बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " तुम्हाला मृत्यु कसा येतो त्यावरून तुम्ही कशाप्रकारे जीवन जगलात हे निर्देशित होते ".
व्ही. एस.


    महाशिवरात्रीचे महत्व
   
१९९६ साली महाशिवरात्रीनिमित्य स्वामींनी दिलेल्या दिव्य प्रवचनामधून


        शिवरात्र ही एक मंगल रात्र आहे . मनुष्याला अमर्याद शक्तिची ईश्वरदत्त देणगी मिळालेली आहे . पाहणे, ऐकणे याद्वारे तुम्ही जे काही अनुभवता ते तुमच्या अंतर्मनातील प्रतिबिंब असते . या अनुभवांच्या अर्थाचा बोध करून घेतला पाहिजे . उदा. आज शिवरात्र आहे . तुम्ही रोजच रात्र अनुभवता त्या सामान्य रात्री आहेत .काळोख्या रात्री आहेत . परंतु शिवरात्र मंगल रात्र आहे . कशी काय ? मनाला १६ कला असतात . चंद्र  ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे .आज चंद्राची१४ वी कला आहे .या दिवशी मनावर पूर्ण नियंत्रण  मिळवणे शक्य आहे .म्हणून हा मंगल दिन समजला जातो . 
           मनाला  ईश्वराभिमुख करणे ही मंगलता आहे . मनुष्यामध्ये अनुवंशिकतेने आलेल्या पशुवृत्तीमधून मुक्त होण्यासाठी याची आवश्यकता आहे . सर्व प्राणीमात्रांमध्ये विद्यमान असलेले आत्मतत्व ओळखण्याची हीच शुभघडी आहे . कोणत्याही व्यक्तीचा तुम्ही केलेला आदर वा अनादर परमेश्वराचाच आदर वा अनादर ठरतो . ' सर्वांना मदत करा , कोणालाही दुखवू नका ' हे  तत्व आचरणात आणा. 
            प्रत्येक मनुष्यामध्ये त्याच्यातील शिवत्वावर आधारित सद्गुण असतात .  मनुष्याचा देह जरी पंचतत्वाने बनलेला असला तरी मनुष्याने त्याच्यातील आत्मतत्व ओळखले पाहिजे . त्यायोगे मानवत्व दिव्यत्वामध्ये परिवर्तित होईल . धर्माचे अनुसरण करणे हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे . धर्म , विचार , उच्चार आणि आचार यांच्यातील सुसूत्रता सूचित करतो . जेव्हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या  मुलभूत दिव्यत्वाचा साक्षात्कार होईल तेव्हा संपूर्ण  विश्वामध्ये परिवर्तन घडेल  .  देह आणि मन ही निव्वळ साधने आहेत . आत्मा ही मनुष्याची वास्तविकता आहे . मनुष्याने त्याला दिलेल्या साधनांचा उपयोग करून व्यवस्थितपणे त्याची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत आणि परमेश्वराशी असलेले ऐक्य जाणले पाहिजे . 
बाबा 

जय साई राम 

रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" परमेश्वराशी तादात्म्य पावलेले मन परमेश्वरच होऊन जाते ". 

पुष्प तेरावे पुढे सुरु 
            
             आता पुढील श्लोक पाहू .ज्योतींमध्ये मी सूर्य आहे ........ असे कृष्णानी घोषित केले . तो तेजाने तळपणारा सूर्य आहे . सूर्य प्रकाशाशिवाय वृक्ष वेलींची वाढ होऊ शकत नाही . मानवालाही जगण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे . अंधारामध्ये पृथ्वीवर कामकाज करणे शक्य नाही . हे ज्ञानासारखे आहे . ज्ञानाविना मनुष्य पशूवत व्यवहार करतो . तो केवळ अन्न ग्रहण , निद्रा आणि प्रजोत्पत्ती एवढेच करतो . मनुष्याने ज्ञान अर्जित करून बुद्धीचा विकास केला पाहिजे .  मानवाने आपण  जन्म का घेतला व आपल्या जन्माचा उद्देश काय हे जाणून घेतले पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत . 
            ऋषिमुनींनी प्रकट केलेल्या वेदिक वचनांनुसार मनुष्याने आपले जीवन व्यतीत करावयास हवे . नीतीतत्वांनुसार जीवन जगावे . अज्ञानाच्या तिमिरामधून ज्ञानाच्या प्रकाशाकडे गेले पाहिजे .  पुनर्जन्मापासून सुटका करून घेण्यासाठी  त्याने हा जन्म सार्थकी लावावा . सर्वांनी ही साधना करायला हवी . सूर्य ज्ञानाचे प्रतिक आहे . या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती करून देणारे ज्ञान आपण मिळवायला हवे . स्वामी कोटीसूर्यसम तेजस्वरूप आहेत . त्यांनी ८४ वर्षे जगावर ज्ञानवृष्टी केली . तथापि मनुष्यामध्ये परिवर्तन घडले नाही . माझ्या अश्रूंद्वारे मी त्यांच्याकडून ज्ञान खेचून घेऊन ते प्रकाशित करते . 
             काल स्वामींनी एक बनियनच्या कापडाचा तुकडा दिला . त्यावर भगव्या आणि जांभळ्या ( विलयन रंगात ) रंगात खालील मजकूर लिहिला होता . 
17A:OXO: 24GG  17  
संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी हे तुम्ही काय लिहिले आहे ? 
स्वामी - सात चक्रांच्या पलीकडे केवळ एक परमात्मा असतो . सर्वजण एकच आहेत , आदिमूलम् . तू , आदिशक्ती पूर्णम्  मधून जे पूर्णम्  बनवतेस जे पूर्णम् च आहे . अशा तऱ्हेने सर्वांची २४ तत्वे ईशस्थिती प्राप्त करतात . आजपासून सर्व काही बदलेल . 
ध्यान समाप्ती 
            आता आपण पाहू या . सात चक्रांच्यापलीकडे , सर्व एकच आहेत . पूर्णम्  मधून पूर्णम्  काढले तरी ते पूर्णम् च रहाते . असे म्हटले आहे. 
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते 
ते पूर्ण आहे , हे पूर्ण आहे. पूर्णम्  मधून पूर्णम्  जन्मते . पूर्णम् मधून पूर्णम्  वजा केले असता शेष राहते जे ते केवळ पूर्णम्  असते . 
           तथापि इथे स्वामी सांगतात की पूर्णम्  ला गुणले तरी ते पूर्णम् च राहते . ही निर्मिती आहे . ही परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होणारी २४ तत्वे आहेत . याचा अर्थ प्रत्येक व्यक्ति जीवनमुक्त अवस्था प्राप्त करते.  स्वामींनी विलयन रंगात १७ हा आकडा लिहिला होता . जेव्हा सर्व सात चक्रांद्वारे  एकत्व प्राप्त करतील तेव्हा आम्ही दोघ सर्वांमध्ये प्रवेश करू . 

जय साई राम            

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जीवनामध्ये कितीही दुःख क्लेश वा अडचणी आल्या तरी प्रभूचरण धरून ठेवणे हे जीवनाचे एकमेव  ध्येय  असायला  हवे " .

पुष्प तेरावे पुढे सुरु

             असे स्वामींनी लिहिले . त्या अगोदर स्वामींनी ' वसंतास्मि  , मी वसंता झालो / बनलो ' असे लिहिले . याविषयी मी मागील प्रकरणात लिहिले आहे . माझ्या भाषांद्वारे स्वामी आता पुन्हा  नव्याने येऊन ' वसंतास्मि  ' असे लिहित आहेत . असा याचा अर्थ आहे . परमेश्वरी योजना कोणाला समजणार ? त्याचे  अवतार कार्य  अशा रितीने संपन्न होईल . स्वामींनी देह त्याग केला आणि आता माझ्या प्रेमामुळे ते पुन्हा नव्याने येत आहेत . माझ्या भावविश्वाला प्रतिसाद देत स्वामी पुन्हा येऊन म्हणतात , ' वसंतास्मि  ' , ' यत्  भवम्   तत्  भवती ' यानुसार हे घडते.  स्वामी माझ्या खोलीमध्ये भावदेहात , माझ्या विचारांमध्ये राहिले . नंतर देह धारण करून ते बहिर्गामी झाले . म्हणजे वसंताच्या भावविश्वामुळे ते वसंता बनले . 
            पुढे ते म्हणाले नद्यांमध्ये मी गंगा आहे ' परंतु स्वामींनी मला सांगितले की मी गंगा आहे . महाविष्णूंच्या चरणकमलांपासून  उगम पावून भूतलावर येणारी गंगा . गंगामातेचे वाहन मगर आहे . स्वामी तिची तुलना माझ्याशी करतात . मी ही महाविष्णूंच्या चरणांपासून आले आहे . मी निरंतर त्यांची पादसेवा करते . परंतु पृथ्वीवरील लोकांची दुःख पाहून मी इथे आले . मी स्वामींपासून  विभक्त झाल्यामुळे दुःख भोगत आहे. 
              मगर कामदेवाचे प्रतिक आणि त्याच्याशी संबंधित आहे . त्याला मकरध्वज असेही संबोधतात . स्वामी आणि मी , आम्ही दोघांनी जगातील सर्व काम जाळून टाकला . बालवयातच मला कृष्णाशी विवाह करण्याची इच्छा होती . स्वामींनी माझ्याशी विवाह केला पण मी याबाबत अनभिज्ञ होते.  त्यामुळे त्यांना प्राप्त करण्यासाठी मी तप केले . मी माझ्या इंद्रियांवर ताबा मिळवला . काम म्हणजे काय हे मला माहित नव्हते . स्वामींनी आणि मी जगातील सर्व काम नष्ट केला . माझ्या तपाद्वारे मी संपूर्ण विश्व वसंतमयम्  बनवले. 
            स्वामींशिवाय मी या जगात राहू शकत नाही . त्यांचा किमान एक शब्द , एक दृष्टीक्षेप , आणि एक स्पर्श मिळवा यासाठी मी तप केले . माझे तप संपूर्ण विश्वाला सत्य साई बनवेल . सर्व जण जीवनमुक्त असतील . माझे तप बहिर्गामी झाले , त्याने स्तूपाचे रूप धारण केले . माझे सहस्त्रार उघडून अमृत बाहेर पाझरत तारका स्पंदनांच्या स्वरुपात समस्त विश्वात पसरू लागले . ते सर्वांना अमरत्वाकडे घेऊन जाईल .  मी कामदेवाला माझे वाहन बनवून , अमृत कलश हातात घेऊन संपूर्ण विश्वात मिरवणूक काढते .यातून स्वामींनी हे सूचित केले . हे वसंतमयम्  आहे . वसंतमयम् ची तारका स्पंदने संपूर्ण विश्वात भरून राहतात . 
            स्वामी आणि मी आमच्या  भावविश्वात  वैश्विक काम वाहतो आहोत . म्हणून मला स्वामींचे दर्शन , स्पर्शन , संभाषण हवे आहे . यामध्ये ऐहिक कामभाव नाही . तर कामदहनानंतर आलेला प्रेमभाव आहे . हा हृदयाचा बंध आहे . देहाशी असलेला बंध म्हणजे काम आणि हृदयाशी असलेला बंध म्हणजे प्रेम.  तथापि यासाठीही   देह बंध आहे . 
            स्वामींच्या देहातून ज्योतीरूपाने माझा जन्म झाला.  ही काया पुन्हा एकदा ज्योतीस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन व्हायला हवी . ज्योती स्वरूप स्वामी देह धारण करतील आणि माझी काया ज्योती स्वरूप होईल. 
          तुम्हाला तुमचा देह कसा प्राप्त होतो ?  तुमच्या पूर्व संस्कारांमुळे .  संस्कार मातीत प्रवेशित होऊन अन्नामध्ये जातात . हे संस्कार अन्नाद्वारे पित्याच्या देहात जातात व तेथून ते मातेच्या देहात प्रवेश करतात. यांचा गर्भ बनून अपत्य जन्मते . मृत्यू नंतर देह पुन्हा मातीत मिसळतो . मातीतून आलेले सर्व देह पुन्हा मातीत मिसळतात . माझा देह स्वामींच्या तेजातून जन्मला. तो पुन्हा ज्योती स्वरूप बनून त्यांच्या देहात विलीन होईल . सर्वांचा जन्म कामभावातून होतो . परंतु माझा जन्म ज्ञान जन्म आहे . मी कामावर ताबामिळवून त्याला माझे वाहन बनवले . या सत्यमयम् जगात सर्वांचा ज्ञान जन्म असेल.  कामाचा अंधकार नष्ट होऊन ज्ञानदीप पूर्ण तेजाने प्रकाशमान होईल .भवसागरातील आसक्तीच्या मगरी आपल्याला गिळंकृत करतात . ' मी आणि माझे '  या भावामधून आसक्ती निर्माण होते.  या   आसक्ती रूपी  मगरी  आपल्याला   गिळंकृत  करतात . आपल्या इच्छानवर नियंत्रण ठेऊन आपण यातून आपली सुटका करून घ्यायला  हवी.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम    
        

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " एखादी गोष्ट अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो.   हा जगाचा कायदा आहे ".


      वसंतामृतमाला 
           पुष्प तेरावे 
        मगरीची मिरवणूक 
 

                 २६ मे २०१३ ला स्वामींनी एक चित्र दिले.   ते महालक्ष्मीचे चित्र असावे असे वाटत होते . परंतु ती लाल कमळा ऐवजी मगरीवर आसनस्थ होती . तिच्या एका हातात कमळ होते आणि दुसऱ्या हातात कलश.  पार्श्वभूमीवर पर्वत दिसत होते व त्यातील एक पर्वत हत्तीच्या आकाराचा होता.   चित्रावर स्वामींनी लिहिले 
वसंतास्मि
स्त्रोतसाम् अस्मि जान्हवी 
             चित्राच्या मागील बाजूस तोच ' स्त्रोतसाम्  ' शब्द हिंदी आणि इंग्रजी मध्ये लिहिला होता आणि पुढे 
अहम् ऋतूनां कुसुमाकरः 
ऋतुंमध्ये मी वसंत आहे 
मासंमध्ये मी मार्गशीष आहे 
माशांत मी मगर आहे 
ज्योतींमध्ये मी किरणांनी युक्त सूर्य आहे. 
… 
मी स्वामींना याविषयी विचारले
२६ मे २०१३ दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी , तुम्ही हे ' वसंतास्मि ' काय दिले आहे ? हे सर्व काय आहे ? 
स्वामी - गीतेच्या १० अध्यायात श्रीकृष्ण घोषित करतो की तो सर्वांमध्ये आहे व नंतर तो सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये तो स्वतः विद्यमान असलेल्या त्याच्या दिव्य विभूतींबद्दल सांगतो .   आता तू वसंतमयम द्वारे हेच दाखवत आहेस .  
वसंता - स्वामी हे गंगेचे चित्र काय आहे ? 
स्वामी - तू स्वतः महाविष्णूंच्या चरणांनमधून उगम पावणारी गंगा आहेस.   तू कामदेवाला तुझे वाहन बनवून , हातामध्ये अमृत कलश घेऊन संपूर्ण विश्वात मिरवणूक काढतेस.  
वसंता - स्वामी , तुम्ही अगोदर म्हणालात वसंतास्मि , म्हणजे तुम्ही ते आहात.  
स्वामी - तूच सर्व बनली आहेस , वसंतमयम.  
ध्यान समाप्ती 
आता आपण पाहूया.   गीतेच्या १० व्या अध्यायात असे सांगितले आहे की जरी तो सर्वांमध्ये असला तर त्याच्या दिव्य विभूती काही गोष्टींमध्ये प्रकर्षाने दिसून येतात.  
२१ व्या श्लोकात म्हटले आहे, 
ज्योतींमध्ये मी तेजस्वी किरणांनी युक्त सूर्य आहे.
३१ व्या श्लोकात म्हटले आहे, 
नद्यांमध्ये मी गंगा आहे. 
३५ व्या श्लोकात म्हटले आहे ,
महिन्यांमध्ये मी मार्गशीष आहे
ऋतुंमध्ये मी वसंत आहे.
३१ व्या श्लोकात म्हटले आहे , 
माशांमध्ये मी मगर आहे. 
… 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात..…

जय साई राम 

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या आचरणाची जाणीव असायला हवी.  आपण आपल्याला शुद्ध , निर्मल  बनवायला हवे ".

पुष्प बारावे पुढे सुरु 

२९ एप्रिल २०१३ संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , माझ्या डोळ्यांना काही होऊ नये......देहाला त्रास झाला तर हरकत नाही . 
स्वामी - तू थोडं थोडं लिही . तू सतत लिहित असतेस आणि नंतर तू ते सर्व वाचतेस . त्याच्याबरोबर तुझी इतरही कार्ये चालूच असतात . त्यामुळे हे घडले . 
वसंता - मी आता असे करणार नाही . माझ्या डोळ्यांना आणि मनाला काही होऊ नये . 
स्वामी - मी तुला वचन देतो , तुझ्या डोळ्यांवर आणि मनावर कशाचाही परिणाम होणार नाही . 
ध्यान समाप्ती 
            काल रात्रीच्या टपालात स्वामींनी दोन डोळ्यांचे चित्र रेखाटले व V हे अक्षर काढले मी स्वामींना याबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले , " तुला काहीही होणार नाही त्याचा पुरावा म्हणून मी हे दर्शवले आहे ". 
             स्वामींनी ३० एप्रिलच्या टपालात ' पराभक्ती ' पुस्तकातून अनेक गोष्टी सूचित केल्या . पान ६२ वरती त्यांनी ' साई कृष्ण लीला ' असे मराठीत लिहिले . पान ६३ वर त्यांनी BH असे लिहून डोळ्यांचा आकार काढला . त्या पानावरील मजकूर काय होता ते आपण पाहू या . इथे स्वामी म्हणतात की महाभारत युद्धानंतर सर्वजण कृष्ण व्दारकेला कधी परतणार याची वाट पहात होते . एखादे लहान मुल जसे आईची वाट पहाते किंवा वासरू ज्या आतुरतेने गाय परतण्याची वाट पहाते तसे सर्वजण डोळ्यात प्राण आणून कृष्णाची वाट पहात होते . त्याच्या विरह वेदना त्यांना असह्य होत होत्या . सर्वजण त्याच्यासाठी व्याकूळ झाले होते . या पानावर स्वामींनी ' साई कृष्ण लीला ' असे लिहिले . 
              स्वामींनी असे लिहून ते परत येतील हे दर्शवले . महाभारत युद्धानंतर व्दारकेतील सर्व लोकं कृष्ण परतण्याची आतुरतेने वाट पहात होते . सर्वजण त्याच्यासाठी व्याकुळ झाले होते . स्वामी म्हणतात मी ही त्यांच्या परतण्यासाठी अशीच तळमळते आहे . तथापि केवळ मीच नव्हे तर संपूर्ण जगालाच त्यांच्या परतण्याची अपेक्षा आहे . जगभरातील समस्त साईभक्त त्यांची वाट पहात आहेत . ते पुन्हा परत येतील असे माझ्या आणि स्वामींच्या नाडीग्रंथामध्ये लिहिले आहे . आम्ही सर्वजण पूर्ण श्रद्धेने त्यांची वाट पहात आहोत . क्षणाक्षणाला माझे मन आक्रदन करत आहे . 
             ते महाभारत युद्ध होते , हे कलियुग युद्ध आहे . स्वामींनी जगभरातील सर्वांची पापकर्मे आपल्यावर घेऊन देह त्याग केला . मी ही जगातील सर्वांची पापकर्मे स्वीकारून दुखः भोगते आहे . करुण विलाप करून मी प्रत्येकक्षण त्यांच्या येण्याची वाट पाहते आहे . नवजात शिशु जसे आईसाठी रडते तशी माझी अवस्था आहे . याचा माझ्या देहावर अधिक परिणाम झाला आहे . स्वामी म्हणाले की ते लिहितील . त्या पानावर , सर्व द्वारकावासी कृष्णाच्या परतण्याची कशी वाट पहात होते , ते स्वामी सांगतात . स्वामींनी तेथे ' साई कृष्ण लीला ' लिहिले . आपण केवळ परमेश्वराच्या सर्वज्ञतेने विस्मित होऊ शकतो !    
             स्वामींनी चित्र काढलेल्या डोळ्यांविषयी आणि त्या पानावरील मजकुराविषयी आता आपण पाहू या . त्यावर असे लिहिले होते की ११०८ गोपींसमोर एकाच वेळी कृष्णाचे रूप दृश्यमान झाले . जर तो एखाद्याच गोपीच्या घरी  गेला असता तर त्याच्यामध्ये द्वेषभाव निर्माण झाला असता म्हणून त्याने सर्वांच्या घरी एकाच वेळी प्रवेश केला . परमेश्वर सर्वांसाठी समाईक आहे हे यातून दर्शवले आहे . तो सर्वांमध्ये आहे , सर्वव्यापी आहे . 
             इथे राधा आणि गोपीयांच्यातील फरक सांगितला आहे . कृष्ण केवळ आपल्या एकटीचा आहे दुसऱ्या कोणाचाही नाही अशी सर्व गोपींची भावना होती .  यावरून त्यांची संकुचित दृष्टी दिसते तथापि राधा याहून वेगळी होती . तिचे विचार असे नव्हते . वृंदावन आणि गोविंदा हा सर्वांसाठी समाईक आहे अशी तिची विचारधारा होती . तिच्यामध्ये विद्यमान असणारे दिव्यत्व सर्वांमध्ये आहे हे तिने जाणले होते . हा राधेचा दृष्टीकोन होता. मी जेव्हा माझ्या दृष्टीबद्दल विचारले तेव्हा स्वामींनी त्याचा तुलनेसाठी वापर केला . मी ही राधे समान आहे. मी प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर पाहते . मला जशी स्वामींची अनुभूती मिळते तशी सर्वांना मिळो . ह्या एकमात्र कारणास्तव  मी तप करते आहे. यातूनच नवनिर्मिती होणार . इथे स्वामी आणि मी सदैव सर्वत्र प्रत्येकात आणि प्रत्येक गोष्टीत विद्यमान असू . आम्ही सर्वांमध्ये प्रवेश करून संपूर्ण निर्मितीत एकत्र राहू . 

जय साई राम 
व्ही. एस.    

रविवार, ९ फेब्रुवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " इतरांमधील दोष शोधू नका . स्वतः मध्ये असणारे दोष शोधून काढा ". 


वसंतामृतमाला
पुष्प बारावे 
साई कृष्ण लीला
         
           
           " स्वामींचा विरह असह्य होऊन मी अश्रू ढाळत होते ". 
२६ एप्रिल २०१३ संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , स्वामी ! माझे प्रभू !
स्वामी - रडू नकोस , ये , काय झाल सांग मला ? 
वसंता - स्वामी, श्रीराम  पत्नी आणि मुलांपासून केवळ १२ वर्षे वेगळे राहिले . तुम्ही मी न् माझ्या मुलांपासून १९६१ सालापासून वेगळे राहताय . ५२ वर्षे झाली ! मी अजून ५० वर्षे वाट पाहू का ?
स्वामी - रडू नकोस मी नक्की येईन . 
वसंता - हे असं कधी , कोणत्या ठिकाणी वा पूर्वीच्या कोणत्या युगात घडले आहे का ? 
स्वामी - तू रडू नकोस . तू माझी देवी आहेस . मी नक्की येईन . मी हे लिहीन . तुझ्या या कोमल भावांमुळे तुझी  ही काया अत्यंत नाजूक झाली आहे . या सर्व कालखंडात तुझा विरह व तुझे अश्रू माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक ठरले आहेत . मी तुला पाहताक्षणी धावत येऊन तुझा हात हाती घेत तुला माझ्या अश्रूंनी चिंब भिजवून टाकेन . पण त्यावेळी तुझ्या कायेला क्लेश होतील का काय अशी भीती मला वाटते . 
वसंता - स्वामी , तुमचे प्रेम मला सहन होत नाही . 
स्वामी - तुझा देह एवढा कोमल आहे की त्यावर थोडा जरी दाब पडला तरी तुला त्रास होतो , म्हणून तुला स्पर्श करतांना मी तुझी काळजी घेईन . 
ध्यान समाप्ती 
            आता आपण पाहू या . मी कितीही लिखाण केले तरी स्वामींच्या विरहाने मी सतत रडत असते . माझ्या देहाला होणाऱ्या त्रासाचे हेच कारण आहे . रामाने गर्भवती सीतेला अरण्यात पाठवले . लवकुशाच्या जन्मानंतर ते तिघही वाल्मिकींच्या आश्रमात राहिले . त्यानंतर १२ वर्षांनी राम , सीतेला आणि त्यांच्या मुलांना पहिल्यांदा भेटले . स्वामी आमच्यापासून ५२ वर्षांपूर्वी दूर गेले . मी कोण आहे हे त्यांनी उघड केले नाही . यासाठी मी त्यांना विचारले , " मी अजून किती प्रतिक्षा करायची "? या विचाराने मी अधिकच रडत होते . पूर्वीच्या युगातील कोणालाही कधीही अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले नाही . माझ्या अश्रूंना उत्तर देतांना स्वामी म्हणाले की  जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटू तेव्हा ते माझा हात धरून मला घरी घेऊन जातील.  स्वामी पुढे असेही म्हणाले की त्यांनी माझा हात हातात घेतल्यावर माझ्या नाजूक देहाला त्यांचा स्पर्श पेलवणार नाही अशी त्यांना भीती वाटते . अशा तऱ्हेने स्वामी त्यांचे प्रेम दर्शवितात.  आतापर्यंत परमेश्वराच्या कोणत्याही रूपाने अशा तऱ्हेने उघडपणे आपले प्रेम दर्शवले नाही . स्वामी हे सर्व अवतार कार्यासाठी करत आहेत . त्यांच्या प्रमाणे कोणत्याही अवताराने असे प्रकटीकरण केले नाही.  इतर सर्व अवतार साक्षी भावात स्थित होते . हा अवतार त्याचे भावविश्व दर्शवण्यासाठी आला . स्वामींचे आणि माझे भाव बाहेर जाऊन विश्वामध्ये परिवर्तन घडवतात . 
           स्वामींनी एक विणलेला कापडाचा तुकडा दिला त्यावर काही मजकूर लिहिला होता तो आता आपण पाहू या . 
18 d be yearn * ( heart shape )
it would be 
My verge promise to you 
Garden we around
Then , SV in the form of a rose . 
           वैकुंठ पृथ्वीवर अवतरावे यासाठी मी सदैव व्याकुळ असते . 18 d या मधून हे दर्शवले जाते . आता अखेरीस स्वामी मला हे वचन देतात . संपूर्ण विश्व फुलांचे सुंदर उपवन बनेल जिथे सर्व S आणि V गुलाबपुष्पे असतील . हे स्वामींचे वचन आहे . 
            त्या कापडावर काही संगीताचे स्वरही होते . सत्ययुगामध्ये सर्व मधुर संगीतासारखे असेल . स्वामींनी असे वचन दिले आहे . त्या दिवशी मी सतत रडत होते . त्याचा माझ्या डोळ्यांवर परिणाम झाला . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..........

जय साई राम