ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्ही जेथे आहात आणि जे काही करत आहात ते कार्य परमेश्वराची पूजा समजून करा ".
पुष्प अकरावे पुढे सुरु
* दास्य :- हनुमान याचे आदर्श उदाहरण आहे असे स्वामी म्हणतात. तो सदैव रामाचाच विचार करत असे। मी सदैव स्वामींच्या विचारात असते. दिवसाचे २४ तास स्वामींच्या चिंतनात राहून मी स्वामींचे अवतार कार्य करत आहे. स्वामींच्या विचाराशिवाय क्षणभरही जगता येत नाही अशा अवस्थेत मी आहे. हे विचारच स्वामींचे अवतार कार्य बनतात. कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करण्यासाठी माझे विचार बाह्यगामी होतात.
जन्मापासूनचा माझा प्रत्येक विचार , उच्चार व कृती स्वामींच्या अवतार कार्या करता समर्पण आहे. हनुमानाने रामनाम ऐकू येत नाही म्हणून मूल्यवान रत्नहार टाकून दिला परंतु माझ्या जीवनात मी सृष्टीच्या कणाकणात स्वामी सामावले आहेत हे सिद्ध केले. स्वामींचे नाम नाही अशी कोणतीही जागा नाही ! माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामींनी , माझ्या देहातील अणुरेणुंमध्ये केवळ स्वामीच असल्याचे सिद्ध केले. त्रेता युगात हनुमानाने त्याच्या रोमारोमातून रामनामाच्या ध्वनी निनादत असल्याचे दर्शविले. या युगात माझ्या अणुरेणूत स्वामी असल्याचे स्वामींनी स्वतः सिद्ध केले. मला ' मी ' नसल्याने त्यांनी हे केले.
अजून काही गोष्टी आपण पाहू. हनुमानाने वेगवेगळ्या पाषाणानवर ' रा ' आणि ' म ' ही अक्षरे लिहून ते पाषाण समुद्रात फेकले. त्यातून राम हे नाम एकत्र येऊन लंकेचा सेतू तयार झाला. मी पाहाटे उठून माझ्या अंगप्रत्यंगावर ' ॐ साई राम ' लिहिले. अशा प्रकारे माझा देह कलियुग आणि सत्ययुग यांच्यामधील सेतू बनला. माझी काया विस्तार पावून नवनिर्मितीचे रूप धारण करते. मला स्वामींच्या चरणांखालील धूळ बनायचे आहे म्हणून त्यांनी मला ' ॐ श्री साई साई पादधुलिकायै नमः ' हे नाम दिले.
याचा अर्थ मी त्यांच्या चरणांखालची धूळ आहे. जो परमेश्वराचा दास असल्याचा दावा करतो. त्याने एवढया मर्यादेपर्यंत जाऊन ते सिद्ध करायला हवे.
* स्नेह वा सख्य :- याचा अर्थ मैत्री. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. अर्जुन हा कृष्णाच्या छायेसारखा होता. कितीही दुखः सोसावे लागले तरी त्याची कृष्णावरील श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. तो म्हणत असे , " कृष्णा तू माझे आश्रयस्थान आहेस , माझा एकमेव आशेचा किरण आहेस. तुझ्याशिवाय मला कोणीही वाचवू शकत नाही ". तो कृष्णाची अशी प्रार्थना करत असे. त्यामुळे कुरूक्षेत्राच्या युद्धभूमीवर कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. अर्जुनाने कृष्णाला आपल्या जीवनाचा सारथी बनवला होता. माझे जीवन केवळ स्वामी आहेत. मला ' मी ' नसल्याने ते माझ्या जीवनरथाचे सारथ्य करतात, मी एकटी कोणतेही कार्य करण्यास असमर्थ आहे. या जगात माझ्यासारखे जीवन कोणीही जगू शकणार नाही. जरा , व्याधी आणि मृत्यू मला कधीही स्पर्श करू शकणार नाहीत. हा वयस्क देह तरुण व अक्षत् बनून परमेश्वराच्या देहामध्ये विलीन होईल. अगदी बालपणापासून माझे विचार असेच होते. मी अशा पद्धतीने जीवन जगल्यामुळे केवळ स्वामी मला वाचवू शकतात.
सच्चे मित्र कधीही विभक्त होत नाहीत. त्यांच्यामध्ये कोणतीही गोष्ट गुपित नसते. हे खऱ्या मैत्रीचे प्रतिक आहे. स्वामी सदैव माझ्यासोबत असतात , स्थूल देहात नव्हे तर दिव्या देहात. मित्र एकत्र वावरतात. कृष्ण व अर्जुन बऱ्याच वेळा एका थाळीत जेवत असत व एकत्र झोपत असत. तथापि आमच्या बाबतीत माझा जन्म स्वामींच्या देहातून झाला अन् पुन्हा माझा त्यांच्याशी योग होईल . एवढेच नाही तर नवनिर्मितीत जिथे स्वामी तिथे मी असेन . हे खरे सख्य आहे . कृष्ण अर्जुनाचा सारथी असल्याने कृष्णाचे एक नाव पार्थसारथी आहे . पार्थाचा सारथी . माझ्या भक्तीमुळे स्वामींचे नाम वसंत साई साय झाले . हे स्वामींनी मंत्र स्वरूपात ' ॐ श्री साई वसंत साईसाय नमः ' लिहिले . ह्या मंत्राने देह , मन आणि आत्मा यांचे त्रिविध ताप नष्ट होतात . हा सत्ययुगाचा मंत्र असून याचा अनेकांना लाभ झाला आहे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा