ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आसक्ती आणि ममत्व मनामध्ये संभ्रम निर्माण करते तर परमेश्वरावरील प्रेम आत्मसाक्षात्कारा कडे घेऊन जाते ".
पुष्प १७ पुढे सुरु
स्वामी परमेश्वर आहेत आणि मी शक्ती आहे . तथापि मी त्यांच्यापासून विलग झाल्यामुळे करूण विलाप करते आहे . मला हे क्लेश असह्य झाले आहेत . सकाळी मी अधिकच रडत होते . सर्वजण माझ्या सांत्वनासाठी आले . मी प्रत्येक दिवस असेच अश्रू ढाळते आहे . माझे सांत्वन करण्यासाठी स्वामी माझ्याशी बोलतात आणि लिहितात . तथापि जे कोणी हे पाहतात किंवा वाचतात ते कदाचित याकडे वेगळ्या दृष्टीकोनातूनही पाहात असतील . ते त्यांच्या सांसारिक चष्म्यातून पाहतील . सदैव चित्रपट पाहणारे त्यांचे डोळे कदाचित आमच्या संभाषणाकडे नायक नायिकेचे संभाषण या दृष्टीने पाहात असतील .
तथापि स्वामी आणि माझ्यामध्ये कोणताही दैहिक ( कायिक ) दुवा नाही . स्वामींच्या आणि माझ्या क्लेशांना २००३ मध्ये सुरुवात झाली . स्वामींनी जागतिक पाप कर्मांमुळे दुःख भोगले आणि देहत्याग केला . आता मी ही अधिक क्लेश सोसते आहे . शारीरिक क्लेश आणि विरह वेदना यामुळे मी हे सर्व लिहिते आहे . जेव्हा मी हे लिहिते तेव्हा आमचे भाव गर्भ कोटम मधून बाहेर पडून स्तूपाद्वारे अखिल जगतामध्ये पसरतात . माझे सहस्त्रार उघडून त्यातून अमृत स्त्रवते . ते तारका स्पंदनांच्या रुपात स्तूपाद्वारे सर्वदूर पसरून संपूर्ण जगामध्ये परिवर्तन घडवते.
प्रथम स्वामी आणि मी दोघही दुःख सोसत होतो . त्यानंतर स्वामींनी देह त्यागला . भगवान शिवाने विषप्राशनाद्वारे हे दर्शवले आहे . शिव संहारकर्ता म्हणून येतो .
दुसरी अवस्था , माझे अश्रू आणि क्लेश याद्वारे अमृत स्त्रवते . यातून पालनकर्ता महाविष्णूंचे रूप दर्शवले जाते .
आता तिसरी अवस्था , भगवान शिवाने मोहिनीला स्पर्श केल्यानंतर अय्यपाचा जन्म झाला . ही तिसरी अवस्था ब्रम्हचा निर्देश करते . ब्रहमदेव निर्मितीचे कार्य करतात . स्वामी आणि मी या तिन्ही अवस्था दर्शवतो . जेव्हा स्वामी पुन्हा येऊन मला बोलावतील आणि स्पर्श करतील तेव्हा नवसृष्टीचा जन्म होईल . आमच्या दर्शन , स्पर्शन व संभाषणाने नूतन सत्ययुगाचे आमचे अपत्य जन्मास येईल .
३१ मे २०१३
स्वामींनी एका हातरुमाला बरोबर त्यांचे व शिर्डीबाबांचे चित्र दिले . त्या चित्रांच्या पाठीमागे २००३ चे कॅलेंडर होते . चित्रातील स्वामींचे रूप वशिष्ठ गुहेतील विलयन चित्राप्रमाणे आहे . २००३ पासून स्वामींच्या आणि माझ्या अतीव दुःखास सुरुवात झाली . स्वामींच्या डोळ्याचे आणि खुब्याचे ऑपरेशन झाले . तसेच त्यांच्या हाताचे हाड मोडले . मी त्यावेळी व्हाईट फिल्डमध्ये होते आणि माझ्या हातापायांना झालेल्या गळवांना बॅंडेज बांधून मी दररोज स्वामींच्या दर्शनास जात होते . स्वामींनी आणि मी १० वर्षे सर्वांची कर्मे आमच्या अंगावर घेतली.
आता आपण त्या शुभ्र पांढऱ्या कापडापासून बनवलेल्या हातरूमाला विषयी पाहू . त्याच्या मध्यभागी पिवळ्या रेशमांनी भरतकाम केलेले एक वर्तुळ होते . त्या वर्तुळात ॐ होता . हातरुमालाच्या किनारींना लेस लावली होती . प्रत्येक वक्ररेषेमध्ये एकात एक आठ वर्तुळांचा संच होता . प्रत्येक वक्ररेषेखाली आठ पाकळ्यांचे फूल होते . S आणि V या अक्षरांनी सर्व जोडले होते . एकूण ४६ वक्ररेषा होत्या . एका बाजूला ११ नंतर १२ , दुसऱ्या बाजूला ११ आणि शेवटी १२ एकूण ४६ .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा