ओम श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जीवनामध्ये कितीही दुःख क्लेश वा अडचणी आल्या तरी प्रभूचरण धरून ठेवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय असायला हवे " .
पुष्प तेरावे पुढे सुरु
पुढे ते म्हणाले नद्यांमध्ये मी गंगा आहे ' परंतु स्वामींनी मला सांगितले की मी गंगा आहे . महाविष्णूंच्या चरणकमलांपासून उगम पावून भूतलावर येणारी गंगा . गंगामातेचे वाहन मगर आहे . स्वामी तिची तुलना माझ्याशी करतात . मी ही महाविष्णूंच्या चरणांपासून आले आहे . मी निरंतर त्यांची पादसेवा करते . परंतु पृथ्वीवरील लोकांची दुःख पाहून मी इथे आले . मी स्वामींपासून विभक्त झाल्यामुळे दुःख भोगत आहे.
मगर कामदेवाचे प्रतिक आणि त्याच्याशी संबंधित आहे . त्याला मकरध्वज असेही संबोधतात . स्वामी आणि मी , आम्ही दोघांनी जगातील सर्व काम जाळून टाकला . बालवयातच मला कृष्णाशी विवाह करण्याची इच्छा होती . स्वामींनी माझ्याशी विवाह केला पण मी याबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे त्यांना प्राप्त करण्यासाठी मी तप केले . मी माझ्या इंद्रियांवर ताबा मिळवला . काम म्हणजे काय हे मला माहित नव्हते . स्वामींनी आणि मी जगातील सर्व काम नष्ट केला . माझ्या तपाद्वारे मी संपूर्ण विश्व वसंतमयम् बनवले.
स्वामींशिवाय मी या जगात राहू शकत नाही . त्यांचा किमान एक शब्द , एक दृष्टीक्षेप , आणि एक स्पर्श मिळवा यासाठी मी तप केले . माझे तप संपूर्ण विश्वाला सत्य साई बनवेल . सर्व जण जीवनमुक्त असतील . माझे तप बहिर्गामी झाले , त्याने स्तूपाचे रूप धारण केले . माझे सहस्त्रार उघडून अमृत बाहेर पाझरत तारका स्पंदनांच्या स्वरुपात समस्त विश्वात पसरू लागले . ते सर्वांना अमरत्वाकडे घेऊन जाईल . मी कामदेवाला माझे वाहन बनवून , अमृत कलश हातात घेऊन संपूर्ण विश्वात मिरवणूक काढते .यातून स्वामींनी हे सूचित केले . हे वसंतमयम् आहे . वसंतमयम् ची तारका स्पंदने संपूर्ण विश्वात भरून राहतात .
स्वामी आणि मी आमच्या भावविश्वात वैश्विक काम वाहतो आहोत . म्हणून मला स्वामींचे दर्शन , स्पर्शन , संभाषण हवे आहे . यामध्ये ऐहिक कामभाव नाही . तर कामदहनानंतर आलेला प्रेमभाव आहे . हा हृदयाचा बंध आहे . देहाशी असलेला बंध म्हणजे काम आणि हृदयाशी असलेला बंध म्हणजे प्रेम. तथापि यासाठीही देह बंध आहे .
स्वामींच्या देहातून ज्योतीरूपाने माझा जन्म झाला. ही काया पुन्हा एकदा ज्योतीस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन व्हायला हवी . ज्योती स्वरूप स्वामी देह धारण करतील आणि माझी काया ज्योती स्वरूप होईल.
तुम्हाला तुमचा देह कसा प्राप्त होतो ? तुमच्या पूर्व संस्कारांमुळे . संस्कार मातीत प्रवेशित होऊन अन्नामध्ये जातात . हे संस्कार अन्नाद्वारे पित्याच्या देहात जातात व तेथून ते मातेच्या देहात प्रवेश करतात. यांचा गर्भ बनून अपत्य जन्मते . मृत्यू नंतर देह पुन्हा मातीत मिसळतो . मातीतून आलेले सर्व देह पुन्हा मातीत मिसळतात . माझा देह स्वामींच्या तेजातून जन्मला. तो पुन्हा ज्योती स्वरूप बनून त्यांच्या देहात विलीन होईल . सर्वांचा जन्म कामभावातून होतो . परंतु माझा जन्म ज्ञान जन्म आहे . मी कामावर ताबामिळवून त्याला माझे वाहन बनवले . या सत्यमयम् जगात सर्वांचा ज्ञान जन्म असेल. कामाचा अंधकार नष्ट होऊन ज्ञानदीप पूर्ण तेजाने प्रकाशमान होईल .भवसागरातील आसक्तीच्या मगरी आपल्याला गिळंकृत करतात . ' मी आणि माझे ' या भावामधून आसक्ती निर्माण होते. या आसक्ती रूपी मगरी आपल्याला गिळंकृत करतात . आपल्या इच्छानवर नियंत्रण ठेऊन आपण यातून आपली सुटका करून घ्यायला हवी.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साई राम
साई राम
उत्तर द्याहटवाsai ram
उत्तर द्याहटवा