ओम श्री साई वसंतासाईसाय नमः
वसंता - स्वामी , माझा जन्म दिपावलीच्या दिवशी झाला का ?
संदर्भग्रंथ - इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!!
सुविचार
" आपल्या अंतरंगी असणाऱ्या परमेश्वराचा शोध घेतल्यानंतर होणारी अनुभूती म्हणजेच आनंद होय . "
आदिशक्तीचा
प्रवेश
वसंता - स्वामी , माझा जन्म दिपावलीच्या दिवशी झाला का ?
स्वामी - तुझ्या वडिलांची रोजनिशी तपासून पहा .
माझ्या वडिलांचे रोजनिशीतील लिखाण -
' २३ ऑक्टोम्बर १९३८ कन्यारत्न . वेळ सकाळी ११ वाजून ४२ मिनिटे .ही बालिका देशासाठी कार्य करेल. ' मी आधीचे पान उलटले तेव्हा मला पुढील नोंद सापडली . ' हिंदूंचा सण - २२ ऑक्टो . अश्विन ६ दिपावली ' ही सर्व परमेश्वराची कृपा . माझा जन्म दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी झाला . परंतु अमावस्येच्या दिवशी जगातील बऱ्याच ठिकाणी दिपावली साजरी केली जाते .
सत्यभामा ही भूदेवीचा ( भूमाता ) अंश होती. जेव्हा हिरण्यकश्यपू नावाच्या असूराने पृथ्वीचे हरण करून तिला दडवून ठेवले तेव्हा सर्व देव देवतांनी भगवंताचा धावा केला . भगवंताने वराह अवतार घेऊन त्या असूराचा वध केला आणि पृथ्वीला मुक्त केले . त्या वेळेस नरकासूराचा जन्म झाला . जर त्याच्या मातेने त्याच्या मृत्यूची इच्छा केली तरच त्याचा अंत होईल . असा त्याला वर मिळाला होता . जेव्हा त्याची असूरी कृत्ये नियंत्रणा बाहेर गेली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा नाश करण्याचे ठरवले . आणि म्हणून त्यांनी सत्यभामेला आपल्या बरोबर घेतले . नरकासूराची युद्ध नीति आणि त्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे पाहून सत्यभामा अचंबित झाली . तिला चिंता वाटू लागली व तिने श्रीकृष्णाला, नरकासूराचा वध करण्याची विनंती केली . त्या नंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडावेगळे केले .
त्यावेळी नरकासूराने सत्यभामे कडून एक वर मागून घेतला , " माते, जगामध्ये सर्वत्र माझा मृत्यू दिन उत्सवा प्रमाणे साजरा केला जावा ." म्हणून श्रीकृष्णाने असे घोषित केले , " नरक चतुर्दशीच्या दिवशी माझे पूजन करणाऱ्यांची सर्व पापांमधून मुक्तता होईल, त्यांची भरभराट होईल . " म्हणूनच हा दिवस दिपावली म्हणून सर्वत्र साजरा केला जातो . स्वामींनी मला अनेकदा सांगितले आहे , " तू सुद्धा भूमा देवींचा अंश आहेस . " प्रकृती म्हणजे पृथ्वीच नाही का ? ...
२५- १०- २०००
रात्री २ वाजल्या पासून मी जागीच होते . माझे मन फक्त स्वमींचाच विचार करत होते . मी ध्यान केले.
वसंता - स्वामी आज मला तुम्ही दिपावली विषयी काही सांगा ना .
स्वामी - तू स्वतः नरकासूराचा वध करून मला वाचवलेस . मी तुला एक वर देईन . तुला हवा तो वर माग .
वसंता - स्वामी , मला खरे काय हवे आहे हे तुम्हाला माहित नाही का ? इथून पुढे माझे जे काही जन्म असतील त्या मध्ये माझे जीवन केवळ तुमच्यासाठीच असायला हवे . मला हे कुटुंब वगैरे काही नको . माझे जीवन केवळ तुमच्या आणि तुमच्या साठीच असायला हवे .
जगातील सर्व जीवांना , प्राणीमात्रांना मुक्ती दया. तुम्ही प्रत्येकाला तुमच्या कमलचरणांशी घेऊन या . यासाठी कोणताही त्याग करण्याची माझी तयारी आहे .
स्वामी - तू हे नक्कीच करशील . तेव्हा तू एका नरकासूराचा वध केलास .आज प्रत्येकाच्या मनात एक नरकासूर दडलेला आहे . त्यांच्यातील त्या नरकासूराचा वध करण्यासाठी तू आली आहेस. दिपावलीच्या दिवशी तू जन्म घेतलास . प्रत्येकाच्या मनात ज्ञानाग्नी चेतवणार आहेस . तू आहेस ' ज्ञानाग्नीदायिन्ये '.
मायेला दूर फेक आणि सिद्ध हो . आता पुरे ! तुझे अश्रू तुला झाकून ठेवतील , मायेच्या आवरणातून बाहेर पड आणि पूर्णशक्तीचे रूप धारण कर . तू 'ज्ञानेश्वरी ' आहेस .
असे म्हणत , स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी त्याच क्षणी उन्मनी अवस्थेत गेले . त्या अवस्थेत माझ्या मनात विचार आले , " मी साईशक्ती आहे . त्यांच्या सर्व शक्ती माझ्या ठायी आहेत. मी ज्ञानाग्नी चेतवणार आहे . हा ज्ञानाग्नी एखादया वणव्याप्रमाणे सर्व जग भर पसरेल .प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेल्या नरकासूराचा वध करून मी तिथे ज्ञानज्योत प्रज्वलित करेन . मला प्रत्येकामध्ये परिवर्तन घडवायचे आहे आणि ते मी घडवणारच. "
स्वामींनी प्रत्येकाच्या मनामध्ये नरकासूर असल्याचे मला सांगितले . मनामध्ये असणाऱ्या नरकासूराचा वध म्हणजे दिपावली. यातील परस्पर संबंध पहा .
दिपावली म्हणजे काय ? नरकासूराच्या वधानंतर साजरा करण्यात येणारा आनंदोत्सव . जेव्हा आपल्या मधील असूरी वृत्तीचा नाश होईल तेव्हा आपण खरी दिपावली साजरी करू शकू . केवळ नवीन कपडे घालणे , फराळ करणे आणि फटाके उडवणे म्हणजे दिपावली नव्हे . हा काही खरा उत्सव नव्हे . आपल्या मनातील दूषप्रवृत्तींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे . आणि प्रेमाचा वारा घालून ज्ञानाग्नी चेतवला पाहिजे . मगच आपण दिपावली साजरी करण्यास पात्र ठरू . याचा खरा अर्थ न जाणल्याने आपण मेवामिठाई , खरेदी यामध्येच मौज मजा मानून आपला वेळ खर्ची घालतो .
आत्मसाक्षात्कारामध्येच खरा आनंद आहे . मग त्या दिशेने आपण प्रयत्न करायला नको का ? तुम्ही केवळ एक दिवस मिळणाऱ्या आनंदामध्ये समाधान मानाल का ? दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच समस्या विशाल रूप धारण करून तुमच्या समोर उभ्या ठाकतात . त्यांचा तात्पुरता विसर पडून मौजमजा करणे या मध्ये खरा आनंद आहे का ? खरा आनंद म्हणजे काय ? तर चिरशांती आणि चिरंतन आनंद . आज बाहेरील नरकासूराचा वध झाला आहे . परंतु प्रत्येकाच्या मनातील नरकासूर जीवित आहे . त्याचा वध करणे हीच खरी दिपावली . पारंपारिक दिपावली उत्सव साजरा करण्याचा काय उपयोग ? लोकांच्या मनातील अज्ञानाच्या अंधःकाराचा नाश करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करणे हीच खरी दिपावली .
संदर्भग्रंथ - इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा