गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या आचरणाची जाणीव असायला हवी.  आपण आपल्याला शुद्ध , निर्मल  बनवायला हवे ".

पुष्प बारावे पुढे सुरु 

२९ एप्रिल २०१३ संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , माझ्या डोळ्यांना काही होऊ नये......देहाला त्रास झाला तर हरकत नाही . 
स्वामी - तू थोडं थोडं लिही . तू सतत लिहित असतेस आणि नंतर तू ते सर्व वाचतेस . त्याच्याबरोबर तुझी इतरही कार्ये चालूच असतात . त्यामुळे हे घडले . 
वसंता - मी आता असे करणार नाही . माझ्या डोळ्यांना आणि मनाला काही होऊ नये . 
स्वामी - मी तुला वचन देतो , तुझ्या डोळ्यांवर आणि मनावर कशाचाही परिणाम होणार नाही . 
ध्यान समाप्ती 
            काल रात्रीच्या टपालात स्वामींनी दोन डोळ्यांचे चित्र रेखाटले व V हे अक्षर काढले मी स्वामींना याबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले , " तुला काहीही होणार नाही त्याचा पुरावा म्हणून मी हे दर्शवले आहे ". 
             स्वामींनी ३० एप्रिलच्या टपालात ' पराभक्ती ' पुस्तकातून अनेक गोष्टी सूचित केल्या . पान ६२ वरती त्यांनी ' साई कृष्ण लीला ' असे मराठीत लिहिले . पान ६३ वर त्यांनी BH असे लिहून डोळ्यांचा आकार काढला . त्या पानावरील मजकूर काय होता ते आपण पाहू या . इथे स्वामी म्हणतात की महाभारत युद्धानंतर सर्वजण कृष्ण व्दारकेला कधी परतणार याची वाट पहात होते . एखादे लहान मुल जसे आईची वाट पहाते किंवा वासरू ज्या आतुरतेने गाय परतण्याची वाट पहाते तसे सर्वजण डोळ्यात प्राण आणून कृष्णाची वाट पहात होते . त्याच्या विरह वेदना त्यांना असह्य होत होत्या . सर्वजण त्याच्यासाठी व्याकूळ झाले होते . या पानावर स्वामींनी ' साई कृष्ण लीला ' असे लिहिले . 
              स्वामींनी असे लिहून ते परत येतील हे दर्शवले . महाभारत युद्धानंतर व्दारकेतील सर्व लोकं कृष्ण परतण्याची आतुरतेने वाट पहात होते . सर्वजण त्याच्यासाठी व्याकुळ झाले होते . स्वामी म्हणतात मी ही त्यांच्या परतण्यासाठी अशीच तळमळते आहे . तथापि केवळ मीच नव्हे तर संपूर्ण जगालाच त्यांच्या परतण्याची अपेक्षा आहे . जगभरातील समस्त साईभक्त त्यांची वाट पहात आहेत . ते पुन्हा परत येतील असे माझ्या आणि स्वामींच्या नाडीग्रंथामध्ये लिहिले आहे . आम्ही सर्वजण पूर्ण श्रद्धेने त्यांची वाट पहात आहोत . क्षणाक्षणाला माझे मन आक्रदन करत आहे . 
             ते महाभारत युद्ध होते , हे कलियुग युद्ध आहे . स्वामींनी जगभरातील सर्वांची पापकर्मे आपल्यावर घेऊन देह त्याग केला . मी ही जगातील सर्वांची पापकर्मे स्वीकारून दुखः भोगते आहे . करुण विलाप करून मी प्रत्येकक्षण त्यांच्या येण्याची वाट पाहते आहे . नवजात शिशु जसे आईसाठी रडते तशी माझी अवस्था आहे . याचा माझ्या देहावर अधिक परिणाम झाला आहे . स्वामी म्हणाले की ते लिहितील . त्या पानावर , सर्व द्वारकावासी कृष्णाच्या परतण्याची कशी वाट पहात होते , ते स्वामी सांगतात . स्वामींनी तेथे ' साई कृष्ण लीला ' लिहिले . आपण केवळ परमेश्वराच्या सर्वज्ञतेने विस्मित होऊ शकतो !    
             स्वामींनी चित्र काढलेल्या डोळ्यांविषयी आणि त्या पानावरील मजकुराविषयी आता आपण पाहू या . त्यावर असे लिहिले होते की ११०८ गोपींसमोर एकाच वेळी कृष्णाचे रूप दृश्यमान झाले . जर तो एखाद्याच गोपीच्या घरी  गेला असता तर त्याच्यामध्ये द्वेषभाव निर्माण झाला असता म्हणून त्याने सर्वांच्या घरी एकाच वेळी प्रवेश केला . परमेश्वर सर्वांसाठी समाईक आहे हे यातून दर्शवले आहे . तो सर्वांमध्ये आहे , सर्वव्यापी आहे . 
             इथे राधा आणि गोपीयांच्यातील फरक सांगितला आहे . कृष्ण केवळ आपल्या एकटीचा आहे दुसऱ्या कोणाचाही नाही अशी सर्व गोपींची भावना होती .  यावरून त्यांची संकुचित दृष्टी दिसते तथापि राधा याहून वेगळी होती . तिचे विचार असे नव्हते . वृंदावन आणि गोविंदा हा सर्वांसाठी समाईक आहे अशी तिची विचारधारा होती . तिच्यामध्ये विद्यमान असणारे दिव्यत्व सर्वांमध्ये आहे हे तिने जाणले होते . हा राधेचा दृष्टीकोन होता. मी जेव्हा माझ्या दृष्टीबद्दल विचारले तेव्हा स्वामींनी त्याचा तुलनेसाठी वापर केला . मी ही राधे समान आहे. मी प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर पाहते . मला जशी स्वामींची अनुभूती मिळते तशी सर्वांना मिळो . ह्या एकमात्र कारणास्तव  मी तप करते आहे. यातूनच नवनिर्मिती होणार . इथे स्वामी आणि मी सदैव सर्वत्र प्रत्येकात आणि प्रत्येक गोष्टीत विद्यमान असू . आम्ही सर्वांमध्ये प्रवेश करून संपूर्ण निर्मितीत एकत्र राहू . 

जय साई राम 
व्ही. एस.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा