ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला विशुद्ध प्रेमाने स्पर्श करणे म्हणजेच मुक्ती ".
पुष्प १९ पुढे सुरु
हे घडवण्यासाठी स्वामींनी बृहद योजना बनवली . त्या योजनेनुसार माझा ' मी ' विना जन्म झाला . मला या जगाची आणि जगातील लोकांची भीती वाटते . परमेश्वरास प्राप्त करून घेण्याखेरीज मी दुसरे काहीही जाणत नाही . माझ्यासाठी जीवन एक संघर्ष आहे . मी जन्मापासूनच अश्रू ढाळते आहे . मला इतरांशी बोलायला आवडत नाही . मी लहानपणापासून एकलकोंडी आहे . नंतर मी कृष्णाच्या बाहुलीशी खेळत असे . मी कशी मोठी झाले ? कशी शिकले ? मला काही माहित नाही . मला कृष्णाशी विवाह करून त्याच्याबरोबर राहायचे होते . केवळ ह्या एका विचाराच्या काल्पनिक विश्वात मी लहानपणी वावरत होते . मोठी झाल्यावर मला ' सक्तीचा विवाह ' करावा लागला . तथापि मला वर निवडण्याची मुभा दिली गेली . अखेर अनेक वर्षानंतर स्वामींनी उघड केले की माझा ज्याच्याशी विवाह झाला ते तेच साईकृष्ण होते.
माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामींनी सांगितले की मी त्यांची शक्ती , राधा आहे . तथापि त्यांनी मला बोलावले नाही वा माझ्याशी संभाषण केले नाही . मला त्यांचे दर्शन , स्पर्शन वा संभाषण मिळाले नाही . स्वामींनी देह त्याग केल्यामुळे आता मी त्यांच्या पुनरागमनासाठी तळमळते आहे . करूण विलाप करते आहे . परंतु ते येईपर्यंत प्रतीक्षा करणे असह्य झाल्याने मला तीव्र मनोवेदना सोसाव्या लागत आहेत.
३ मे २०१३ संध्याकाळचे ध्यान
वसंता :- स्वामी आज मी नाडी वाचली . तुम्ही माझ्या वयाच्या ७६ व्या वर्षी मला बोलवाल असे सर्वजण सांगतात .
स्वामी :- हे प्रिय देवी , रडू नकोस . अशा हाकाट्या देऊ नकोस . मी नक्की येईन . तू माझ्या गळ्यातला ताईत आहेस, हो की नाही ? तू माझा जीवप्रवाह आहेस . म्हणून तुझ्या जीवप्रवाहाचा माझ्याशी संयोग होईल . तुझा देह माझा असल्यामुळे तो माझ्याजवळ राहील.
( तरीही मी रडत होते .........)
वसंता :- स्वामी , मला हे नाही सहन होत !
स्वामी :- रडू नकोस मी नक्की येईन . कलि इतका वाईट असेल हे मला अपेक्षित नव्हते . मी केवळ तुझ्यासाठी हे सोसतो आहे . मी तुझे लहानपणीचे दुःख पाहिले . तू कधीही इतर लहान मुलांसारखी खेळली नाहीस . परमेश्वराच्या चिंतनात होणारी तुझी घालमेल मी पाहिली . हे सर्व पाहून हा कलि मी सहन करतोय . लहानपणापासून केवळ कृष्णाशी विवाह करायचा असा तुझा निर्धार होता . हे सर्व मी पाहिले आहे . रडू नकोस , मी लवकरच येईन .
वसंता :- मला समजले स्वामी .
ध्यान समाप्ती
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा