रविवार, ११ मे, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " पंचेंद्रियांद्वारे मिळालेल्या सुखसोयींविषयी निरिच्छा दर्शवून पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते ". 

पुष्प १९ पुढे सुरु
             
               स्वामींच्या आणि माझ्या दोघांच्या नाडीमध्ये घोषित केले आहे की माझ्या ७६ व्या वर्षीच ते मला बोलावतील . हे वाचल्यावर मला अधिकच रडू आले . माझे अश्रू पाहून स्वामींनी उघड केले की माझ्या सर्व दुःखाचे ते साक्षीदार होते . मी लहानपणी इतर मुलांबरोबर खेळत नसे हे ही त्यांनी सांगितले . परमेश्वराच्या चिंतनात होणारी माझी घालमेल , तगमग याविषयीही स्वामींनी सांगितले . कलि इतका वाईट असेल असे स्वामींना ही वाटले नाही . ( म्हणून अवतार कधीही कलियुगात भूतलावर येत नाही .) तुम्हाला वाटले की परमेश्वराला हे माहित कसे नाही ? परंतु हा परमेश्वर साक्षी अवस्थेतील परमेश्वर नाही . तो त्याचे भावविश्व दर्शवण्यासाठी येथे आला.  म्हणून तो हे सोसतोय . त्याने माझे दुःख पाहिले आणि कलियुग सोसले . 
            राधेची भूमिका आणि माझी भूमिका वेगवेगळ्या आहेत . मला ' मी ' नाही आणि मला सगळ्यांची भीती वाटते . स्वामींच्या तेजाने माझे रूप धारण केले आहे . ते पुन्हा मिळवण्यासाठी देह त्याग केल्यानंतरही स्वामी नव्याने परत येतील . हा माझा देह त्यांनी मला दिला , हा जीवप्रवाह त्यांनी दिला , माझे डोळे त्यांनी मला दिले . हे सर्व ज्योतीरूप होऊन त्यांच्या देहामध्ये विलीन झालेच पाहिजे . स्वामींमधून बाहेर पडलेला दिव्यानंद पुन्हा त्यांच्याकडे परत जायला हवा . परमेश्वर सत् चित् आनंदस्वरूप आहे . तथापि त्याने कलियुगात येथे येऊन दुःख भोगले . म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रात असे लिहिले आहे 
            ' ........ आदिमूलम् त्याच्या आदिशक्तीला भेटण्यासाठी आणि तिला परत घेऊन जाण्यासाठी भूतलावर आले . ती त्याचा मुळ गाभा आहे ' .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..........

जय साई राम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा