ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराशी तादात्म्य पावलेले मन परमेश्वरच होऊन जाते ".
पुष्प तेरावे पुढे सुरु
आता पुढील श्लोक पाहू .ज्योतींमध्ये मी सूर्य आहे ........ असे कृष्णानी घोषित केले . तो तेजाने तळपणारा सूर्य आहे . सूर्य प्रकाशाशिवाय वृक्ष वेलींची वाढ होऊ शकत नाही . मानवालाही जगण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे . अंधारामध्ये पृथ्वीवर कामकाज करणे शक्य नाही . हे ज्ञानासारखे आहे . ज्ञानाविना मनुष्य पशूवत व्यवहार करतो . तो केवळ अन्न ग्रहण , निद्रा आणि प्रजोत्पत्ती एवढेच करतो . मनुष्याने ज्ञान अर्जित करून बुद्धीचा विकास केला पाहिजे . मानवाने आपण जन्म का घेतला व आपल्या जन्माचा उद्देश काय हे जाणून घेतले पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत .
ऋषिमुनींनी प्रकट केलेल्या वेदिक वचनांनुसार मनुष्याने आपले जीवन व्यतीत करावयास हवे . नीतीतत्वांनुसार जीवन जगावे . अज्ञानाच्या तिमिरामधून ज्ञानाच्या प्रकाशाकडे गेले पाहिजे . पुनर्जन्मापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने हा जन्म सार्थकी लावावा . सर्वांनी ही साधना करायला हवी . सूर्य ज्ञानाचे प्रतिक आहे . या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती करून देणारे ज्ञान आपण मिळवायला हवे . स्वामी कोटीसूर्यसम तेजस्वरूप आहेत . त्यांनी ८४ वर्षे जगावर ज्ञानवृष्टी केली . तथापि मनुष्यामध्ये परिवर्तन घडले नाही . माझ्या अश्रूंद्वारे मी त्यांच्याकडून ज्ञान खेचून घेऊन ते प्रकाशित करते .
काल स्वामींनी एक बनियनच्या कापडाचा तुकडा दिला . त्यावर भगव्या आणि जांभळ्या ( विलयन रंगात ) रंगात खालील मजकूर लिहिला होता .
17A:OXO: 24GG 17
संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी हे तुम्ही काय लिहिले आहे ?
स्वामी - सात चक्रांच्या पलीकडे केवळ एक परमात्मा असतो . सर्वजण एकच आहेत , आदिमूलम् . तू , आदिशक्ती पूर्णम् मधून जे पूर्णम् बनवतेस जे पूर्णम् च आहे . अशा तऱ्हेने सर्वांची २४ तत्वे ईशस्थिती प्राप्त करतात . आजपासून सर्व काही बदलेल .
ध्यान समाप्ती
आता आपण पाहू या . सात चक्रांच्यापलीकडे , सर्व एकच आहेत . पूर्णम् मधून पूर्णम् काढले तरी ते पूर्णम् च रहाते . असे म्हटले आहे.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ते पूर्ण आहे , हे पूर्ण आहे. पूर्णम् मधून पूर्णम् जन्मते . पूर्णम् मधून पूर्णम् वजा केले असता शेष राहते जे ते केवळ पूर्णम् असते .
तथापि इथे स्वामी सांगतात की पूर्णम् ला गुणले तरी ते पूर्णम् च राहते . ही निर्मिती आहे . ही परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होणारी २४ तत्वे आहेत . याचा अर्थ प्रत्येक व्यक्ति जीवनमुक्त अवस्था प्राप्त करते. स्वामींनी विलयन रंगात १७ हा आकडा लिहिला होता . जेव्हा सर्व सात चक्रांद्वारे एकत्व प्राप्त करतील तेव्हा आम्ही दोघ सर्वांमध्ये प्रवेश करू .
जय साई राम
very good, sai ram
उत्तर द्याहटवा