रविवार, २० एप्रिल, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" गीता .......मुक्तीचे अमृत आहे ". 


वसंतामृतमाला 
पुष्प अठरावे 
तुम्ही राधेच्या हृदयाचे अनुकरण करू शकत नाही 
           आजच्या टपालामध्ये स्वामींनी एक गुलाबी बॅग दिली . त्याला सोनेरी दोऱ्यात ओवलेले १६ गुलाबी मोत्यांचे दोन बंद ( हॅंडल ) होते . बॅगेच्या दोन्ही बाजूंना १६ गुलाबी गुलाब होते . हे आमच्या प्रेमाद्वारे प्रसवणाऱ्या नवनिर्मितीचे सूचक आहे . नवनिर्मितीमध्ये परमेश्वराच्या सोळा कला अंतर्भूत आहेत हे या गुलाबी बॅगेद्वारे सूचित होते . त्याचप्रमाणे सर्वजण उत्तम प्रतीच्या मोत्यासारखे असतील . यातून आपल्या लक्षात येते की जन्म घेणारे सर्वजण साई संसार सागरातील मोती असतील .
            स्वामींनी मागील प्रकरणात एका कापडाच्या तुकड्यावर सत्य युग उद्यानाविषयी लिहिले होते . त्यामध्ये सत्य युग हे गुलाबी गुलाबपुष्पांनी बहरलेली पुष्पवाटिका असल्याचे दर्शवले आहे . सर्वांमध्ये केवळ स्वामींचे आणि माझे भाव कार्यरत असतील . ही नवनिर्मिती आहे . सोनेरी धागा सुवर्ण युगाचे प्रतिक आहे . 
            ' पराभक्ती ' या पुस्तकात स्वामींनी सांगितले की सर्व गोपींना असे वाटते की कृष्ण त्यांच्या एकटीचाच आहे . तथापि राधेचा असा भाव होता की वृंदावन आणि गोविंदा हे सर्वांसाठी सामाईक आहेत . अनेक वर्षांपूर्वी या संकल्पनेवर आधारित स्वामींवर एक गीत मी लिहिले . 
        प्रशांती निलयम अन् पर्तीश्वर 
        सकलांचा सामाईक ठेवा 
        मग द्वेषभाव का मनी , मानवा ? 
        असा कोण आहे जगती , जो न मोहित झाला त्याच्या कृपेने? 
             प्रशांती निलयम आणि स्वामी हा सर्वांचा सामाईक ठेवा आहे . ते कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीचे वा संघाचे नाहीत . परमेश्वर सर्वांसाठी सामाईक आहे . ते सर्व राष्ट्र आणि सर्व धर्मांचे आहेत . स्वामी म्हणजे सर्वांच्या हृदयात वास करणारी निलज्योत आहे . आपण साधना करून ती ज्योत अधिकाधिक मोठी व तेजस्वी करायला हवी . आपण सतत स्वामींची शिकवण अनुसरायला हवी . असे केले तरच आपली दृष्टी सुस्पष्ट होईल . आपण सदैव , प्रत्येकात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना पाहायला लागू . या दृष्टीने पाहणे म्हणजेच ज्ञान . त्यांची कृपा सर्वांसाठी आहे .
   
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साई राम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा