ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एखादी गोष्ट अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. हा जगाचा कायदा आहे ".
वसंतामृतमाला
पुष्प तेरावे
मगरीची मिरवणूक
२६ मे २०१३ ला स्वामींनी एक चित्र दिले. ते महालक्ष्मीचे चित्र असावे असे वाटत होते . परंतु ती लाल कमळा ऐवजी मगरीवर आसनस्थ होती . तिच्या एका हातात कमळ होते आणि दुसऱ्या हातात कलश. पार्श्वभूमीवर पर्वत दिसत होते व त्यातील एक पर्वत हत्तीच्या आकाराचा होता. चित्रावर स्वामींनी लिहिले
वसंतास्मि
स्त्रोतसाम् अस्मि जान्हवी
चित्राच्या मागील बाजूस तोच ' स्त्रोतसाम् ' शब्द हिंदी आणि इंग्रजी मध्ये लिहिला होता आणि पुढे
अहम् ऋतूनां कुसुमाकरः
ऋतुंमध्ये मी वसंत आहे
मासंमध्ये मी मार्गशीष आहे
माशांत मी मगर आहे
ज्योतींमध्ये मी किरणांनी युक्त सूर्य आहे.
…
मी स्वामींना याविषयी विचारले२६ मे २०१३ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी , तुम्ही हे ' वसंतास्मि ' काय दिले आहे ? हे सर्व काय आहे ?
स्वामी - गीतेच्या १० अध्यायात श्रीकृष्ण घोषित करतो की तो सर्वांमध्ये आहे व नंतर तो सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये तो स्वतः विद्यमान असलेल्या त्याच्या दिव्य विभूतींबद्दल सांगतो . आता तू वसंतमयम द्वारे हेच दाखवत आहेस .
वसंता - स्वामी हे गंगेचे चित्र काय आहे ?
स्वामी - तू स्वतः महाविष्णूंच्या चरणांनमधून उगम पावणारी गंगा आहेस. तू कामदेवाला तुझे वाहन बनवून , हातामध्ये अमृत कलश घेऊन संपूर्ण विश्वात मिरवणूक काढतेस.
वसंता - स्वामी , तुम्ही अगोदर म्हणालात वसंतास्मि , म्हणजे तुम्ही ते आहात.
स्वामी - तूच सर्व बनली आहेस , वसंतमयम.
ध्यान समाप्ती
आता आपण पाहूया. गीतेच्या १० व्या अध्यायात असे सांगितले आहे की जरी तो सर्वांमध्ये असला तर त्याच्या दिव्य विभूती काही गोष्टींमध्ये प्रकर्षाने दिसून येतात.
२१ व्या श्लोकात म्हटले आहे,
ज्योतींमध्ये मी तेजस्वी किरणांनी युक्त सूर्य आहे.
३१ व्या श्लोकात म्हटले आहे,
नद्यांमध्ये मी गंगा आहे.
३५ व्या श्लोकात म्हटले आहे ,
महिन्यांमध्ये मी मार्गशीष आहे
ऋतुंमध्ये मी वसंत आहे.
३१ व्या श्लोकात म्हटले आहे ,
माशांमध्ये मी मगर आहे.
…
उर्वरित वसंतामृत पुढील भागात..…
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा