ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निरागसतेने प्राप्त केलेल्या स्थानापाशी अहंकार कधीच पोहोचू शकत नाही ".
पुष्प अठरावे पुढे सुरु
स्वामींचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी , त्यांच्या डोळ्यातील रेटिना त्यांनी मला दिल्याचे उघड केले , त्यामुळे त्यांचा एक नेत्र दृष्टिहीन असल्याचे ही त्यांनी सांगितले . अशा तऱ्हेने मी शब्दशः स्वामींच्या नजरेतून सर्व पाहते आहे . स्वामी माझे सर्वस्व असल्याने केवळ तेच माझ्या हृदयात आहेत . स्वामी म्हणतात , " जर तुमचे हृदय राधेसारखे असेल तर कृष्ण तुमच्या हृदयात वास करेल ." स्वामींनी असे सांगितले आहे परंतु इथे , मी स्वामींच्या हृदयात आहे . हा फरक आहे . परमेश्वर अंतर्यामी बनून सर्वांच्या हृदयात वास करतो . तथापि मी स्वामींच्या हृदयात वास करते . महाविष्णूंच्या हृदयात वास करणारी महालक्ष्मी मी आहे . अनेकजण म्हणतात ' मी राधा आहे , मी सीता आहे वा मी महालक्ष्मी आहे '. परंतु केवळ असा दावा करून वा त्यांच्यासारखी वस्त्रे परिधान करून का कोणी राधा वा सीता होऊ शकेल ? ती केवळ नक्कल होईल . नकली रत्न जरी हिऱ्यासारखे दिसले तरी कधीही हिरा होऊ शकत नाही . केवळ साधना आणि भक्तीद्वारे परमेश्वरप्राप्ती होते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........
जय साई राम