ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एकवेळ तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे कण मोजू शकाल परंतु परमेश्वराचा संपूर्ण महिमा जाणणे तुम्हाला कधीही शक्य होणार नाही ".
पुष्प अठरावे पुढे सुरु
' अम्मा वसंता सारखे '
स्वामींनी खालील मजकूर दर्शवला आहे . ' .......... राधेने कृष्ण म्हणजे तिच्या डोळ्यातील बाहुली असे वर्णन केले आहे . इथेही एक गर्भितार्थ आहे जो तुम्ही ओळखला पाहिजे . जेव्हा तुम्ही माझ्यासमोर उभे राहता आणि मी तुमच्यासमोर , तेव्हा स्वाभाविकपणे मी माझी प्रतिमा तुमच्या डोळ्यात पाहतो आणि तुम्ही तुमची प्रतिमा माझ्या डोळ्यात पाहता . याची दुसरी बाजू , जर तुम्ही माझ्याकडे समोरासमोर पाहत नसाल तर तुम्ही तुमची प्रतिमा माझ्या डोळ्यात पाहू शकत नाही , आणि मी माझी प्रतिमा तुमच्या डोळ्यात पाहू शकत नाही '.
राधेच्या या विधानाचा असा अर्थ आहे की गोपिका आणि कृष्ण एकमेकांच्या निकट असून , अविभाज्य आहेत . कृष्ण त्यांच्या हृदयात आहे जणुकाही त्यांच्या हृदयरुपी कागदावर उमटलेली प्रतिमा ! त्यांचे विचार कृष्णाच्या नाम रूपावर केंद्रित आहेत . त्यांची सर्व कर्म कृष्णाला समर्पित आहेत . कृष्णाची भक्ती आणि पूजन हे त्यांच्या मनावर ठसले आहे . म्हणूनच गोपिकांना एवढा त्याग आणि शरणागती पत्करणे शक्य झाले . त्या मानसिक पातळीवर कृष्णाची अनुभूती घेत होत्या .
याउलट आज भक्तीला विपरीत स्वरूप आले आहे आणि आपला राधेच्या भक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोनही विपरीत बनला आहे . आपण राधेसारखी वस्त्रे परिधान करू शकतो , राधेसारखे बोलू शकतो परंतु राधेसारख्या हृदयाचे काय ? तिच्यासारखे हृदय मिळणे आपल्याला शक्य नाही . राधेचे अनुकरण करण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींना महत्व न देता जर तुम्ही तुमचे हृदय राधेसारखे बनवले तर कृष्ण तुमच्या हृदयात वास करेल .
...
उर्वरित वसंतामृत पुढील भागात
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा