ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मुक्तीची कामना करणाऱ्यांना भगवंत मुक्ती देतो आणि आनंदाची इच्छा असणाऱ्यांना आनंद देतो ".
वसंतामृतमाला
पुष्प १७
( पुष्प १६ वरून पुढे चालू )
आत्मिक दृष्टी
स्वामींनी काही दिवसांपूर्वी एक चित्र दिले . त्यामध्ये एक मोठे वर्तुळ होते , त्याच्या मध्यभागी एक लहान वर्तुळ होते . या छोट्या वर्तुळात जगाचा नकाशा होता . नकाशा भोवती मोक्ष हा शब्द लिहिला होता . वर्तुळाच्या दोन्ही बाजूला आनंदाने उडणारी दोन पांढरी कबुतरे होती . त्याच्या तळाशी लिहिले होते
' ज्याला आरंभ नाही व अंतही नाही ....... मोक्ष ' .
आता आपण याविषयी पाहू . मोक्ष म्हणजे काय ? वास्तविक ज्याला ना आदि ना अंत . हे परंधाम आहे . येथे केवळ तेज आहे . येथे ना नाम ना रूप . मनुष्याने ही अवस्था प्राप्त केली पाहिजे . नाहीतर तो जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकून राहील . सर्वजण परमेश्वराचा अंश आहेत . श्रीकृष्णाने भगवत गीतेमध्ये हे स्पष्टपणे घोषित केले आहे .
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः
( सर्वजण माझाच सनातन अंश आहेत .)
सर्वजण परमेश्वराचा अंश आहेत , हे जो जाणतो त्याची जन्ममृत्युच्या चक्रातून सुटका होते . आपण परमेश्वरामधून आलो आहोत . त्याला प्राप्त करणे म्हणजेच मुक्ती वा मोक्ष आहे हे दाखवण्यासाठी स्वामी येथे आले . आद्यनिर्मिती प्रभूपासून , स्वामींपासून होते . ही निर्मिती कशी असते हे दर्शवण्यासाठी ते आता येत आहेत . या जीवनामध्ये किती क्लेश , दुःख , व्याधी , हानी आणि धोके आहेत ! या सर्वातून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वरास प्राप्त करून घेणे . माझ्या जीवनाद्वारे मी हे दर्शवते आहे . माझे अश्रू , विरह आणि तळमळ यांद्वारे परमेश्वराने वैश्विक मुक्ती बहाल केली आहे . ३१ मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी , मला तुम्ही हवे आहात . मी एक क्षणभरही तुम्हाला विसरू शकत नाही . तुम्ही तुमच्या बोलण्यातून आणि लेखनातून माझे सांत्वन करता . परंतु हे सुद्धा संसारिक लोकांच्या बोलण्यासारखे , इतरांच्या बोलण्यासारखे आहे .
स्वामी - हे अवतार कार्य आहे . आपण स्थूल रुपात एकमेकांशी बोलत नाही केवळ ध्यानामध्ये बोलतो . समुद्र मंथनानंतर हलाहल बाहेर पडल्यावर सर्वांनी भगवान शिवांकडे धाव घेतली . शंकरानी ते हलाहल प्राशन केले . अमृत बाहेर आल्यानंतर देव आणि दैत्य यांच्यात कलह माजला . इंद्राच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून महाविष्णूंनी मोहिनी अवतार घेतला . मोहिनीने असुरांना भ्रमित करून देवांना अमृत दिले .
भगवान शिवाने मोहिनीस पाहिले , तिच्या रूपाने आकर्षित होऊन त्यांनी जवळ जाऊन तिला आलिंगन दिले . त्याक्षणी अय्यपाचा जन्म झाला . त्याचप्रमाणे आम्हा दोघांच्या दर्शन , स्पर्शन व संभाषणाने नवनिर्मिती होईल . हे ही त्याच पद्धतीने घडेल .
वसंता - मला समजले स्वामी . मी लिहीन .
ध्यान समाप्ती .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा