रविवार, २७ एप्रिल, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " निरागसतेने प्राप्त केलेल्या स्थानापाशी अहंकार कधीच पोहोचू शकत नाही ". 

 पुष्प अठरावे पुढे सुरु

             स्वामींनी हे सूचित करून त्यावर VIMP ( अति महत्वाचे ) असे लिहिले . तसेच जे माझ्यासारखे बनू इच्छितात , त्यांच्यासाठी स्वामींनी हा उतारा सूचित केला . माझ्या हृदयावर केवळ स्वामींचे रूप ठसले आहे . म्हणून स्वामी सदैव माझ्यासमोर असतात . माझी प्रतिमा त्यांच्या नेत्रांत असते आणि त्यांची प्रतिमा माझ्या नयनात , असे असले तरी मी सर्वकाही त्यांच्या नजरेतून पाहते . मी याविषयी ' उपनिषदांच्या पलीकडे ' पुस्तकातील ' नयनात साई ' या अध्यायात लिहिले आहे .
            स्वामींचे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी , त्यांच्या डोळ्यातील रेटिना त्यांनी मला दिल्याचे उघड केले , त्यामुळे त्यांचा एक नेत्र दृष्टिहीन असल्याचे ही त्यांनी सांगितले . अशा तऱ्हेने मी शब्दशः स्वामींच्या नजरेतून सर्व पाहते आहे . स्वामी माझे सर्वस्व असल्याने केवळ तेच माझ्या हृदयात आहेत . स्वामी म्हणतात , " जर तुमचे हृदय राधेसारखे असेल तर कृष्ण तुमच्या हृदयात वास करेल ."  स्वामींनी असे सांगितले आहे परंतु इथे , मी स्वामींच्या हृदयात आहे . हा फरक आहे . परमेश्वर अंतर्यामी बनून सर्वांच्या हृदयात वास करतो . तथापि मी स्वामींच्या हृदयात वास करते . महाविष्णूंच्या हृदयात वास करणारी महालक्ष्मी मी आहे . अनेकजण म्हणतात ' मी राधा आहे , मी सीता आहे वा मी महालक्ष्मी आहे '. परंतु केवळ असा दावा करून वा त्यांच्यासारखी वस्त्रे परिधान करून का कोणी राधा वा सीता होऊ शकेल ? ती केवळ नक्कल होईल . नकली रत्न जरी हिऱ्यासारखे दिसले तरी कधीही हिरा होऊ शकत नाही . केवळ साधना आणि भक्तीद्वारे परमेश्वरप्राप्ती होते . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ........

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा