रविवार, ६ एप्रिल, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" जर मन शांत असेल तर देहालाही पिडा नसेल ". 

पुष्प सोळावे पुढे सुरु 

            ब्रह्म अधिक ज्ञान म्हणजे निर्माता . महाविष्णू अधिक करुणा व कृपा म्हणजे पालनकर्ता . शिव अधिक शक्ती / कुंडलिनी म्हणजे संहारकर्ता . आता स्वामी कलियुगाचे संरक्षण करण्यासाठी , सत्ययुगाची निर्मिती करण्यासाठी आणि पापांचा , वाईट गोष्टींचा संहार करण्यासाठी येत आहेत . स्वामी त्रिदेवांचा संगम आहेत .परमेश्वराच्या त्रिरुपांचे एकीकरण . माझा जन्म त्यांच्या तेजातून झाला आहे . माझा देह पुन्हा ज्योतीरूप धारण करेल आणि त्यांच्या देहात विलीन होईल . याद्वारे आम्ही दोन नसून परमेश्वर आणि त्याची करुणा असल्याचे दाखवून देऊ .
             परमेश्वर येथे अवतरीत होऊन त्याने गेली ८४ वर्षे उपदेश केला . भौतिक जीवन माया आहे . त्यातून बाहेर पडा आणि केवळ परमेश्वराचे चरण धरून ठेवा . या जन्ममृत्युच्या येरझारा पुरे ! या भवसागरातून तरुन जा . ह्या कलियुगातील लोकं परमेश्वरालाच शिकवतात , हा दैवदुर्विलास आहे .
            " हे प्रभू  , तू कलियुगात येथे येऊ नकोस ! तू इथे येऊन का त्रास करून घेतोस ? तू जे सांगतोस ते आम्ही कधीही ऐकणार नाही " !
             स्वामी सांगतात आणि मी लिहिते परंतु त्याचा काय उपयोग ? 
३० मे संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , परमेश्वर आणि त्याची शक्ती म्हणजे पुरुष आणि स्त्री नव्हे , असे मी लिहिले तथापि मला तुमच्या स्थूल देहाविषयी आसक्ती का आहे ? 
स्वामी - हे सर्व अवतार कार्यासाठी आहे . आपला विवाह झाला . मुले जन्मली . तुझ्या पातिव्रत्याने जगात परिवर्तन घडेल . सर्व युगे परिपूर्ण बनतील . तू मला तुझे पातिव्रत्य सिद्ध करण्यास सांगितलेस , त्यासाठी आपण येथे आलो . 
वसंता - आता मला समजले स्वामी , मी लिहीन . 
ध्यान समाप्ती 
            आता आपण या विषयी पाहू . परमेश्वर ना पुरुष आहे ना स्त्री . आम्ही येथे अवतार कार्यासाठी आलो . स्वामींनीच माझ्याशी विवाह केला . अपत्य जन्मानंतर ते माझ्यापासून विलग झाले . तथापि मी कोण आहे हे त्यांनी जगाला उघड करून सांगितले नाही . मी एवढे लेखन केले तरीही त्यांनी त्यांच्या तोंडून माझ्याविषयी काहीही सांगितले नाही . हा माझ्या पातिव्रत्याला कलंक आहे . गेली ७३ वर्षे स्वामींव्यतिरिक्त माझ्या मनात दुसरा कोणताही विचार नाही . हे पातिव्रत्य आहे . माझे विचार , उच्चार आणि आचार संपूर्णपणे परमेश्वरावर केंद्रित आहेत . ह्या पातिव्रत्यामुळे कलियुगाचे सत्ययुगात रुपांतर होईल . चारही युगांमधील दोष दूर केले जातील व प्रत्येक गोष्ट दोषरहित , परिपूर्ण आणि समग्र बनेल . 
            तथापि स्वामींनी माझे पातिव्रत्य सिद्ध केलेच पाहिजे . त्यांनी पुन्हा येऊन मी कोण आहे हे सांगितले पाहिजे . माझा देह ज्योतीमध्ये परिवर्तित होऊन त्यांच्या देहामध्ये विलीन व्हायला हवा . त्यावेळी ते सिद्ध करतील की मी एका स्त्रीचे नाम आणि रूप नाही . मी परमेश्वराची शक्ती आहे . हे त्यांचे अवतार कार्य आहे . परमेश्वर ना पुरुष आहे ना स्त्री . तो कोटीसूर्यसम तेजस्वरूप आहे . मी त्यांच्या तेजामधून एका स्त्रीचा जन्म घेतला आणि पुन्हा ज्योती बनून त्यांच्यामध्ये विलीन होईन . ह्याचा सर्वांना बोध झाला पाहिजे . तुमच्या डोळ्यावरचा भौतिक चष्मा काढा आणि परमेश्वराकडे परमेश्वर म्हणून पाहा . म्हणजे तुम्हाला तो कोण आहे हे समजेल . जागे व्हा ! स्वामींच्या उपदेशाचे आचरण करा . आता माया पुरे ! तुम्ही कोण आहात , जीवन हे तुम्ही जाणले नाहीत तर तुम्ही परमेश्वराविषयी काय जाणणार ? जर तुम्ही तुमचे खरे स्वरूप जाणले तरच परमेश्वर जाणू शकाल .

व्ही.एस.

जय साई राम 
     
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा