यावर घर बांधता . 
          पृथ्वी आणि आकाश परमेश्वराच्या मालकीचे आहे . किती जणांनी  येथे त्यांची घरं बांधली, महाल बांधले आणि राज्य केले ? तथापि एक दिवस ते सर्वकाही जाते . मग तुमचे असे काय असते ? सर्वकाही परमेश्वराने दिलेले आहे . आपण जगण्यासाठी पंचतत्वांचा वापर करतो . ते ऋण  फेडण्यासाठी आपण परमेश्वराला सहाय्य ठरतील अशी कर्मे केली पाहिजेत . त्याला आपल्या कडून हीच अपेक्षा आहे . स्वामींनी गेल्या ८४ वर्षात किती शिकवण दिली . त्याचे आपण आचरण  केले पाहिजे आणि आपण आत्मा आहोत हे जाणले पाहिजे . 
          मला लिहिण्यासाठी काही नव्हते म्हणून मी अमरला शोधण्यास सांगितले . त्याने सत्य साई स्पिकस् मधील ही खूण  केलेली गोष्ट आणली आणि म्हणून मी ही छोटीशी गोष्ट लिहिली .

व्ही. एस.
 जय साई राम     
            
                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा