गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " परमेश्वराचे साम्राज्य तुमच्या प्रतिक्षेत असतांना ऐहिक साम्राज्याची इच्छा कशाला ? ". 

पुष्प सोळावे पुढे सुरु

             ' राधा कृष्ण विश्वगर्भ ' याचा अर्थ काय ? त्या व्यक्तीला त्याचा अर्थ माहित नसताना तो तसे बोलला . यालाच स्वामी भौतिक चष्म्यातून पाहणे असे म्हणतात . या कलियुगातील लोकांना पती पत्नी - गर्भाशय या खेरीज दुसरे काहीही माहित नाही . एकदा येथे दोघे जण आले आणि म्हणाले , " आम्हाला कोणीतरी ' विश्वगर्भ ' म्हणजे काय ?  असे विचारले " 
             विश्वगर्भ म्हणजे काय ? निर्मिती हा परमेश्वराचा वैश्विक गर्भ आहे . इथे परमेश्वराची आद्य निर्मिती माझ्यापासून प्रसवणार आहे . स्वामींनी १९९८ मध्ये प्रपंच ( विश्वगर्भ ) माझ्या उदरात ठेवला . याद्वारे सहा दिव्य बालके जन्मली . हा विश्वगर्भाचा पुरावा आहे . १२ वर्षांनी माझ्या विश्व गर्भाने विश्व ब्रह्म गर्भ कोटमच्या इमारतीचे रूप धारण केले .  तेथे स्वामींच्या आणि माझ्या हृदयाचा संगम झाला . हे सिद्ध करण्यासाठी स्वामींच्या पादुका आणि माझे हात या दोन्हीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली . हे महाविष्णूंचे चरण आणि महालक्ष्मीचे हात आहेत . 
             विश्व ब्रह्म गर्भ हा उदरात नव्हे अंतकरणातील भावांपासून निर्माण होतो . स्वामींच्या कृपा व करुणा या भावांनी माझे रूप धारण केले . माझ्या तपश्चर्येमुळे नवनिर्मिती होणार आहे . जनमानस ज्ञान दृष्टीने पाहून चिंतन करत नाही तर परमेश्वराकडे केवळ भौतिक काम दृष्टीने पाहतो . स्वामींच्या निकट असणारी व्यक्ति म्हणते , " राधा कृष्ण विश्वगर्भ " हा साई वसंताचा विश्वगर्भ मुक्ती निलयम मध्ये निर्माण झाला आहे . मी स्वामींपासून विभक्त आहे . माझे अश्रू , विलाप व तळमळ यांनी विश्वगर्भ बाहेर आणला . हे अंतरीचे भाव आहेत , म्हणून महालक्ष्मी महाविष्णूच्या वक्षस्थली आहे . स्वामींच्या कारुण्य व कृपा या भावांनी महालक्ष्मीचे रूप धारण केले .
             हे काही पुरुष आणि स्त्री नव्हेत तर हे परमेश्वर आणि त्याचे भाव आहेत . ही आद्य निर्मिती आहे . जी थेट त्याच्या भावांमधून प्रसवते . मनुष्याला याबाबत स्पष्टता देण्यासाठी व त्याचे परमेश्वरा विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी  स्वामी येथे अवतरले . युगानुयुगे मानवी मन हे पती , पत्नी आणि मुले यामध्येच गुरफटलेले आहे . त्यामुळे त्याची परमेश्वराबाबतही तिच संकल्पना आहे . परमेश्वर व त्याची पत्नी यांच्या विषयीसुद्धा तो त्याच्या या संकल्पनेनुसार बोलतो . जेव्हा परमेश्वर भूतलावर अवतरतो तेव्हा त्याला पत्नी व मुले असतात परंतु ते केवळ अवतार कार्यासाठी येतात . राम आणि सीतेचे पुत्र लव आणि कुश , कृष्ण रुख्मिणीचा पुत्र प्रद्युम्न हे सर्वजण अवतार कार्यासाठी आले . स्वामींनी सत्य साई स्पीकस्  भाग १ या पुस्तकातील प्रवचनात सांगितले की मानवतेला सहज समजावे म्हणून त्यांनी त्रिदेवांच्या शक्तीला त्यांची पत्नी म्हणून संबोधले .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम  
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा