गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " कुटुंबाशी असलेले बंध जन्म प्रदान करतात तर परमेश्वराशी असलेले बंध मुक्ती प्रदान करतात " .


वसंतामृतमाला
( पुष्प सातवे )
वराह का चेन ?

          आज स्वामींनी दिव्य टपालामध्ये जो कागद दिला त्यावर खालील मजकूर लिहिला होता. 
             " भूतकाळाकडे वळून पाहू नका तसेच भविष्यातील स्वप्ने पाहू नका , त्याने तुम्हला ना भूतकाळ परत मिळेल ना तुमच्या दिव्यस्वप्नांची पूर्तता होईल . 
तुमचे कर्तव्य , तुमचे इनाम ( कर्मफल ) तुमचे प्राक्तन सर्वकाही याक्षणी इथेच आहे . 
डॅग हमारस्कजोल्ड
यू एन सेक्रेटरी जनरल 
१९०५ - १९६१
२४ एप्रिल २०१३ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी , कोणीतरी लिहिलेल्या ह्या मजकुराचा अर्थ काय ?
स्वामी - तू ह्यावर लिही . या अगोदर मी जीझस काय म्हणाले ते दिले . आता मी हे दिले आहे . 
वसंता - आता मी समजले स्वामी , मी त्यावर लिहीन . 
ध्यान समाप्ती 
        या पूर्वी स्वामींनी बायबलमधील अनेक वचने त्यावर लिहिण्यास सांगितले . आणि मी लिहिले . त्याच प्रमाणे आता त्यांनी हे दिले आहे . १९०५ ते १९६१ हा ह्या व्यक्तीचा जीवनाचा कालखंड होता . आता आपण पाहू या. प्रथम तो सांगतो की  मनुष्याने भूतकाळाकडे वळून पाहू नये . तरीसुद्धा मनुष्य नेहमी भूतकाळातील घटनांबद्दल विचार करतो . विशेषतः वृद्धापकाळात , जेव्हा त्याला करण्यासारखे काहीही नसते तेव्हा हे घडते . मन भूतकाळातील विचारांमध्ये रमते . तरुणपणात  घडलेल्या घटनांविषयी तो विचार करतो व त्यावर चिंतन करतो . ह्या सर्वांचा काय उपयोग ? यापेक्षा त्याने परमेश्वराचे चिंतन वा नामस्मरण केले तर ते त्याला अधिक लाभदायी होईल . भूतकाळाचा विचार करणे निरर्थक आहे . 
            त्यानंतर तो मनुष्य सांगतो की, भविष्यातील स्वप्ने पाहू नका . तथापि मनुष्य नेहमी हेच करतो . तो त्याचा सर्व वेळ भविष्यातील स्वप्ने पाहण्यात खर्ची घालतो . ह्या  त्याच्या जीवनातील दोन बाजू झाल्या . तो वर्तमानाचा कधीच विचार करत नाही . मन नेहमीच भूत आणि भविष्यातील गोष्टींचा विचार करते . ज्याचा काहीही उपयोग नाही . तुमचे कर्तव्य काय आहे ? केवळ परमेश्वर प्राप्ती . या व्यतिरिक्त मनुष्याचे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही . केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी मनुष्य इथे जन्म घेतो . आपले सर्व विचार आणि कर्म परमेश्वर प्राप्तीशी निगडीत असायला हवेत . हे आपले कर्तव्य आहे . ह्यावर चिंतन करून ते यथार्थपणे जाणून घेतले पाहिजे . प्रत्येक व्यक्तीस  पुन्हा जन्म  न घेण्यासाठी जन्म दिला आहे . जर तुम्ही या जन्माचा त्यासाठी वापर केला नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकाल . आपल्या कर्मांनुसार आपल्याला कर्मफल मिळते . हेच आपले प्रारब्ध आहे . जे आपल्याला इथेच याक्षणी मिळते . 
       तथापि आपण कठोर परिश्रम करून आपले प्राक्तन बदलू शकतो . मार्कंडेय यांना केवळ १६ वर्षाचेच आयुष्य होते परंतु त्यांनी कठोर परिश्रम करून त्यामध्ये बदल केला . परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करायला हवेत . जर आपण अशा पद्धतीने कर्म करून कठोर साधना केली तर आपल्याला इथेच याक्षणी मुक्ती निश्चित प्राप्त होईल . भूत आणि भविष्याचा विचार करू नका . आताच प्रयत्न करा.  वेळवाया घालवू नका . कोणत्याही क्षणी मृत्यू घाला घालू शकतो . म्हणून आपण आपला वेळ ईश्वर चिंतनात घालायला हवा . बाकी सर्व अशाश्वत आहे , अनित्य आहे . इथेच याक्षणी मुक्ती प्राप्त होऊ शकते . हे मी माझ्या साधनेद्वारे सिद्ध केले आहे . आणि ते कसे करायचे हे सांगणारी १०० च्या वर पुस्तके प्रकाशित केली आहेत . भूत आणि भविष्याचा विचार करायला माझ्याकडे वेळच नाही . एकही क्षणाचा खंड न पडता मी सतत स्वामींनचाच विचार करत असते . यामुळे मी हे ( ज्ञान ) लिहू शकते . या अखंड विचारांमुळे माझी कुंडलिनी जागृत होऊन सहस्रार उघडले आणि त्यातून अमृत स्त्रवू लागले . ह्यातूनच कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन होते . माझा आणि स्वामींचा भावसंयोग होऊन ते ( भाव ) विश्व ब्रम्ह गर्भ कोटम मधून स्तुपिमध्ये प्रवेश करतात आणि तेथून ते सर्व दूर पसरून सर्वाचे सत्य युगात परिवर्तन करतात . यातून नवनिर्मिती होते .
साई राम


उर्वरित वसंतामृत पुढील भागात … 
  
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा