गुरुवार, १७ एप्रिल, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

     " ऐहिक संपत्ती अशाश्वत आहे तर आध्यात्मिक संपत्ती शाश्वत आहे ". 

पुष्प १७ पुढे सुरु

३१ मे २०१३ दुपारचे ध्यान 
स्वामी - तू अशी का रडते आहेस ? 
वसंता - स्वामी , तुम्ही मला काही दिले नाहीत आणि मला हे सहन होत नाही . माझ्या खोलीतला दिवा कसा चालू होता ?
स्वामी - मी नेहमी तुझ्याबरोबर असतो , हे त्या दिव्याद्वारे मी दर्शवले .
वसंता - स्वामी , त्या हातरुमालाचे काय ? त्याच्या मध्यभागी त्रिशूल असल्यासारखे दिसते . त्याच्या दोन बाजूंना १२ वक्ररेषा आहेत तर दुसऱ्या दोन बाजूंना ११ वक्ररेषा आहेत . 
स्वामी - ॐ  सर्व अनिष्टतेचा संहार करणाऱ्या त्रिशूलासारखा आहे  . आपल्या ४६ गुणसुत्रांद्वारे नवनिर्मिती होईल . मी नक्की येईन . जेव्हा मी येऊन तुला पाहिन तेव्हा नवनिर्मिती होईल . आपण एकमेकांना पाहिल्यानंतर आपल्या गुणसूत्रांचा संयोग होईल . 
ध्यान समाप्ती 
            सकाळी ९ वाजता एडींनी मला नाशत्यासाठी बोलावले . मी माझ्या खोलीतून स्वामींच्या खोलीत गेले . नाश्ता झाल्यावर एडी आणि मी माझ्या खोलीत परत आलो , तर काय ! तेथील दिवा चालू होता . तेथे कोणीही नव्हते वा कोणीही दिवा लावला नव्हता . स्वामींनी नंतर सांगितले की ते सदैव माझ्याबरोबर असतात हे दर्शवण्यासाठी त्यांनी दिवा लावला . बऱ्याचदा गर्भ कोटम मधील स्वामींच्या खोलीतील दिवा चालू असतो . आता स्वामींनी इथेही ते दर्शवले . माझ्या अति करुण रुदनामुळे , स्वामी सदैव माझ्याबरोबर असल्याचे अशा रितीने दर्शवतात . 
            आता आपण हातरुमालाविषयी पाहू . तो रुमाल पांढरा शुभ्र असून , येणारे सत्ययुग हे शुद्ध सत्ययुग असल्याचे त्यातून सूचित होते . त्याच्या मध्यावर ॐ आहे . परंतु एका विशिष्ट कोनातून पाहिले असता तो चंद्रकोरीसहित त्रिशूलासारखा भासतो . जेव्हा स्वामी येतील तेव्हा ते त्रिशूलाने सर्व कर्मांचा संहार करतील . रुमालाच्या प्रत्येक बाजूला आठ वर्तुळांचा संच आहे . तसेच एका बाजूस ११ वक्ररेषा व दुसऱ्या बाजूस १२ तसेच तिसऱ्या बाजूस ११ व चौथ्या बाजूस १२ वक्ररेषा आहे.  या दोन आकड्यांची बेरीज २३ आणि २३ येते . निर्मितीसाठी आवश्यक असणारी ४६ गुणसूत्रे यातून सूचित होतात . प्रत्येक वक्ररेषेखाली ८ पाकळ्यांचे फुल आहे जे अष्टाक्षरी मंत्र आणि वैकुंठ यांचे प्रतिक आहे . स्वामींची जन्म तारीख २३ आहे व माझी २३ आहे . जेव्हा आम्ही एकमेकांना  पाहू तेव्हा नव निर्मिती होईल हे ॐ दर्शवतो . 
           पुरुष न् स्त्रीच्या गुणसूत्रांमधून मूल जन्मते . परमेश्वर व त्याची शक्ती यांच्या भावविश्वाद्वारे मूल जन्माला येते . देहाच्या माध्यमातून मानवी मूलाचा जन्म होतो . गर्भाशय मानवी स्त्रीच्या उदरामध्ये असते तर परमेश्वराचे गर्भाशय हृदयात असते . ही परमेश्वराची बृहद योजना आहे . गुणसूत्रांच्या  आकड्याद्वारे जन्मतारखांचे स्पष्टीकरण केले जाते . सांसारिक चष्मा घालणाऱ्या मनुष्यासाठी स्वामी आणि मी हा तपशील स्पष्ट करून सांगतो आहोत . 
            मी सकाळी एवढी का रडत होते ? मी बाहेर बसले होते , वर लावलेल्या सर्व देवदेवतांच्या तसबिरींकडे पाहत मी अश्रू ढाळत होते .
            हे राधा कृष्णा , तुम्ही परमेश्वर नाही ! हे विनायका तू भगवंत नाहीस ! गायत्री माते , सरस्वती माते तुम्हीही देवता नाही ! भगवान शिव , हनुमान , सीता , राम , बलराम आणि बाळ कृष्णा तुम्ही देव नाही ! हे मुरुगन , हे विश्वरुपा , कालीमाते , गुरुनानक , जिझस , शिर्डीबाबा आणि बुद्धा तुम्हीही भगवान नाही ! जर तुम्ही परमेश्वर असाल तर  माझे अश्रू पाहून शांत  कसे राहू शकता . हे अश्रू पाहिल्यावर तरी तुम्ही सर्वजण जाऊन या अश्रूंद्वारे स्वामींना बांधून येथे घेऊन या ! तुम्ही असे का केले नाही ? तुम्ही परमेश्वर  नाही ! 
           अशा विचारात मी रडत होते . म्हणून स्वामींनी ध्यानात मला पहिला प्रश्न विचारला " तू अशी का रडत होतीस " ? 
            हे वाचणाऱ्या सर्वांना मी विनंती करते की सांसारिक चष्मा काढा आणि निव्वळ आत्मिक दृष्टीने परमेश्वराकडे पाहा .  स्वामींनी २ वर्तुळांचे चित्र दिले . त्याच्या मधोमध जग आहे . मोक्ष हा शब्द त्याच्या भोवती लिहिला आहे . त्याचा आकार डोळ्याच्या बुबुळासारखा आहे . परमेश्वराला मोक्षाच्या दृष्टीतून पाहा . म्हणजे संपूर्ण जग परमेश्वर स्वरूप होईल . 


 व्ही.एस.

जय साई राम


                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा